top of page
  • dhadakkamgarunion0

गोंधळ हा महाआघाडी सरकारच्या कारभाराचा स्थायीभाव आहे..

*@ABHIJEETRANE(AR)*

गोंधळ हा महाआघाडी सरकारच्या कारभाराचा स्थायीभाव आहे.. मग तो विषय संचारबंदीच्या निर्बंधांचा असो की मराठा आरक्षणाचा .. मुख्यमंत्री अनुनभवी असले तरी बाकी काँग्रेस व राष्ट्रवादी मंत्री तर वर्षानुवर्ष मंत्री होते.. मग ते सल्ला देत नाहीत की उद्धवजी ऐकत नाहीत की हे मंत्री उद्धव ठाकरे यांची फजीती व्हावी आणि ते व शिवसेना अपयशी सिद्ध व्हावेत म्हणून मुद्दाम गोंधळ निर्माण होऊ देतात ???

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

एल्गार परिषदेला कोरोनाचे कारण पुढे करुन नाट्यगृहात आयोजन करण्यास पुणे पोलीसांनी नकार देत असताना त्याच त्याच त्याच नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग दररोज होत आहेत त्यांना परवानगी कशी आहे याचा खुलासा करायला हवा होता की नाही ? भाजपा सत्तेवर असताना भीमा कोरेगाव येथे एल्गार परिषद होऊ शकते पण सेक्युलर महाआघाडी सरकार परवानगी नाकारते ह्यावर संयोजक निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी निषेध व्यक्त करायला हवा!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

राहुल गांधी यांचे कृषी कायद्याविरुद्धचे आंदोलन काहीतरी केल्यासारखे दाखवायचे म्हणून केल्यासारखे वाटले. मोदी आणि आंदोलक दोघेही कृषी कायद्यांचा पुरस्कार आणि तिरस्कार याचे दर्शन / प्रदर्शन घडवण्यासाठी दिल्लीत 'मेगा इव्हेंट' मल्टिप्लेक्स मल्टीस्टार मल्टीडायमेन्शनल स्टाईलने गेले महिनाभर लाईव्ह कव्हरेज घेत असताना राहुल गांधी यांचा "शो" म्हणजे "तंबूतला तमाशा" ठरला. इतक्या उशीरा आंदोलन हा प्रकार "वरातीमागून घोडं आणि गावामागून येडं" यातला वाटला!!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

मराठी न्यूज चॅनेल्स पुढील नवा पेचप्रसंग:

महाआघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली तर तीन घटक पक्षांचे मातब्बर नेते अक्षरश: संपादकांना धमक्या देत शिवाय चॅनेल्सच्या मालकांवर दबाव आणून शरण आणतात किंवा चक्क काढून टाकायला लावतात.. अलीकडेच अनेक चॅनेल्सचे सूत्रधार संपादक यामुळेच बदलले गेले .. हे कमी की काय म्हणून या तीन पक्षांचे कार्यकर्ते सोशल मिडीयावर अश्लील अर्वाच्य शिविगाळ करीत तुटून पडतात. शिवाय महाआघाडी समर्थक दर्शक चॅनेलवर अघोषित बहिष्कार टाकून टीआरपी कोसळवून टाकतात. मग मराठी न्यूज चॅनेल्स भाजपा बाबतीत तरी भूमिका घ्यायला स्वतंत्र आहेत का? याचेही उत्तर "नाहीत" असेच आहे. दबाव आहे पण स्वरूप वेगळे. महाआघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे टाॅप"चे नेते हस्तक्षेप करतात तर चॅनेल्स जरी महाराष्ट्रातील असले तरी भाजपच्या दबाव आणि संपादकां विरूद्धच्या मालकांकडील तक्रारींची सूत्रे थेट "दिल्ली"तील दरबारातून विशेषतः मिडीयावर वाॅच ठेवणा-या समूहाकडून माॅनिटर केली जाते. प्रत्येक मराठी न्यूज चॅनेलसाठी माॅनिटर करणारी स्वतंत्र टीम असते आणि ती भाजपाच्या बाजूने किंवा विरूद्ध कव्हरेजचे व महाआघाडीतील नेत्यांचे/ पक्षांचे कव्हरेजचे रिपोर्ट तयार करून "हेडक्वार्टर"ला पाठवते आणि "लक्ष्मण रेषा" ओलांडल्यावर चॅनेल्सना इशारे, तंबी, धमकी आणि कारवाई प्रक्रिया सुरू होते. भाजपा समर्थक टीआरपी खाली किंवा वर समूह संदेशवहन यंत्रणेतील सूचनांनुसार करतात हे देखील खरे. यात मराठी न्यूज चॅनेल्सची गोची अशी झाली आहे की बहुसंख्य ख-या दर्शकांना राज्यात महाआघाडी सरकार किंवा केंद्रीय भाजप सरकार यांच्या बाजूने भूमिका घेतलेली आवडत नाही. त्यांचा आग्रह इच्छा दबाव चॅनेल्सवर सर्व सरकारांची "वाजवा" तर आम्ही चॅनेल्स पाहू अशी असते म्हणून मग या "त्रिकोणी" दबावात चॅनेल्सची "तंतरते" आणि संपादकांची "फाटते" !!

www.abhijeetrane.in


2 views0 comments

Comments


bottom of page