उद्धव ठाकरेंच्या टोलेबाजीला मुख्यमंत्री फडणवीसांचे एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
उद्धव ठाकरेंच्या टोलेबाजीला मुख्यमंत्री फडणवीसांचे एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर
● ‘बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एका वाक्यात सडेतोड उत्तर दिलं. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी केलेल्या टोलेबाज वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत नेमकं प्रत्युत्तर देत टीकाकारांना गप्प केलं आहे. कोणतीही टीका-प्रतिटिका न करता, एका वाक्यात अत्यंत सडेतोड आणि राजकीय चातुर्य दाखवत फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. तिथे धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या स्मारक व संग्रहालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची आठवण करून दिली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आदिवासी वीरांच्या गौरवासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत. खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनापासून ते उद्घाटनापर्यंतची जबाबदारी मला मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ असंही त्यांनी नमूद केले
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments