[ पंचनामा ]
==================
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ युक्ती दिवसाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा
● ‘आग्र्यात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, तिथे शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे शिवस्मारक पाहण्यासाठी ताजमहालपेक्षा अधिक लोक नाही आले, तर नाव बदलून ठेवा, असेही ते म्हणाले. आग्र्यातील रामसिंगची कोठी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. ती कोठी आज 'मीना बाजार' या नावाने ओळखली जाते. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकार ही जमीन अधिग्रहीत करेल आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारेल. मी स्वत: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी यासंदर्भात बोलेन. एकदा तिकडे स्मारक होऊ द्या, आईशप्पथ घेऊन सांगतो, ताजमहालपेक्षा जास्त लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्य स्मारक पाहण्यासाठी येतील.’ तसेच महाराष्ट्र सरकार औरंगजेबाच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेचा दिवस 'युक्ती दिवस' म्हणून साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments