🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
अभिनंदन मुख्यमंत्री फडणवीस! ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अंमलात येणाऱ्या ऊर्जा परिवर्तन योजनेतील विशेष कार्यासाठी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित १३व्या ग्रीन एनर्जी समिटमध्ये महावितरणला ‘स्टेट लेव्हल एक्सलन्स ॲवॉर्ड इन एनर्जी ट्रान्झिशन’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीवर भर, हरित ऊर्जेचा वाढता वापर, वीजखरेदी खर्चात बचत या उल्लेखनीय उपक्रमांसमवेत ऊर्जा परिवर्तनामध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेची अंमलबजावणी अशा कार्यासाठी महावितरणला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा महाराष्ट्राचा गौरव आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या यशस्वी वाटचालीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करण्याचा हा क्षण आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

コメント