आम्ही थेट नरेटिव्हने उत्तर दिले; मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
- dhadakkamgarunion0
- Jul 2
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आम्ही थेट नरेटिव्हने उत्तर दिले; मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
● भाजपा म्हणजे अफवांची फॅक्टरी आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून थांबलेली नाही. लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीने यांनी एक यश मिळवलं पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हने उत्तर दिलं. आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आता महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरु झाला आहे. अशी भाषणे आता ऐकायला मिळणार आहेत. तुमच्यातही ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments