*@ABHIJEETRANE(AR)*
महाराष्ट्रातील महाआघाडी प्रशासनाला शासन करायचेच हा निर्णय "दिल्ली दरबारी" झाला आहे.. माध्यम ? जे जे हाती .. हुकमतीखाली .. आहे ते .. नाव घेण्याची चोरी .. अवमान केला म्हणून होईल बळजोरी.. आगे आगे देखो होता है क्या!!
www.abhijeetrane.in
*@ABHIJEETRANE(AR)*
अर्नब गोस्वामीच्या अटकेचा सूड मोदी आणि शहा यांच्या हुकमतीखालील संस्थांनी पुरेपूर घेतला.. अर्नबचा निर्विवाद विजय झाला.. तरीही आता जो अर्नब रिपब्लिक चॅनलवर दिसतो आहे तो अटके आधीचा बिलकुल बिलकुल नाही.. तो त्याचीच "सुधारित" आवृत्ती आहे .. हिंदुत्ववादी देशभक्त धर्मयोद्धा पण पण पण आक्रस्ताळेपणा करणारा नव्हे तर आक्रमक पण विचारी विवेकी सहानुभूतीस पात्र असा अन्याय अत्याचार दडपशाहीचा बळी ठरलेला लोकप्रिय आणि मोदी आणि शहा यांच्या पठडीतील ध्येयवादी पत्रकार ही नवी ओळख प्रतिमा प्रतिष्ठा अर्नब गोस्वामी आता प्रस्थापित करण्यासाठी मुखवटा नव्याने धारण करून "अवतरला" आहे. आता अर्नब गोस्वामी हा पुर्वीचा असला तरी दिसला नाही पाहिजे हे पथ्य तो कटाक्षाने पाळतो आहे! तो जिंकला आहे.. ! पण "जेत्या"चा अभिनिवेश लपवतो / टाळतो आहे!
www.abhijeetrane.in
Comments