*@ABHIJEETRANE(AR)*
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर केलेला प्रत्येक आरोप काळाच्या ओघात सत्य सिद्ध होत आहे.. निखळ प्रांजळ प्रामाणिक पारदर्शक व अचूक माहिती आणि सबळ पुराव्यासह आरोप करणे हे देवेंद्रजी फडणवीस यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच हे आरोप निर्विवाद सिद्ध होत आहेत. यापूर्वी अशा प्रकारे शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते पद अशा पद्धतीने गाजवले होते आणि आज ते संरक्षक मार्गदर्शक असलेल्या महाआघाडी सरकारची त्यांच्या इतक्याच ताकदीचे शक्ती बुद्धी युक्तिवाद चतुर विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून चिरफाड होत आहे हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
एन् आय ए ने कोणाला एक्स्पोझ केले आहे असे वाटते ? सचिन वाझे ? की त्यांचे समर्थन करणा-या नेत्यांना?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
एन् आय ए ने ज्यासाठी त्यांना राज्य सरकारच्या परवानगीची गरज नव्हती अशा स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास करीत राज्य सरकारला अडचणीत आणणारे किती स्फोटक गौप्यस्फोट केले ती बाब थक्क करणारी आहे. महाराष्ट्र सरकारच्या एटीएस कडे तपास राहिला असता तर हे गौप्यस्फोट आणि सचिन वाझे यांना अटक झाली असती काय?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
सचिन वाझे यांनी केलेले 65 एन्काऊंटर वादग्रस्त होते. मनसुख हिरेन हा 66 वा एन्काऊंटर होता काय? या आधीच्या 65व्या अतिरेकी ख्वाजा युनुसच्या एन्काऊंटरमध्ये देखील त्यांना अटक, 17 वर्षांचे निलंबन भोगावे लागले होते हा योगायोग म्हणावा काय?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मराठी मिडीया सचिन वाझे यांच्या समर्थक संरक्षक पक्ष नेत्यांच्या दबावाखाली किंवा त्यांना दुखवायला नको म्हणून एन आय ए कडून मिळणारी माहिती 90% दडवून बातम्या सांभाळून देत आहे असे इंग्रजी आणि सोशल मिडीयावरील गौप्यस्फोट मालिका वाचताना लक्षात येते.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
इंग्रजी मिडीयात सचिन वाझे यांनी काही आय पी एस अधिकारी, ठाण्यातील एक उद्योगपती व एक विधान परिषद सदस्य यांची नावे ए एन आय कडे आपले कटातील सहकारी म्हणून घेतल्यानंतर नाहक अनेकजण संशयाच्या भोव-यात सापडले आहेत तरी ए एन आय ने ऑफिशियल ब्रिफींग करून संशय निवृत्ती करायला हवी.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
तिहार तुरुंगात ज्या अतिरेक्याकडून अंबानींना धमकीचा मेसेज गेला त्याचे सिमकार्ड जप्त करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले पण मग अंबानी प्रकरणात पुढे त्याची काय चौकशी झाली? त्यातून काय निष्पन्न झाले ? त्याच्या मेसेजशी अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे यांच्याशी काही धागेदोरे जुळत आहेत का? यावर ए एन आय चा खुलासा अपेक्षित आहे .विलंब का?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
सचिन वाझे यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण महाराष्ट्र पोलीसांना आपल्या फेसबुक पोस्ट मुळे बदनाम केले असा आरोप होत आहे . आपल्यावर 2004 आणि 2021 साली खोटे आरोप करून अडविण्यात आले होते / आहे हे विधान 65 एन्काऊंटर करणारा पोलीस अधिकारी करतो तेव्हा अशा प्रकारे खोटे सापळे पोलीस रचतात हा जो आरोप करतात ती बदनामी म्हणायची की नाही ? की ही ,अशा आशयाची विधाने भाजपा नेत्यांकडून केली तरच फक्त ती स्कॉटलंड यार्ड शी तुलना होणा-या मुंबई पोलिसांची बदनामी ठरते?
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
मनसे सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सदस्य व्हावे असे वाटतेय का तुम्हाला ? का? राज ठाकरे यांच्या क्रेझसाठी की मनसेच्या कार्यक्रम उपक्रमाच्या आणि आजपर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेऊन तुम्ही सदस्यत्व स्विकाराल ? दुसर्या कोणत्या राजकीय पक्षात असाल तर पक्षांतर करणार का? काय विद्यमान पक्षात कमी आहे म्हणून पक्षांतर कराल? मनसेत जाणार नसाल पण राजकारणात सक्रिय व्हायचे असेल तर भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी ह्यापैकी कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतो? विचार करा. व्यक्त व्हा.
◆
*@ABHIJEETRANE(AR)*
अंबानी प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य समन्वय आणि सहकार्य दिसण्याऐवजी परस्परविरोधी भूमिकेतून का विधाने आणि हालचाली व्हाव्यात? अंबानी कुटुंबीयांसमवेत ठाकरे कुटुंबीयांचे धीरुभाईंच्या काळापासून हार्दिक संबंध आहेत. अंबानी हे राहुल गांधी वगळून बहुसंख्य इतर राजकीय नेत्यांचे आश्रयदाते आहेत. मग निदान अंबानींच्या हितसंबंधाधिष्ठीत प्रकरणात का विरोधी भूमिकेत महाराष्ट्रातील नेते असावेत?
Comments