आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
- dhadakkamgarunion0
- Apr 22
- 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
● महाराष्ट्राला आरोग्यसेवांचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असून, दर्जेदार आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, विशेषतः अतिदुर्गम भागांत पोहोचली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तंत्रज्ञान आणि डॉक्टर, तज्ञ यांच्या सहाय्याने हे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले की, ‘प्रत्येक व्यक्तीला सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली असून, डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची गरज वाढली आहे.’ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी क्रेडीट पॉईंट दिले जातात. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला नुकत्याच दिल्या आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments