एकनाथ शिंदे यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री फडणवीस
- dhadakkamgarunion0
- Jul 6
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
एकनाथ शिंदे यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री फडणवीस
● उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावरूनच 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात नवीन राजकीय वाद निर्माण झाला. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले. आपल्या सहकाऱ्याने केलेल्या विधानावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका घोषणेचा दाखला दिला. फडणवीस म्हणाले, ‘मी आपल्याला आठवण करून देतो की. याआधी शरद पवार यांनी चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना 'जय महाराष्ट्र आणि 'जय कर्नाटक' अशी घोषणा दिली होती. मग त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर नाही, असं समजायचं का?’ फडणवीस पुढे म्हणाले, ‘आपण ज्या कार्यक्रमात जातो, त्याचसंदर्भात बोलत असतो. एकनाथ शिंदे हे गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते म्हणून त्यांनी जय गुजरात म्हटलं. याचा अर्थ असा घेता येणार नाही की, त्यांचं गुजरातवरील प्रेम वाढलं आणि महाराष्ट्रावरील कमी झालं. एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments