आरोग्य मदतीसाठी ‘वॉर रूम’ची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- Nov 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आरोग्य मदतीसाठी ‘वॉर रूम’ची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील सर्व आरोग्य सुविधा आणि कल्याणकारी योजना एकाच छत्राखाली आणण्यासाठी लवकरच एक विशेष ‘वॉर रूम’ उभारली जाणार आहे. या वॉर रूममुळे केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांमध्ये समन्वय साधला जाईल. या निर्णयामुळे एकाच व्यक्तीला दोन योजनांचा लाभ मिळण्याचा किंवा योजनांच्या गैरवापरावर आळा बसेल, तसेच गरजू लाभार्थ्यांना योग्य आणि त्वरित मदत मिळेल. राज्यातील आरोग्य योजनांचे प्रभावीपणे एकत्रीकरण करणे, ही या वॉर रूमची मुख्य जबाबदारी असेल. या कक्षाचे कामकाज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' आणि 'धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष' यांच्या थेट नियंत्रणाखाली चालणार आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments