इराण-इस्त्रायल युद्धाच्या चौदा दिवसांत गल्फ राष्ट्रांना ...
- dhadakkamgarunion0
- Mar 15
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इराण-इस्त्रायल युद्धाच्या चौदा दिवसांत गल्फ राष्ट्रांना उमगले की अमेरिकेच्या बाजूने उभे राहूनही इस्राईलचा धोका कमी होत नाही. इराणने हल्ल्यांची दिशा अशी आखली की नुकसान अमेरिकेचेच व्हावे. कतारपासून दुबईपर्यंत आर्थिक केंद्रे हादरली, तर इराकमध्ये अमेरिकन सैन्याचे विमान कोसळले. इराणचे नवे सुप्रीम लीडर खामेनी यांनी स्पष्ट संदेश दिला – अमेरिकेवर विसंबून राहू नका, तळ बंद करा. भारताची भूमिका मात्र गोंधळलेली दिसते. इराणच्या राष्ट्रपतींच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला गेला, पण खामेनींच्या निधनावर मौन राखले गेले. होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना परवानगी मिळाल्याचा दावा खोटा ठरला. लाखो भारतीय गल्फमध्ये अडकलेले आहेत, तर परतण्यासाठी अतिरिक्त खर्च व धोका वाढला आहे. हे युद्ध केवळ नेत्यांच्या हट्टामुळे सुरू आहे, पण त्याची किंमत सामान्य जनतेला चुकवावी लागत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिका/इस्रायल विरुद्ध इराण या गेले १४ दिवस चाललेल्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे.ती म्हणजे अमेरिकन सुपरपॉवर ची वॉर मशीन म्हणून नावाजली गेलेली सामरिक ताकद जेव्हढी वर्णन केली गेली होती त्यामानाने प्रत्यक्षात कमीच आहे.तसे नसते तर इस्रायल सारख्या लढवय्या आणि अत्याधुनिक अस्त्र/ शस्त्रांनी सज्ज देशाला सोबतीला घेऊन सुद्धा अमेरिका १४ दिवसात इराणला का वाकवू शकलेली नाही? इराणने दाखवून दिले आहे की व्हेनेझुएलात सत्ताबदल घडवून आणणे वेगळे आणि तोच प्रयोग इराणमध्ये करू पाहणे वेगळे.बरे,प्रचंड नुकसान झाल्यावर ही इराण ने अमेरिका/इस्रायल ला सांगितले आहे की तुम्ही युद्ध सुरू केलेत,आता ते संपणार कधी ते आम्ही ठरवणार.म्हणजे सुपरपॉवर असूनही नजिकच्या भविष्यात समजा अमेरिकेने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली तरी इराण ती मानेल असे नाही.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
१३ मार्च २०२६ रोजी कल्याण-ठाकुर्ली दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली. आरोपी सनी कांबळे (वय २३), मूळचा पुण्याचा व भंगार व्यवसाय करणारा, नशेत हुल्लडबाजीसाठी हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या हल्ल्यात C-1, C-3, C-4 आणि C-7 डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. रेल्वेच्या चार डब्यांचे नुकसान झाले. रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि कल्याण गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. ही घटना प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. संविधानातील अनुच्छेद २१ जीवन व स्वातंत्र्याची हमी देतो, मात्र अशा हिंसक कृत्यांनी त्या हमीला तडा जातो. जय संविधान.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात ‘मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’मार्फत मुसलमानांना व्यवसाय व शिक्षणासाठी विनातारण कर्ज देण्यात आले. मात्र वर्ष २००० पासूनची वसुली शिल्लक असून तब्बल ४३,४१२ जणांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. सुरुवातीला वसुलीचे प्रमाण फक्त १० टक्के होते, नंतर प्रयत्न करून ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्या कर्जपुरवठा बंद असून केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यावरच पुढील वाटप होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. शेतकऱ्यांकडून मात्र कठोर वसुली होत असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढते, तर विशिष्ट कर्जदारांकडून वसुली न होणे ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब ठरते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने NSA अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून पर्यावरणवादी व लद्दाखचे जननेते सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका केली आहे. त्यामुळे ते पुन्हा जनतेमध्ये, लद्दाखमध्ये असतील.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संकटांच्या काळात अशी आनंदवार्ता दुर्मिळ असते. कार्ल मार्क्सप्रमाणे शोषणमुक्त समाजाची संकल्पना देणारे नेते नसले तरी वांगचुक यांनी आदिवासी व लद्दाखवासीयांसाठी विज्ञान व पर्यावरणाच्या माध्यमातून न्याय, समानता व देशभक्तीचा मार्ग दाखवला आहे.त्यांच्या सुटकेमुळे शोषणाविरुद्ध लढणाऱ्या देशप्रेमींना नवसंजीवनी मिळाली आहे. संविधानिक सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला ही विजयाची बातमी आहे.



Comments