कामगार नेते अभिजीत राणे यांची पोलीस उप आयुक्त महेश चिमटे यांच्याशी सदिच्छा भेट — कामगार सुरक्षेसाठी सकारात्मक चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jun 11
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज परिमंडळ 12 चे पोलीस उप आयुक्त महेश चिमटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत स्थानिक पातळीवरील कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधीच्या समस्या, त्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक अडचणी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा पार पडली. कामगारांच्या कल्याणासाठी पोलिस प्रशासन व युनियन यांच्यात समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली.





Comments