गाझामधील दोन वर्षांची रक्तरंजित लढाई अखेर संपली,
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 2 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
गाझामधील दोन वर्षांची रक्तरंजित लढाई अखेर संपली, पण किंमत अमानुष होती. हमासने फक्त २० इस्रायली बंधक सोडले, बाकी मुलं महिला निर्दयपणे ठार मारले. जर त्यांनी आधीच सर्वांना मुक्त केले असते तर गाझातील ६८,००० जीव वाचले असते, २०,००० मुलं मृत्यूला बळी पडली नसती, लाखो अपंग झाले नसते. आज गाझा ९०% उद्ध्वस्त, जमिन सपाट, गवतही उगवणार नाही. रावण पाळला तर लंका जळतेच—त्याची किंमत गाझाने चुकवली. ५७ देश पाहत राहिले, कोणी काही करू शकले नाही. इस्रायली IDF आणि मोसादने जगभरातील हमास नेटवर्क संपवून स्पष्ट संदेश दिला—इस्रायलकडे वाकड्या नजरेने बघाल तर शेवट हाच होईल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्राजक्त तनपुरे अर्थात जयंत पाटील यांचे सख्खे भाच्चे आता भाजपावासी झाले आहेत. २००७ मध्ये नागपूर जिल्ह्यातील 'राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना' अत्यंत कमी किमतीत 'प्रसाद शुगर' या खासगी कंपनीने लिलावात खरेदी केला, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला होता. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात कोणतीही फसवणूक किंवा घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' सादर केला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये सत्र न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला. मुख्य गुन्हाच बंद झाल्यामुळे, एप्रिल २०२६ मध्ये मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत काम करणाऱ्या विशेष न्यायालयाने प्राजक्त तनपुरे, त्यांचे वडील प्रसाद तनपुरे आणि इतर सर्व आरोपींना या प्रकरणातून पूर्णपणे दोषमुक्त केले आहे.थोडक्यात यावेळी आधी वॉशिंग मशीन मध्ये धुवून साफ करून मग पक्षात घेतले आहे. अर्थात भाच्यावर मामा फ्री अशी योजना असू शकते. जयंतराव पाटील यांची पावले सुद्धा भाजपाची वाट चालत असल्याची वार्ता असून आता गोपीचंद पडळकर कुणावर टीका करतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्ता वाटपाचा खेळ आता उघडपणे दिसतोय. सुरुवातीला हायकमांडने सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठीच डी.के. सतत दिल्लीला जाऊन गांधी फॅमिलीला आठवण करून देत होते. अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, पण सिद्धरामय्या नाराज दिसत आहेत. राजीनामा देताना त्यांनी “हायकमांडने सांगितले म्हणून दिला” असे म्हणत थेट जबाबदारी टाकली. जवळपास ९० आमदारांनी त्यांना सपोर्ट केला होता, तर डी.के.कडे फक्त ४५ आमदार होते. आता डी.के. मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रिमंडळ बदलणार हे निश्चित. जातीय समीकरणात ओबीसी सिद्धरामय्या हटवून वोक्कलिगा डी.के. आणल्याचा संदेश काँग्रेसला महागात पडू शकतो. ही पावरटसल पक्षासाठी आत्मघात ठरू शकते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने ६०० कोटींचा आराखडा मंजूर करून आतापर्यंत १९५ ते २३० कोटी निधी दिला आहे. तरीही किल्ल्यावर साधे शौचालय नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. इतका पैसा कुठे खर्च झाला याचा हिशोब जनतेसमोर नाही. CAG किंवा CA मार्फत ऑडिट झाले का, याची माहितीही अस्पष्ट आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष IAS अधिकारी न ठेवता खासदार संभाजीराजे यांना नेमणे हा राजकीय निर्णय होता. फडणवीस यांनी सत्ता टिकवण्यासाठी जसे महापौर बंगला उद्धव ठाकरेंना दिला तसेच रायगड प्रकरणात युवराजांना खुर्ची दिली. करोडो रुपये दिले तरी पारदर्शकता नाही. जनतेला हक्काचा हिशोब हवा आहे. रायगड हा शिवराज्याचा गड आहे, तो भ्रष्टाचाराचा गड होऊ नये.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बंगालमध्ये सत्ता बदलल्यानंतर ममतांचे कारनामे उघड झाले तसेच महाराष्ट्रातही प्रशासन कडक झाले तर अनेक बेकायदेशीर व्यवहार बाहेर येतील. फक्त तीन दिवसांत ३३ लोक जेलमध्ये गेले, ५३ भेसळीचे छापे पडले. मग संपूर्ण महाराष्ट्रात काय चालले असेल याची कल्पना करा. पेण तालुक्यातील PWD कारभार तपासायचा असेल तर #भुंड्या पुलाची चौकशी करा, तेव्हा खरे चित्र दिसेल. नकली दिव्यांगांचा वापर करून स्थानिक आकांना खूष केले गेले, प्रमोशन देऊन सरकारने दिलदारपणा दाखवला. या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप तपासल्या तर भ्रष्टाचाराचे जाळे स्पष्ट होईल. जनतेला पारदर्शकता हवी आहे, अन्यथा प्रशासनाचा भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या पतनाला कारणीभूत ठरेल.
🔽



Comments