'धडक कामगार युनियन महासंघ' अंतर्गत येणाऱ्या 'धडक दिव्यांग मूकबधिर कामगार युनियन'च्या माध्यमातून महिला डब्यात ज्या पद्धतीने 24 तास पोलीस किंवा होमगार्ड नियुक्त केला असतो त्याच प्रमाणे दिव्यांग डब्यातही 24 तास पोलीस किंवा होमगार्ड नियुक्त करावा यासंदर्भात रेल्वे प्रशासनास दिलेल्या पत्रासंदर्भात मुंबई सेंट्रल येथे सिनियर डिव्हिजनल सेक्युरिटी कमिशनर एस. के. एस. राठोड यांच्या समवेत नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी धडक कामगार युनियन महासंघ कडून कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी सोबत युनीट अध्यक्ष महेश पवार उपस्थित होते.
यावर तात्काळ उपाय म्हणून एक व्हाट्सएपच्या माध्यमातून ग्रुप तयार करण्यात येणार असून, सर्व पश्चिम रेल्वेवरील स्थानकांच्या मुख्य रेल्वे पोलीस अधिकारी या ग्रुपमध्ये असणार असून त्यामाध्यमातून मूकबधिर बांधवांना थेट तक्रार करता येणार आहे त्यासाठी युनियनकडून 2 जणांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची अभिजीत राणे यांनी सांगितले.
----








Comments