top of page
  • dhadakkamgarunion0

ईडीची नोटीस येणे वेगळे आणि ईडीने धाड टाकणे वेगळे..

*@ABHIJEETRANE (AR)*

महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचे पोलीस आणि गृहखाते मोदी आणि शहा यांच्या "आश्रितां"च्या मागे हात धुवून लागले होते तेव्हाच मी लिहिले होते की यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या हुकमतीखालील सीबीआय ईडी इत्यादी यंत्रणा महाआघाडी सरकारच्या "आश्रयदात्यां"च्या मागे "जशास तसे" धडे शिकवण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी मोहीम सुरू करणार.. आज आ. प्रताप सरनाईक यांच्यावर पडलेल्या ईडीच्या धाडीने या प्रतिघाताचा प्रारंभ झाला आहे.. "सौ सोनार की एक लोहार की" म्हणजे काय हे अमित शहा दाखवून देणार हे अपेक्षित गृहीत अटळ होते.. ते घडते आहे.. अजून खूप काही घडणार आहे. महाआघाडी सरकारच्या "हिट लिस्ट" वर फक्त अर्नब गोस्वामी आणि कंगना राणावत होते पण अमित शहा यांच्या "हिट लिस्ट" वर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे किमान डझनभर मातब्बर नेते, आश्रयदाते, उद्योगपती असणार यात शंकाच नाही. महाआघाडी सरकारने युद्धाला सुरवात केली आता या युद्धाचा शेवट अमित शहा कसा करतात ते बघायचे!!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE (AR)*

ईडीची नोटीस येणे वेगळे आणि ईडीने धाड टाकणे वेगळे. "मी एक थोबाडीत मारीन" असे म्हणणे आणि प्रत्यक्ष थोबाडीत मारणे यात जो फरक आहे तसाच नोटीस बजावणे आणि धाड टाकणे यात आहे. ईडी ची धाड जेव्हा एकावर पडते तेव्हा अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो की पुढली धाड आपल्यावर तर पडणार नाही? "खुशाल सीबीआय चौकशी आणि कारवाई करा, मी घाबरत नाही" किंवा "मी ईडीला फाट्यावर मारतो" अशी भाषा करणा-या नेत्यांना आपल्या आप्तस्वकीय किंवा निकटवर्तीय नेत्यांच्या घरांवर सीबीआय ईडी इनकम टॅक्स जीएसटी अशा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांच्या धाडी चौकशी आणि कारवाई यांचे सत्र सुरू झाले या बातमीनेच घाम फुटतो, डरकाळ्यांच्या ऐवजी किंकाळ्या उमटू लागतात आणि शरणागती पत्करून मिटवामिटवीचे प्रयत्न सुरू होतात. महाआघाडी सरकारच्या शस्राला मोदी आणि शहा यांनी अस्त्राने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे हा एकासाठी हादरा तर इतरांना इशारा आहे!

www.abhijeetrane.in 


*@ABHIJEETRANE (AR)*

मुख्यमंत्री उद्धवजींच्या निकटवर्तीय पाच नेत्यांपैकी .. क्रमांक : 1) मिलिंद नार्वेकर 2) खा. संजय राऊत 3) अनिल परब 4) एकनाथ शिंदे आणि 5) आ.प्रताप सरनाईक हे अनुक्रमे आहेत. मिलिंद नार्वेकर जगन्मित्र आहेत आणि भाजपा नेत्यांना सांभाळून असतात शिवाय कुणा विरोधात एक शब्द उघडपणे बोलत नाहीत त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना भाजपा नेते धक्का लावणार नाहीत. खा.संजय राऊत यांनी राष्ट्रीय पातळीवर 'टाॅप टेन' नेत्यांमध्ये स्थान मिळवले आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचे संजय राऊत हे 'सुकाणू' आहेत त्यामुळे त्यांना हात लावायचा नाही ही मोदी आणि शहा यांची पाॅलिसी आहे. एकनाथ शिंदे हे देवेंद्रजींच्या निकटवर्तीयात होते आणि भविष्यातील व्युहररचनेतील महत्वाचे मोहरे आहेत त्यामुळे त्यांना अभय आहे. अनिल परब उद्धवजींच्या राजकारणात 'हस्तक' असले तरी 'मस्तक' नाहीत त्यामुळे ईडी सीबीआय चौकशी आणि कारवाईच्या कक्षेत येत नाहीत. मग प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी धाड का पडली.. तर 1) प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने अर्नब गोस्वामीच्या विरोधी तक्रारी , हक्कभंग दाखल झाले 2) प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे सर्वात धनाढ्य नेते आहेत आणि उद्धवजींच्या राजकारणात निधी संदर्भात त्यांचे योगदान मोठे असते. महाआघाडी सरकार बनविण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री सरनाईक यांनी उपलब्ध करून दिली होती. 3) महाआघाडी आमदारांना फोडण्यासाठी भाजपा जी संरचना करीत आहे तिला शह देण्यासाठी प्रताप सरनाईक मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करू शकतात हा धोका लक्षात घेऊन ही कारवाई होते आहे. 4) महाआघाडीच्या इतर धनाढ्य नेते आणि मंत्री यांना इशारा देण्यासाठी तशाच अकादमीच्या नेत्याला लक्ष्य करणे आवश्यक होते तेवढे मातब्बर आणि उद्धवजींच्या प्रतिष्ठेचे प्रतीक प्रताप सरनाईक असल्याने त्यांना मोदी आणि शहा यांच्या हुकमतीखालील सीबीआय ईडी इत्यादी यंत्रणांनी टार्जेट केले आहे. 5) प्रताप सरनाईक यांच्या वर धाड आत्ता पडली असली तरी ते अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारे बिल्डर असल्याने त्यांना असंख्य प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने नोटीसा वेळोवेळी बजावलेल्या आहेतच फक्त वेळ वखत संधी आणि हिशेब चुकते करण्याची गरज यानुसार कधीही कुठलीही फाईल ओपन केली जाऊ शकते.

