top of page
dhadakkamgarunion0

"उद्धव ठाकरे का बोलत नाहीत?" हा प्रश्न विचारून उपयोग नाही.!

ABHIJEET RANE (AR)

पुढील "लक्ष्य" ना.अनिल परब असतील

अशी अटकळ बांधली जात असताना

आता

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत..

पाहू या.. दिसेलच.. लवकरच !!

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

शिवसेनेला राष्ट्रवादीने केलेल्या राजकीय मदतीची परतफेड..

शिवसेनेने केली नाही..

अशी तक्रार

राष्ट्रवादीच्याच एका मंत्र्याने आत्ता माझ्याशी फोनवर बोलताना केली.

परमवीर सिंग आणि सचिन वाझे हे राष्ट्रवादी मंत्र्यांपेक्षा शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयात होते.. गेले वर्षभर दोघे कळसुत्री बाहुल्याप्रमाणे वागत होते आणि सूत्रधार उघडपणे शिवसेना मंत्री होते असे असताना "त्या" दोघांना काबूत ठेवून त्यांच्या राग-लोभाचे ताबूत थंड ठेवणे ही जबाबदारी शिवसेना नेत्यांची होती पण शिवसेना नेते मूक साक्षीदार म्हणून अगतिक हताश निष्क्रिय राहिले परीणामी सचिन वाझे पिसाटले आणि परमवीर सिंग उचकटले आणि मधल्यामध्ये बळी मात्र अनिल देशमुखांचा गेला. हे मी माझ्या मनाने लिहीत नाही तर ते राष्ट्रवादीचे मंत्री नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर बोलले ते जसेच्या तसे शब्दांकित करीत आहे. "त्या" मंत्र्यांनी तर शिवसेना मंत्र्यांची नावे घेतली पण मी फक्त शिवसेना नेते असा मोघम उल्लेख खबरदारी म्हणून इथे केला आहे.

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

संधीवात म्हणजे काय ? हे सांगताना माझे तज्ज्ञ डॉक्टर मित्र म्हणाले की :

"आपले पाळलेले कुत्रे आपल्यालाच चावावे तशा आपल्या संरक्षक पांढ-या पेशी आपल्याच शरीरातील लाल पेशींवर भक्षक बनून हल्ला करीत नष्ट करतात"

मी हसलो. म्हणालो..

"डाॅक्टर, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हेच घडते आहे. "पाळलेले" अधिकारी , "पाळणा-या" नेत्यांचा "चावा" घेत आहेत.

डाॅक्टर हसले. म्हणाले :

"याला तुम्ही राजकीय संधी(साधू)वात म्हणू शकता"

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

राज ठाकरे यांनी नजीब मुल्ला या राष्ट्रवादी नगरसेवकावर मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत सुपारी देऊन सहभागी असल्याचा पुरावा उत्तर प्रदेश पोलीसांनी दिल्याबद्दल स्फोटक विधान केले आहे. हे प्रकरण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नजीब त्यांचे निकटवर्तीय मानले जात असल्यामुळे उपद्रवकारक ठरेल असे मिडीयात म्हटले जात आहे.

पण हे खरे नाही.

बिलकूल नाही.

अजिबात नाही.

नजीब मुल्ला दोन वर्षांपासून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आहेत.

नजीब उघडपणे आव्हाड यांच्यावर आरोप करीत, आव्हान देत विधानसभा निवडणुकीत मुंब्रा कळवा मतदारसंघातून आव्हाडांविरूद्ध शिवसेनेचे तिकीट घेऊन उभे रहायला तयार होते.

2019 साली 80 तासांच्या मंत्रीमंडळात अजितदादा सामील झाले तेव्हा शरद पवार साहेबांची बाजू घेऊन अजितदादांविरूद्ध गदारोळ जितेंद्र आव्हाड यांनी उठवला आणि अजितदादांनी जितेंद्र आव्हाड यांना हिटलिस्ट .. ब्लॅकलिस्ट केले ही संधी साधून नजीब यांनी अजितदादांशी जवळिक साधली जी आजही नजीब आणि अजितदादा टिकवून आहेत.

नजीब यांच्या सर्व होर्डिग्ज पोस्टर्स बॅनर्स वरून जितेंद्र आव्हाड यांचे फोटो गायब झाले आणि अजितदादा दिसू लागले.

जितेंद्र आव्हाड आणि नजीब यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न काही सामायिक मित्रांनी केला त्यामुळे वैर थांबले पण समझोता न होता दोघांनी "युद्ध विराम" केला. ना दुष्मन ना दोस्त अशी अलिप्तता स्वीकारली.

नजीब मुल्ला यांच्या विरोधातील पुरावे घेऊन उत्तर प्रदेश पोलीस जी कारवाई करतील त्याचे जितेंद्र आव्हाड यांना सोयर सुतक असण्याचे कारण नाही.

नजीब प्रकरणामुळे आव्हाडांची बदनामी होण्याचे तर अशक्य आहे.

आव्हाड यांचे राजकारण दंड थोपटून उघड्या मैदानावर चालते.

पाठीमागून वार करीत नाहीत.. कुणाला अशा गुन्हेगारांकडून सुपा-या देत नाहीत.. "दे" म्हणणार नाहीत.

नजीब हा अडचणीत आणू शकतो अजितदादांना.

नजीब जर "मी तुमचा शागीर्द " म्हणत "मला वाचवा" सांगत अजितदादांच्या गळ्यात पडला.. आणि तशी शक्यता नाकारता येत नाही ..

तर अजितदादांपुढे पेचप्रसंग उभा राहील. बाजू घेऊन शेवटी करणार काय?

काल गृहमंत्री झालेल्या वळसे पाटील यांना आज या सुपारी बहाद्दराला वाचवा अशी गळ घालणार? शक्य नाही.

नजीब त्याच्या कर्माची फळे भोगणार.

सचिन वाझे प्रकरणातून नेते मंडळी शिकली आहेत की बुडत्याला वाचवायला गेलो की तो आपल्यालाच घेऊन बुडतो.

नजीब प्रकरणात राज ठाकरे यांनी "वात" पेटवली आहे.. स्फोट भाजपा घडवील..!!

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

"उद्धव ठाकरे का बोलत नाहीत?"

हा प्रश्न विचारून उपयोग नाही.!

जर बोलले.. तर ते खरे की खोटे.. याची शहानिशा होईल.!

विरोधक.. उद्धवजी जे काही बोलतील.. त्याचा विरोध च करतील..!

महाआघाडीतील समर्थक उद्धवजी खरे किंवा खोटे बोलले तरी.. बोलायची गरज काय होती? असे विचारत नाराजी व्यक्त करतील.

त्यापेक्षा "मौनंम् सर्वार्थ साधनम् काय वाईट? असा विचार उद्धवजींनी केला तर चूक काय ?

www.abhijeetrane.in


25 views0 comments

Comments


bottom of page