top of page

जर भारताविरुद्ध आतंकी कारवाया करणाऱ्यांना...

  • dhadakkamgarunion0
  • Apr 9
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जर भारताविरुद्ध आतंकी कारवाया करणाऱ्यांना थेट ७२ हूरांच्या भेटीला पाठवणारे ' अज्ञात ' पाकिस्तानांत कामाला लावले जाऊ शकतात;तर मग हातपाय मोडून ठेवणे,थोबाड सुजवणे या सारखे इलाज केल्याशिवाय अजिबात सुधारणार नाहीत आणि खोटे आरोप करणे थांबवणार नाहीत अशा व्यक्तींना योग्य तो धडा शिकवणारे,कमी घातक परंतु परिणामकारक असे कोणी " अज्ञात " भारतात मिळू शकणार नाहीत का? हाताबाहेर चाललेल्या नीच कारवायांचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी कोणी तरी अशी अज्ञातांची फलटणच्या फलटण देशभर कुठेही वापरण्यासाठी कामाला लावण्याची सख्त गरज आता सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा वाटू लागली आहे. माफ करणे पुरे झाले,आता साफ करणे सुरू व्हायला हवे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिका-इराण युद्ध थांबताच दोन गट उसळले — एक म्हणतो पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि भारत मागे पडला, दुसरा म्हणतो भारत विश्वगुरू असल्याने बाजू व्यवस्थित राखली. दोन्ही गटांनी वास्तव समजून घ्यावे. इस्रायल-पॅलेस्टाईन, हाँगकाँग, कोरिया — कुठेही भारताची भूमिका निर्णायक नसते. "जस्ट पॅलेस्टाईन" सारखी निसरडी वाक्ये हेच आपले परराष्ट्र धोरण आहे. इतरांच्या संकटात आपण तटस्थ राहतो म्हणून आपल्या संकटात कोणी धावत येत नाही — काश्मीरवर एकटे पडण्याचे हेच कारण आहे. पण भारताची खरी ताकद आहे ती साडेसतरा टक्के जागतिक मानवता आणि ८५ कोटींची बाजारपेठ. भर युद्धातही आपली जहाजे चालतात, कारण जगाला भारत हवा आहे — नेता म्हणून नाही, ग्राहक म्हणून. विश्वगुरूपणाचा भ्रम सोडा, या वास्तवाचा ताकदीने वापर करा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

तणावपूर्ण वातावरणात समाजाच्या नावाखाली सोशल मीडियावर धंदा मांडणाऱ्यांची संख्या वाढतेय. त्यातलाच एक म्हणजे बाळ्या आवारे — ज्याने "धर्मप्रतिष्ठान" पेजच्या आडून महाराष्ट्रभर पुतळे बसवण्याचा उद्योग सुरू केला. मनोज जरांगेंचे नाव, फोटो आणि "गुरू" हा शब्द वापरून वातावरण निर्मिती केली. चिखला गावात मध्यरात्री पुतळा बसवून राडा झाला, आणि लगेचच "महिलेचे कपडे फाडले" अशी खोटी आवई पसरवली गेली. व्हिडिओत वास्तव वेगळे होते — पण वंजारी समाजाला व्हिलन ठरवण्याचे काम झपाट्याने झाले. गावचा छोटा वाद अख्ख्या महाराष्ट्रात पेटवला गेला. दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक भाषणे झाली. समाजाची भावना हे इथे साधन आहे — उद्दिष्ट वेगळेच आहे. या खेळाला ओळखणे आता नागरिकांची जबाबदारी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

समरजीत घाटगे यांची राजकीय कारकीर्द म्हणजे पक्षांतराचा एक न संपणारा खेळ आहे. भाजप, तुतारी, पुन्हा भाजप — प्रत्येक बदलाचे खापर मात्र कार्यकर्त्यांवर फोडले जाते. उद्दिष्ट एकच — कागलमधून आमदार होणे. पण हसन मुश्रीफांसारखा सहावेळा निवडून आलेला, मंत्रिपदावर असलेला नेता समोर असल्याने घाटगेंचा मार्ग सोपा नाही. सत्तेशी संघर्ष नको, पण आमदारकी हवी — हाच घाटगेंचा अंतर्विरोध आहे. एकाच म्यानीत दोन तलवारी बसत नाहीत, तसेच एकाच मतदारसंघात दोन महत्त्वाकांक्षी नेते मनाने एकत्र येत नाहीत. भाजप २०२९ च्या दृष्टीने स्वबळाची तयारी करत असताना घरवापसी करणाऱ्यांना पायघड्या अंथरत आहे. घाटगेंची भाजपवापसी त्याचाच भाग आहे. २०२९ मध्ये काय होईल हे वेळच सांगेल — पण कागलची आमदारकीची महत्त्वाकांक्षा घाटगे कधीच सोडणार नाहीत, हे मात्र नक्की!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

व्हीलचेअरवरून राज्यसभेत आलेले शरद पवार, अडखळत्या शब्दांनी शपथ घेताना पाहून मन जड झाले. ज्या पवारांनी दशकानुदशके महाराष्ट्राचे राजकारण आपल्या एका इशाऱ्यावर चालवले, त्यांना आज शपथेसाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागली — हे दृश्य केवळ दुःखद नाही, तर विचार करायला लावणारे आहे. शरीर साथ देत नाही, आवाज थरथरतो, तरी सत्तेची खुर्ची सुटत नाही. अशा अवस्थेत राज्यसभेत महाराष्ट्रासाठी ते काय भूमिका बजावणार, हा प्रश्न रास्त आहे. सत्तेची ओढ समजण्यासारखी असली, तरी ती आता स्वतःच्या प्रतिमेला धक्का देत आहे. एक थोर नेता म्हणून स्मरणात राहायचे असेल, तर निवृत्तीचा निर्णय स्वतः घ्यावा लागेल. तरुण पिढीसाठी वाट मोकळी करणे — हाच खरा वारसा ठरेल. राजकारण की वारसा, या प्रश्नाचे उत्तर पवारसाहेबांनाच द्यायचे आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page