औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचे वचन!
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचे वचन!
● ‘या देशात महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही.’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ते म्हणाले आहेत की, ‘खरंतर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्रात कशाला हवी? असा प्रश्न पडेल. पण आपल्याला कल्पना आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या कबरीला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. म्हणून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, दुर्दैवाने त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे.’ पण आता महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. जर उदात्तीकरण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याचा प्रयत्न चिरडून टाकण्याचे काम आम्ही करू, असे वचन फडणवीस यांनी दिले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)



Comments