top of page
dhadakkamgarunion0

खुळ्यांचा कारभार ! वेड्यांचा बाजार !

*@ABHIJEETRANE(AR)*

मल्याचा घोटाळा नऊ हजार कोटी रुपयांचा..

फ्रान्समध्ये ईडीकडून जप्त मालमत्ता 14 कोटी रूपयांची..

सरकार छाती फुगवून डिंग मारते आहे..

मिडीया ढोल बडवून ब्रेकींग न्यूज करतो आहे..

खुळ्यांचा कारभार !

वेड्यांचा बाजार !

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

नऊ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. सुनावणी म्हणजे निकाल नव्हे. सुनावणी होणार आहे हे ठीक पण मराठा समाजाला सुनावणी वर्षानुवर्ष लांबली तरी फरक पडत नाही पण पण पण.. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे ती तात्काळ उठलीच पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. पुन्हा स्थगिती कायम ठेवून जर सुनावणी होणार असेल तर उडणारा आंदोलनाचा भडका अनावर अनन्यसाधारण ज्वालामुखीच्या उद्रेकासारखा आणि राजकीय भूकंप घडवून आणणारा असेल. महाआघाडी सरकारने नियमित व रितसर सुनावणी आधी स्थगिती उठविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे अन्यथा सुनावणीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लोंबकळत राहील आणि स्थगितीमुळे उदभवलेला पेचप्रसंग दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील संघर्षाच्या वळणावर मुंबईच्या घेराबंदीत रूपांतरित होईल !! अशोक चव्हाण आशा दाखवत आहेत पण जर ही आशा निराशेत गेली तर नायक व्हायला निघालेले अशोक चव्हाण खलनायक ठरतील!!

www.abhijeetrane.in





*@ABHIJEETRANE(AR)*

मराठी विकास महामंडळ कर्नाटक सरकारने स्थापन केल्याच्या निषेधासाठी आज कर्नाटक बंद करण्याची घोषणा विरोधी पक्षांनी केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा विकास महामंडळ आहे तोच फाॅरम्युला घेऊन हे मराठी विकास महामंडळ कर्नाटकच्या भाजपा सरकारने स्थापन केले आहे. आश्चर्य म्हणजे या महामंडळाला कर्नाटकात विरोध करणा-यांमध्ये काँग्रेस आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी कर्नाटक मधील काँग्रेसवाल्यांना समजवायचा का प्रयत्न केला नाही? अजून करीत नाहीत? महाराष्ट्रात काँग्रेस मराठी समाजाच्या बाजूला आणि कर्नाटकात विरोधात ही काय विसंगती आहे याचा जाब महाराष्ट्रातील मराठी भाषिक आंदोलकांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना विचारायला हवा !!

www.abhijeetrane.in




*@ABHIJEETRANE(AR)*

हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांना लस घेण्याआधीच कोरोना झाला होता आणि लस घेतली तरी तो बरा झाला नाही अशी त्यांची तक्रार आहे ती अनाठायी आहे कारण लस होऊ नये म्हणून.. आधी घेण्यासाठी असते .. लस झालेला कोरोना बरा करण्यासाठीचा उपाय नाही नाही नाही.. या चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या विधानामुळे लसीकरण मोहीमेला अविश्वासाचा फटका बसू शकतो हे निदान आरोग्य मंत्र्यांनी आणि मिडीयाने लक्षात घ्यायला नको काय?

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

शरद पवार साहेबांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीची खिल्ली उडवली आणि प्रश्नचिन्ह निर्माण केले याबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांना यशोमती ठाकूर यांना संताप आला आणि 'आमच्या नेत्यांबद्दल सांभाळून बोला, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादी मंत्र्यांना काही बोलू शकतो " असा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की.. "हे तीन पक्ष फक्त सत्तेपुरते एकत्र आहेत, मनाने विचाराने हेतूने ते परस्परविरोधी भूमिका घेऊन नाईलाजाने महाआघाडी सरकार चालवतात" ते खरे आहे!

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

हैदराबाद महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या अभूतपूर्व यशामुळे राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनल्सवरून महाराष्ट्रातील विधानपरिषदेचे निकाल हा विषय नाहिसा झाला होता. बातम्यांचा जीव अलिकडे काही तास असतो. नवीन ब्रेकींग न्यूज आली की आधीच्या मागे पडतात. राजकीय नेत्यांनी अनुकूल किवा प्रतिकूल बातम्या म्हणूनच मनाला फारशा लावून किंवा गंभीरपणे घेऊ नयेत असे मला वाटते!!

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

शेतातील पालापाचोळा जाळल्यामुळे होणा-या धुराची आणि प्रदूषणाची चर्चा सर्वत्र आहे पण मी अलीकडे महाबळेश्वर येथे गेलो होतो तेव्हा लक्षात आले की तिथे देखील शेतकरी जो राब पालापाचोळा जाळतात त्यामुळे स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांची सकाळी सकाळी प्रचंड घुसमट धुक्यात दाट मिसळलेल्या धुराची चादर अख्ख्या हिलस्टेशनला व्यापून उरल्यामुळे होते. मुंबई आणि इतर महानगरात वाहनांमुळे आणि उद्योग धंद्यांमुळे होते तसेच प्रदूषण शेतीतील जाळपोळीने अनेक ठिकाणी होते पण चर्चा फक्त दिल्लीतील प्रदषणाची होते.. असे का ?

www.abhijeetrane.in


*@ABHIJEETRANE(AR)*

सात कोटी रुपयांचा "ग्लोबल टीचर" पुरस्कार मिळवणा-या रणजित सिंह डिसले यांची पारितोषिक मिळाले त्या क्षणाची आईवडीलांसोबत बसून दिलेली जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व न्यूज चॅनल्सवर दाखवली त्यात त्या घोषणेच्या क्षणी ते ज्या प्रकारे टीव्ही वर पाहून किंचाळल्यासारखे ओव्हर एक्सायटेड वागताना दाखवले तो प्रकार अपरिपक्व बालीश उथळ अतिशयोक्त आणि पोरकट वाटला.. हास्यास्पद देखील! ग्लोबल टीचर म्हणून सात कोटी रुपयांचा नोबेल सदृश्य पुरस्कार देण्यात येतो तेव्हा ती व्यक्ती धीरगंभीर पोक्त परिपक्व उदात्त आणि वलयांकित महान महागुरू सारखी स्थितप्रज्ञ वाटली, असली, दिसली पाहिजे.. रणजित सिंह डिसले मोठे 'गुरू' असतीलच पण महान महागुरू होण्यासाठी त्यांना अजून बरीच तपश्चर्या करावी लागेल..!

www.abhijeetrane.in



4 views0 comments

Comments


bottom of page