प्रताप सरनाईक यांच्या वर धाड हा सरनाईक यांच्या पेक्षा उद्धवजींच्या प्रतिमा प्रतिष्ठा प्रभुत्व आणि निरंकुश सत्ता याला फार मोठा धक्का आहे !!!

www.abhijeetrane.in


 


*@ABHIJEETRANE (AR)*

जो पर्यंत देवेंद्रजी फडणवीस सत्तांतर नजिकच्या काळात होण्याचे सूचित करीत नाहीत तोपर्यंत चंद्रकांत दादा पाटील किंवा प्रवीण दरेकर "हे महाआघाडी सरकार दोन महिन्यात पडणार" असे दोनशे वेळा जरी म्हणाले तरी गांभिर्याने दखल घेण्याची गरज नाही नाही नाही नाही! महाराष्ट्रात फक्त एका व्यक्तीला सत्तांतर केव्हा होणार.. कसे होणार.. कोण करणार.. हे ठाऊक आहे.. ती व्यक्ती म्हणजे.. देवेंद्रजी फडणवीस! बाकी सगळा पालापाचोळा.. नुसता हवेवर उडणार.. हवेत नाहीसा होणार.. !!

www.abhijeetrane.in


 


@ABHIJEETRANE (AR)


"लव्ह जिहाद" कायदा महाराष्ट्र लागू करणार नाही हे उघड आहे आणि हा मुद्दा भाजपा नेत्यांना सोयीस्कर आहे. प्रत्यक्षात दरवर्षी किती हिंदू मुली या मुस्लिम तरुणांशी वशीकरण किंवा जबरदस्तीमुळे धर्मांतर करून निकाह करतात याची नेमकी आकडेवारी मी अनेक ठिकाणी चौकशी केली पण मला मिळाली नाही. पण एका माहितगारांनी दिलेल्या अंदाजानुसार दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मिळून शंभराच्या आसपास हिंदू मुली या मुस्लिम तरुणांशी निकाह करीत असाव्यात आणि तेवढ्याच संख्येने मुस्लिम मुली हिंदू तरुणांशी विवाह करीत असतात. हिंदू मुली या मुस्लिम तरुणांशी निकाह केल्यावर मुस्लिम धर्म स्वीकारतात तशाच मुस्लिम मुली हिंदू तरुणांशी विवाह केल्यास हिंदू धर्म स्वीकारतात असे सर्व साधारण निरीक्षण आहे. पण जेमतेम दोनशे आंतरधर्मीय विवाह महाराष्ट्रात वर्षाकाठी होत असले तरी दहा कोटी हिंदू समाजाला असे तीव्रतेने वाटते की यामागे मुस्लिम धर्मांधाचे योजनापूर्वक कारस्थान आहे आणि ते सामाजिक व कायदेशीर कारवाई व दबावाने मोडून काढले पाहिजे आणि हे साहस सेक्युलर पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी दाखवू शकत नाही त्यासाठी भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटना पाहिजेत. मुस्लिम समाज आणि हिंदू समाज यांच्यातील संघर्ष आणि दुराव्याच्या अनेक कारणांपैकी एक हे आंतरधर्मीय विवाह अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे आणि अलिकडे "लव्ह जिहाद" या संकल्पनेचा वापर सुरू झाला आहे ज्या मुळे हा संघर्ष आणि दुरावा वाढला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अगदी कालपरवा पर्यंत दलित आणि सवर्ण विवाहाबाबतही असा तीव्र विरोध होता.. अजूनही तो संपलेला नाही. "लव्ह जिहाद" कायदा लागू करणार तो फक्त हिंदू आणि मुसलमान यांच्यातील आंतरधर्मीय विवाहासाठी अर्थात मुस्लिम बरोबर ख्रिश्चन समाजालाही तो लागू असणार असे वाटते. जो हिंदू नाही त्या प्रत्येक अन्य धर्मीयांमधील विवाहाबाबतही हा "लव्ह जिहाद" कायदा लागू करणार की नाही याची कसोटी एक ना एक दिवस सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिकेच्या माध्यमातून लागेल अशी शक्यता आहे. तेव्हा कदाचित बौद्ध जैन इत्यादी शेकडो हिंदू नसलेल्या धर्मांना देखील हा लव्ह जिहाद कायदा लागू होणार काय? याचा अंतीम निर्णय येईल तोपर्यंत मुख्यतः मुस्लिम आणि हिंदुत्ववादी संघटना त्याचे राजकीय भांडवल करीत रहातील. निवडणुकीत ज्या राज्यात 'लव्ह जिहाद' कायदा नसेल तिथे भाजपा तो मुद्दा आंदोलनात्मक पवित्रा घेऊन लावून धरणार यात शंका नाही!!

www.abhijeetrane.in


14 views0 comments

Comments


bottom of page