top of page
dhadakkamgarunion0

कुणालाच कुतुहल नसलेला महाराष्ट्राचा अर्थ संकल्प आज 24 तासात पूर्णत: दुर्लक्षित झाला आहे.

*@ABHIJEETRANE(AR)*

कुणालाच कुतुहल नसलेला महाराष्ट्राचा अर्थ संकल्प आज 24 तासात पूर्णत: दुर्लक्षित झाला आहे. ना जमेत.. ना खर्चात !


 

*@ABHIJEETRANE(AR)*

एटीएस कडून तपास एन आय ए कडे गेल्यावर तुम्हाला अनपेक्षित पण मला अपेक्षित "व्यक्ती विशेष" संशयीत आरोपी म्हणून एन आय ने पिन पाॅईंट केली तर मला आश्चर्य वाटणार नाही नाही नाही !


 

*@ABHIJEETRANE(AR)*

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महाराष्ट्रातील डाॅक्टर्स, सरकारी अधिकारी - कर्मचारी, महापालिकांमधील सेवक इत्यादिंच्या नावानिशी याद्या प्रसिद्ध झाल्या, त्यांना नुकसानभरपाई देखील मिळाली. महाराष्ट्रातील पत्रकार परिषद, संघटना, संघ यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्व पत्रकारांची तपशीलवार माहिती मिळवून त्यांना शासनाची आश्वासित भरपाई मिळाली / मिळवून दिली का? याची माहिती कोण कुठे कशी देईल? नरेंद्र वाबळे यांनी या कामी पुढाकार घेऊन यादी आणि भरपाई यांचे तपशील मिळवून जाहीर करावेत ही माझी विनंती!!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

जे सरकार ,लोकांना नको असताना, त्यांचे "कल्याण" कशात आहे, हे स्वतःच परस्पर ठरवून, तथाकथित "कल्याणकारी" कायदे किंवा उपाययोजना लादते त्या सरकारबाबत लोकांच्या मनातील चीड राग संताप प्रक्षोभ कसा केव्हा कुठे व्यक्त होईल सांगता येत नाही पण तो व्यक्त झाल्याशिवाय रहात नाही एवढे नक्की ! सनदशीर निवडणूकांच्या माध्यमातून तो क्रोध प्रगट झाला तर ठीक.. अन्यथा उग्र आंदोलन, सर्वंकष हिंसाचार किंवा सामूहिक उठाव अशी भीषण परिस्थिती उद्भवते.. !!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन संपल्यावर मंत्रीमंडळात फेरबदल करून शिवाय खाते बदलही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील मंत्र्यांच्या संदर्भात करावा अशी सूचना किंबहुना आदेश शरद पवार साहेबांनी दिला आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा फेरबदल अस्तित्वात येईल अशी माझ्या खास विश्वसनीय मित्राकडून मिळालेली माहिती आहे. वाट पहा.. आणि अंदाज अचुक निघेल तेव्हा थक्क व्हा!!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

2014 ते 2019 या काळात महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचे युती सरकार होते आणि प्रत्येक शासकीय निर्णयाची जबाबदारी संयुक्तरित्या उभयपक्षी समान सामायिक सामूहिक होती तेव्हा फडणवीस सरकारवर केलेली प्रत्येक टीका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तेवढीच लागू पडते हे स्वतः शिवसेना विसरली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी जाणीवपूर्वक ही बाब नजरेआड करतात. विशेष आश्चर्य म्हणजे खुद्द भाजपा शिवसेनेवर पूर्वाश्रमीच्या भागीदारीमुळे तेही भाजपा इतकेच पाप-पुण्याचे वाटेकरी आहेत हा मुद्दा ऐरणीवर घेत नाहीत.. असे का ?


14 views0 comments

Comments


bottom of page