top of page
dhadakkamgarunion0

काय पटते आहे ना मी काय म्हणतोय ते ??

*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्रात एकचालकानुवर्ती राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांची परंपरा आहे..

इतिहासात पहिल्यांदाच अपवाद ठरते आहे..

मराठा आरक्षणाचे आंदोलन.. !

सामूहिक नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनाने नवा अध्याय सुरू केला आहे..

"प्रत्येक कार्यकर्ता - हा नेता"

आणि

"एक मराठा - लाख मराठा"

ही द्विसूत्री या आंदोलनाचा पाया आहे !!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात प्रभुत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राहिले तरी वर्चस्व विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे राहिल असे मला वाटते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाने शोभेचा तर दुस-याने पूजेचा "गणपती" म्हणून भूमिका घेऊन रहायचे असे ठरविले असावे. देवेंद्र फडणवीस यांच्यात "माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि भावी मुख्यमंत्री" अशा त्रिमूर्तींचे अवतार - अविष्कार आढळतात जे सभागृहात आणि सभागृहा बाहेरही प्रगटताना वारंवार वेळोवेळी दिसतात. विद्यमान विधीमंडळाच्या अधिवेशनात फडणवीस विरुद्ध संपूर्ण महाआघाडी मंत्री मंडळ असा सामना रंगलेला दिसू शकतो !!

www.abhijeetrane.in



 


*@ABHIJEETRANE(AR)*

विधीमंडळ अधिवेशनात कामकाज करण्यापेक्षा आरोप - प्रत्यारोप आणि दबंग - वादंगाचा गदारोळ उडविणे ह्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना सामायिक - सामूहिक स्वारस्य असल्याने या अधिवेशनातून काही सकारात्मक किंवा विधायक विकासात्मक फलश्रुती होण्याची अपेक्षा न ठेवलेलीच बरी !!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

अंबानी आणि अदानी यांच्यावर शेतकरी आंदोलनातील संघर्षाचा एक भाग म्हणून बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

मी जी माहिती घेतली त्यावरून अंबानी आणि अदानी जगभरातील अनेक देशात अग्रगण्य आहेत.

भारतात होणारा राजकीय विरोध..

आणि एकेकाळी "टाटा-बिर्ला" यांच्या विरोधात..

जसे बदनामीकारक आणि गुन्हेगारी आरोप शिवीगाळीसारखे..

तत्कालीन काँग्रेसच्या केंद्र सरकारवर केले जात..

तसे आज भाजपाच्या सरकारवर केले जात आहेत. टाटा-बिर्लांऐवजी आता अंबानी-अदानींना सर्व प्रकारच्या अधःपतन अवमूल्यन आणि अव्यवस्थेला जबाबदार धरले जाते आहे.

"कुठल्या तरी बड्या औद्योगिक घराण्याचे हितसंबंध जपण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे" हा विरोधकांचा परंपरागत आरोप गोरगरिबांना, जनसामान्यांना पटकन पटतो आणि राग द्वेष वैफल्य संताप चीड मत्सर या भारतीयांच्या मनातील श्रीमंतां बाबतच्या भावना उफाळून येतात ..

म्हणून अगदी पंतप्रधान नेहरूंच्या काळापासून उद्योगपती घराण्यांना दोषी ठरवण्याची परंपरा आज मोदी युगात देखील कायम आहे.

अंबानी आणि अदानी जगभरातील अनेक देशात आपले आर्थिक साम्राज्य घेऊन..

भारतातील सर्व व्यवहार कायमचे स्थगित करून..

स्थलांतरीत झाले तर आर्थिक नुकसान अंबानी आणि अदानी यांचे किती होईल ?

आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे किती ?

याचाही ताळेबंद बहिष्कार आंदोलनांच्या नेत्यांनी, अर्थतज्ञांशी विचारविनिमय करून घेतला पाहिजे.

अंबानी आणि अदानी यांच्यावाचून भारताचे अडते की भारतावाचून अंबानी आणि अदानी यांचे अडते ..

हे एकदा भारतीयांना कळायला हवे.

शिवाय अंबानी आणि अदानी यांचे निर्मूलन केले तरी ..

कुणा दुस-या उद्योगपतींचे सरकार मिंधे असल्याचे आरोप विरोधी पक्ष नेते केल्याशिवाय रहाणार नाहीत हे नक्की नक्की नक्की!!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

दिल्ली भोवती वेढा घालून नाकेबंदी करणा-या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ज्या कारवाया पोलीस आणि निमलष्करी दलांच्या बळावर केल्या म्हणून महाआघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोदी सरकारला दोष देत आहेत..

त्याच प्रकारच्या.. तशाच.. प्रतिबंधक उपाय योजना मराठा मोर्चाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी महाआघाडी सरकार स्वतः करीत आहे हे लक्षात येते आहे का तुमच्या ? कोणीही कोणाला दोष देऊ शकतो पण स्वतःवर वेळ आली की तसाच वागतो हे चिरंतन सत्य आहे.. विशेष म्हणजे हे कटू सत्य सरकारबाबत जेवढे खरे आहे तेवढेच ते तुमच्या आमच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात देखील घडते हे आत्मपरीक्षण केले तर लक्षात येईल.. म्हणूनच जे घडते ते बिघडते आहे !!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

न्यायालयीन लढाई गाफीलपणा आणि निष्काळजीपणा यामुळे हरल्यामुळे आता ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अत्याचार, दडपशाही करण्याची वेळ आली आहे ह्या विधानाशी आपण सहमत आहात का?

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

दिल्ली भोवती वेढा उठविण्यासाठी बळाचा निर्दयपणे वापर करण्यापेक्षा ट्रॅक्टर रॅली निघण्याआधीच आठ दिवसांपासून जर पंजाब हरियाणा मधील सर्व डिझेल - पेट्रोल पंप बेमुदत बंद करून ठेवले असते तर.. ? पुढील अनेक अनर्थ टळले नसते काय? जे तुम्हा-आम्हाला सुचते ते शहाणे - अति शहाणे - दीड शहाणे यांचा भरणा असलेल्या सरकारांना का बरे सुचत नसावे ?

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

अजितदादांनी मंत्रालय परिसरात घातलेली जीन्स वापरण्यावरील बंदी नुसती उठवली नाही तर तो निर्णय चुकीचा होता अशी कबुली दिली ह्या बद्दल त्यांचे अभिनंदन! जीन्स पँट ही कॅज्युअल वेअर आहे, फाॅर्मल नाही हे खरे आहे पण जीन्समुळे माणसे अधिक स्मार्ट दिसतात यात शंकाच नाही. पुरूषांच्या जीन्स घालण्यापेक्षा स्रियांच्या जीन्स घालून येण्याबाबत मंत्री / सरकार.. म्हणून अजितदादा वेगळी भूमिका घेऊच शकत नाहीत.. घेऊही नये.. पण पण पण.. अनेकांनी माझ्यापाशी असे मत व्यक्त केले की " अनेक पुरूष जीन्समुळे स्मार्ट वाटतात पण पण पण कित्येक स्रिया जीन्समुळे ×× वाटतात हा फरक लक्षात घेऊनही समानतेच्या तत्वात अशी भूमिका स्री चळवळीतील महिला कार्यकर्त्यांना आक्षेपार्ह वाटणार यात शंकाच नाही त्यामुळे अजितदादांनी सरसकट सगळ्या स्री पुरूषांना मंत्रालयात जीन्सची परवानगी दिली हेच योग्य झाले पण जीन्सवर महिला कशा प्रकारचे टाॅप्स घालतात याला महत्व असेल जे पुरुष कर्मचारी यांना महत्वाचे ठरणार नाही हे नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मिडीया वर साधकबाधक चर्चा व्हायला हवी !!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE(AR)*

महाआघाडी मंत्रीमंडळाच्या फेरमांडणीची .. काही मंत्र्यांना काढण्याची.. काही नवीन घेण्याची गरज आहे यात शंका नाही आणि ऑफ दि रेकाॅर्ड या मुद्द्यावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सहमती देखील आहे. मग फेररचना केली का जात नाही ? तर त्याचे खरे उत्तर असे की महाआघाडी मंत्रीमंडळात प्रारंभी जे मंत्री केले त्यांचे उपयुक्तता मूल्य नव्हे तर उपद्रव मूल्य लक्षात घेऊन मंत्री केले. मंत्री म्हणून वर्षभर काम केल्यावर आणि राजकीय मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ जमविल्यावर या मंत्र्यांची उपद्रवशक्ती आता अधिकच वाढली आहे. मंत्रीपदावरून काढले तर आमदारकीचा राजीनामा देत, सरकार पाडून ते बंडखोर भाजपा मध्ये जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी "जैसे थे" .. 'स्टेटस् को" ठेवणे ठाकरे पवार थोरात यांना सक्तीचे आहे अन्यथा निम्म्याहून अधिक मंत्री प्रशासकीय पातळीवर अपयशी आणि महाआघाडी सरकारला 'असेट' न ठरता 'लायबलिटी' झाले आहेत हे जगजाहीर वास्तव आहे..!! काय पटते आहे ना मी काय म्हणतोय ते ??

www.abhijeetrane.in




2 views0 comments

Comments


bottom of page