जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले.
- dhadakkamgarunion0
- Feb 25
- 2 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
जळगावच्या पद्मालय जंगलात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले. पोलिसांनी सूक्ष्म तपास करून स्वप्निल ऊर्फ गोलू अशोक पाटील याला अटक केली. मृतदेहावरील नथ आणि नेलपेंट हे महत्त्वाचे पुरावे ठरले. स्वप्निल आणि आकांक्षा ऊर्फ अजय गद्रे यांची ओळख पाणीपुरीच्या गाडीवर झाली होती. प्रेमसंबंध वाढले, पण आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर स्वप्निल संतापला. आकांक्षाने लग्नासाठी सातत्याने आग्रह धरल्याने त्याने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. जंगलात नेऊन क्रूरपणे प्राण घेतले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी देह जाळण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक तपासातून मृत्यूची तारीख निश्चित झाली आणि पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. ही घटना प्रेम, फसवणूक आणि हिंसेच्या दुर्दैवी संगमाचे उदाहरण ठरली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भाजप पक्षाने कार्यकारिणीची रचना करताना दलबदलू नेत्यांना अग्रक्रम दिला आहे, हे स्पष्ट दिसते. Ready-to-eat सरंजामी नेत्यांना सामावून घेण्याची तयारी पक्ष दाखवत असला तरी, याचा निवडणुकीत खरा फायदा किती होतो हा संशोधनाचा विषय आहे. प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन, तसेच काही ABVP कार्यकर्त्यांना संधी दिल्याबद्दल स्वागत. मात्र या रचनेतून शिवसेना वा NCP यांना फारसा फटका बसणार नाही, हेही स्पष्ट होते.राजकारणात मैत्री निभावण्याचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न झाला असला तरी, जनतेची भूमिका निर्णायक ठरेल. लोकसभा 2029 नंतर दलबदलू नेते पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसेल. त्यामुळे पक्षाने निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपणे हेच खरे आव्हान आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
सोलापूरमध्ये डान्सबारसारख्या अवैध धंद्यांना पोलिसांचेच संरक्षण मिळत असल्याने कारवाई होत नाही, हे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी विधानसभेत उघड केले. दारफळ गावातील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आईवडील न्यायासाठी पोलिस स्टेशनचे हेलपाटे मारून थकले, पण यंत्रणा निष्क्रिय राहिली.वाहतुकीत शिस्त लावण्याऐवजी ट्रॅफिक हवालदार वसुलीसाठी उभे राहतात. अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची लूट केली जाते, आणि बाहेरचे ड्रायव्हरही सोलापूरचा हा अनुभव वेगळा असल्याचे सांगतात.अधिकाऱ्यांचे दोन नंबर धंदेवाल्यांशी फोटोसेशन, भेटीगाठी यामुळे पोलिस स्टेशनमध्ये जाण्याआधीच सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष संदेश दिला जातो—न्याय मिळवायचा असेल तर हिस्सा द्या. कायद्याचे राज्य नाही, तर भ्रष्ट पैशांचा पायंडा आहे.बापू धन्यवाद, आपण आवाज उठवलात. आता पोलिसांनी खऱ्या अर्थाने जनतेचे रक्षक व्हावे हीच अपेक्षा.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बीएसएफ कमांडंट जे. डी. मैथ्यू यांना सीबीआयने ट्रेनमध्येच पकडले, सूटकेसमध्ये तब्बल ५० लाख रुपये सापडले. ही फक्त रोख रक्कम, बाकी मालमत्तेचा हिशोब अजून बाकी आहे. एका अधिकाऱ्याची ही कमाई असेल तर बाकींची स्थिती सहज कल्पना करता येते.बांगलादेशी घुसखोरीमुळे डॉक्टर नारंग यांचा लिंचिंग झाला, महागुण सोसायटीवर हल्ला झाला. पण सीमारेषेवर तैनात असलेले कमांडंट भ्रष्ट पैशांच्या बिछान्यावर सुखाने झोपलेले आहेत. भ्रष्टाचार देशाला फक्त गरीब करत नाही, तर जिवंत माणसांना मारतो आणि दहशतवादाला खतपाणी घालतो.जर भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळाले तर पकडले जाण्याचा धोका संपेल आणि कमाई वाढेल. हीच खरी राष्ट्रीय शोकांतिका आहे—सीमा सुरक्षित नाही, कारण भ्रष्टाचारानेच तिची भिंत पोखरली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेसच्या राजकारणात एक मूलभूत कमतरता स्पष्ट दिसते—त्यांना स्वतःचा मतदार कोण आहे हेच ठाऊक नाही. मालेगाव असो की मुंब्रा, लोकसंख्या वाढली की काँग्रेसचा पाया ढासळतो आणि स्थानिक मुस्लिम पक्ष पुढे येतो. इतिहासातही हेच दिसले; खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला तरी फाळणीच्या वेळी मुस्लिम समाजाने काँग्रेसला साथ दिली नाही, तर मुस्लिम लीगच्या मागे उभा राहिला.आजही काँग्रेस टिपू सुलतानाला शिवाजी महाराजांच्या समकक्ष आणण्याचा प्रयत्न करते, पण ही लाचारी मुस्लिम मतदारांना आकर्षित करत नाही. उलट लोकसंख्या वाढली की ते पटकन काँग्रेसला सोडून देतात. इतक्या वर्षांच्या अनुभवातूनही काँग्रेसला ही राजकीय वास्तवता समजलेली नाही. त्यामुळे ते वारंवार उत्तेजित होतात आणि फटके खातात.
🔽


Comments