top of page
  • dhadakkamgarunion0

आमदार भारत भालके यांचे निधन महाराष्ट्राला दु:खदायक...

Updated: Nov 30, 2020

@ABHIJEETRANE(AR)

आमदार भारत भालके यांचे निधन महाराष्ट्राला दु:खदायक तर पंढरपूर - मंगळवेढा या त्यांच्या मतदारसंघाला क्लेशकारक आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाच वेळा पाच विविध पक्षांतर्फे आमदार म्हणून निवडून आले कारण ते लोकप्रियतेत अतुलनीय होते आणि अपक्ष म्हणून उभे राहिले असते तरी निवडून आलेच असते. त्यांना पक्षांची गरज नव्हती तर हमखास जागा जिंकायला पक्षांना त्यांची गरज होती. पाच पक्षांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांच्या ते मनापासून जवळ गेले होते. विजयसिंह मोहिते पाटील, सुधाकर परिचारक यांच्या सारख्या बलाढ्य उमेदवारांना त्यांनी पराभूत केले होते त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्यापैकीच कुणाला राष्ट्रवादी उमेदवारी देऊन पोटनिवडणुकीत निवडून आणील. कोरोनामुळे मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार निर्जन व्यवस्थेत केले जातात. पण अ-सामान्य आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचे पार्थिव सहा तास अंत्यदर्शनासाठी सार्वजनिक ठिकाणी ठेवले जाते आणि अंत्यसंस्कार स्थळी किमान दोन ते तीन लाख लोक दाटीवाटीनी उपस्थित होतात हा आणखी एक विक्रम प्रस्थापित होतो आहे. शरद पवार साहेबांना देखील रूबी नर्सिंग होम मध्ये स्वतःला धोका संभवत असून जावे वाटले ही बाब कै. आमदार भारत भालके यांची जवळिक अधोरेखित करते !

www.abhijeetrane.in


 


@ABHIJEETRANE(AR)

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी, संघटना आणि नेते यांचे अस्तित्व जाणवत नाही हे असे का आणि कसे झाले असावे ? तरी मराठी मिडीया दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आहे पण एनडीटीव्हीचा अपवाद वगळता बहुतेक हिंदी आणि इंग्रजी चॅनल्स पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग हे गांधी परिवाराच्या वतीने या शेतकरी आंदोलनाला फायनान्स करून दिल्लीत हिंसाचार व्हावा यासाठी कारस्थान करीत असल्याचे आरोप करीत आहेत. पंजाब हरियाणातील 'धाकड' बलदंड बाहूबली शेतक-यांपुढे निमलष्करी दलांचा ज्या प्रकारे धुव्वा उडाला आणि सर्व अडथळे पार करून शेतकरी दिल्लीत घुसले ते पहाता यापुढे निमलष्करी दलांच्या बळावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्यातील मर्यादा स्पष्ट झाल्या आणि पोलीसी बळावर संख्याबळ मात करते / करू शकते हा धडा सरकारला आणि आत्मविश्वास आंदोलकांना मिळाला. यापुढे देशभरात जिथे लाखाहून अधिक आंदोलक सहभागी होतील तिथे सरकार , पोलीस, निमलष्करी दले हतबल होताना दिसतील असे उदाहरण पंजाब हरियाणाच्या शेतकरी आंदोलकांनी घालून दिले आहे. अमेरिकेत एका कृष्णवर्णीय तरूणाला पोलिसांनी मानेवर पाय ठेवून मारले त्या नंतर उसळलेल्या दंगलीत न्यूयॉर्क पासून अनेक शहरांमधील बाजारपेठा लुटल्या / जाळल्या कारण पोलीसांना एकही गोळी झाडायची नाही फक्त अश्रूधूर लाठीमार संयमाने करायचा अशी ताकीद होती. पंजाब हरियाणा मधील शेतकरी आंदोलनात एकही गोळी झाडायची नाही फक्त अश्रूधूर , पाण्याचे फवारे, सौम्य लाठीमार यापलीकडे जाऊन बळाचा निर्दयपणे वापर करू नये ही सूचना असल्याने आंदोलक भारी पडले हे देखील खरे आहे. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा आंदोलनात्मक पवित्रा घेऊन लावून धरला जातो आहे.. लाखोंनी मराठा समाज सहभागी होऊनही कधी शांतता भंग झाला नाही. सरकारनेही बळाचा छळाचा वापर केला नाही.. पण पण पण.. पंजाब हरियाणा मधील शेतकरी आंदोलनाची दृश्ये देशभरातील सर्वच जन आंदोलनांना नवे बळ आणि सरकारच्या बळावर आपण संख्याबळाने मात करून हतबल करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय रहाणार नाही.. आज जे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत घडत आहे ते उद्या महाराष्ट्रात, मुंबईत अन्य कारणांमुळे होणा-या आंदोलनात घडू शकते हे महाआघाडी सरकारने लक्षात घेऊन आग भडकण्याआधीच विझविण्यासाठी उपाय योजना करायला हवी !!

www.abhijeetrane.in


10 views0 comments

Comments


bottom of page