top of page

अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे...

  • dhadakkamgarunion0
  • Jun 24
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

अयोध्या श्रीराम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणात एसआयटीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने मोठा धक्का दिला आहे. अहवालात स्पष्टपणे चोरी झाल्याचे नमूद करून ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर व थेट सामील असल्याच्या आरोपांवर कठोर आक्षेप घेतले आहेत. दानपेटी मोजणीची व्यवस्था चुकीची ठरली असून नियुक्त सेवकांचे ट्रस्टशी संबंध उघड झाले आहेत. २५-३० कर्मचाऱ्यांना अटक होण्याची शक्यता असून काहींनी चोरीची रक्कम परत केली आहे. आता सीसीटीव्ही रेकॉर्डिंग १८० दिवस टिकणार आहे व पारदर्शक व्यवस्था लागू झाली आहे. महासचिव चंपत राय यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अहवाल सादर होणार असून कठोर कारवाई होणार याची जनतेला खात्री आहे. तरीही दररोज १० लाख भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

जी-७ फ्रान्स, एव्हियन २०२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश जागतिक राजकारणात महत्त्वाचा ठरला. “जगाला संसाधनांची कमतरता नाही, तर विश्वासाची कमतरता आहे” हे विधान त्यांनी केले आणि जागतिक भागीदारीचे भविष्य विश्वासावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय सहकार्याची खरी दिशा दाखवली. बाजूला बसलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली, कारण मोदींच्या शब्दांनी जागतिक नेत्यांना विश्वासाच्या संकटावर विचार करण्यास भाग पाडले. संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी परस्पर विश्वास आवश्यक आहे, हे मोदींनी अधोरेखित केले. हा क्षण भारताच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरील ओळख ठरला आणि विश्वास हा भविष्यातील सर्वात मोठा भांडवल आहे हे जगाला स्मरण करून दिले.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

बीडमधील विलास घुले खून प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनुसार हा प्री-प्लॅन मर्डर असून तो अनप्लॅन दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मृताच्या कुटुंबियांनी खासदार पुत्रावर थेट आरोप करून त्याला सहआरोपी करावे अशी मागणी केली आहे. केज पोलीस स्टेशनबाहेर जमाव जमून कुटुंबाला समर्थन दिले. धनंजय मुंडे यांनी विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित करत आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे आयजी छत्रपती संभाजीनगरहून तातडीने पोहोचले. स्थानिक नेत्यांनी कुटुंबियांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला असला तरी जुनी खुन्नस व जातीय विखारातून हत्या झाल्याची शक्यता व्यक्त होते. या घटनेने बीड जिल्ह्यातील जातीय तेढ व सामाजिक फाटाफूट पुन्हा एकदा उघड झाली आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

इंडियन एक्सप्रेसने उघड केलेल्या अहवालानुसार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव व त्यांच्या घरच्यांनी तसेच काही रिअल इस्टेट कंपन्यांच्या नावाने तब्बल ३३५ एकर जमीन विकत घेतली आहे. यातील २५३ एकर जमीन त्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री असताना २०२१ पासून घेतली असून ती सरकारच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ठिकाणीच आहे. हा घोटाळा पुराव्यासह उघड झाला आहे. याआधी येडियुरप्पा, सिद्धरमय्या व महाराष्ट्रातील अशोक चव्हाण यांचे जमीन घोटाळे चर्चेत आले होते व त्यांना राजीनामे द्यावे लागले होते. आता मोहन यादव यांचा राजीनामा भाजप घेते का, हा मोठा प्रश्न आहे. कारण उत्तरप्रदेशात यादव मतांसाठी भाजपला त्यांची गरज आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी "क्योंकी तुम हि हो..." हे गाणं गायलं! इकडे भाजप समर्थकांनी सुप्रिया सुळेंना लग्नावरून टारगेट करत करत मूळव्याध खवळून घेतला आहे. राजकारणी सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. कालपर्यंत RSS चा विरोध करणाऱ्या शरद पवारांनी आपली नात कट्टर RSS कार्यकर्त्याच्या मुलाला दिली. एकाच कार्यक्रमात शरद पवार आणि RSS सरसंघचालक मोहन भागवत दोघेही वधू वराला आशीर्वाद द्यायला हजर होते. राजकारणी जात, पात, धर्म आणि प्रदेश यांपलीकडे जाऊन त्यांच्या स्टेट्सनुसार नातेसंबंध बनवतात आणि जपतात.त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे.आपणच लहान माणसं हृदयात जाती-पातीचा, धर्माचा अहंकार जपून एकमेकांचा द्वेष करतो. थोडं आपण पण काही गोष्टी राजकारण्यांकडून शिकण्याची गरज आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page