🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी लोककल्याणकारी योजना बंद होणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
● राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजना असो किंवा इतर कोणतीही कल्याणकारी योजना, राज्य सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना थांबविल्या नाहीत किंवा त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत, असे स्पष्ट करत फडणवीस यानी ते व एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही कोल्डवॉर नसल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे विरोधकांना निश्चितच वाईट वाटले असेल कारण काही नसताना उगाच गैरसमज पसरवण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. मात्र तरी ‘‘सध्या विरोधकांची अवस्था 'हम आपके है कौन?' चित्रपटासारखी झाली आहे. त्यांनी सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहून काम करावे. आमच्याकडे प्रचंड बहुमत असले तरी विरोधी पक्षाचा सन्मान राखत काम करू,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments