आरे वाचवा! नियमबाह्य बांधकामांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा दौरा
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 1 min read
भाजपा नेते किरीट सोमय्या व भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनी परिसरात होत असलेल्या विविध बेकायदेशीर कृत्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान रॉयल पाम, कृषी उद्योग भवन समोरील संक्रम स्टुडिओ परिसर आणि युनिट नं. 4 येथील गोडाऊन नं 16 या परिसरातील व इतर ठिकाणी सुरू असलेली अनधिकृत भरणी, स्टुडिओच्या बाहेरचे पक्के बांधकाम, काँक्रीट लादीकरण, बेकायदेशीर राडारोडाची भरणी, रॉयल पाम मधील हजारो सकवेअर फुटांची बेकायदा शेड बांधकामे यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या विपरित परिणामांविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
अभिजीत राणे यांनी किरीट सोमय्या यांना आरेतील स्थितीची तपशीलवार माहिती दिली.
मुंबईच्या 'फुफ्फुसा'सारख्या महत्त्वाच्या परिसरात नियमबाह्य अतिक्रमण आणि निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तात्काळ कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
#आरेवाचवा

























Comentários