top of page

आशिष शेलार यांचा "आवाज" दबलेला कसा ?

dhadakkamgarunion0

*@ABHIJEETRANE(AR)*

शेतकरी आंदोलनापुढे केंद्र सरकार शरणागती पत्करून कायदे अजिबात मागे घेणार नाही हे आता निश्चित.. मग या आंदोलनाचा शेवट कसा होईल? अंदाज असा आहे की : न्यायालयाचा निर्णय आंदोलकांना रोखण्यासाठी / हटविण्यासाठी सर्व महामार्गावरील कोंडी बळाचा वापर करून फोडण्यासाठी नि:संदिग्धपणे मिळेल आणि न्यायालयाचा आदेश भंग किंवा अवमान होऊ नये म्हणून केंद्र सरकार आंदोलकांना पंजाब हरियाणा सीमेपलीकडे ढकलून हरियाणा आणि पंजाबचे आजूबाजूच्या राज्यांशी रेल्वे, रस्ते या मार्गाने होणारे दळणवळण आंदोलन स्थगित होईपर्यंत खंडीत करील. पेट्रोल डिझेल घरगुती गॅस अन्नधान्याची ने-आण रोखील. जानेवारी महिन्याच्या आत शेतकरी आंदोलनातील हवा काढलेली असेल आणि फक्त फक्त फक्त कोविदची लस देशभरातील कोट्यवधी लोकांना पोचविण्याच्या मोहिमेची आणि मोदींच्या महतीची चर्चा शिल्लक राहिल. पहात रहा.. मोदी आणि शहा यांच्या नव्या करामती आणि व्युहररचना!!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धवजी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी या दोघांची भाषणे तुलनात्मक अभ्यास केला तर तुल्यबळ होती पण उद्धवजींचे बळ दुबळ्या सरकारच्या समर्थनात व्यर्थ गेले तर देवेंद्रजींच्या भाषणात बुद्धीबळाचा डाव आणि सरकारच्या पुढील पेचप्रसंगांचे चपखल विश्लेषण होते. एक काॅमन फॅक्टर जाणवला तो म्हणजे दोघाना आपली लढाई आपणच लढावी लागते आहे अन्य सहकारी सोबतीला / मदतीला येण्यासाठी तयार / उत्सुक नाहीत.


 

*@ABHIJEETRANE(AR)*

विनोद तावडे महाराष्ट्रातील राजकारणातून बाहेर.. थेट.. बंगाल मध्ये फेकले गेले.. त्यामुळे त्यांचा "आवाज" क्षीण झाला आहे पण पण पण.. मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ घातलेल्या असताना आशिष शेलार यांचा "आवाज" दबलेला कसा ? की अतुल भातखळकर यांच्या हाती सूत्रे सोपविण्यात आली आहेत त्यामुळे आशिष शेलार नर्व्हस नाराज निराश नाऊमेद निष्कय निर्विकार झाले आहेत.. आशिष शेलार यांनी अलिप्त तटस्थ भूमिका घेतली तर अतुल भातखळकर यांच्या हाती सत्तेच्या "भाता" ऐवजी विरोधी पक्षाची नुसतीच "खळ" येईल हा धोका भातखळकरांच्या लक्षात आला असेल की नसेल ?


4 views0 comments

Comentarios


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page