top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 30
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सोशल मीडियावर चीनची स्तुती करणारे आणि भारतावर टीका करणारे व्हिडिओ अनेकदा चालवले जातात, हे व्हिडिओ चीनच्या रस्त्यांचे, इमारतींचे असतात आणि भारताचा विषय आला की मात्र चर्चेचा ओघ वादविवाद हिंदू-मुस्लिम किंवा मोदीविरोधी यावर वळवला जातो. जमिनीवरील वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे..!!सर्वप्रथम, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की चीन हा एक कम्युनिस्ट हुकूमशाही देश आहे. तिथे लोकशाही नाही, मीडिया ला ही स्वतंत्र नाही, विरोधी पक्ष नाही. शी जिनपिंग हे आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहणार आहे!भारतात, विरोधी पक्ष उघडपणे पंतप्रधानांवर हल्ला करतात, सरकारला प्रश्न विचारतात - हीच खरी लोकशाही आहे.!!चीनने गुगल, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या जागतिक कंपन्यांवर बंदी घातली आहे आणि त्याऐवजी सरकार-नियंत्रित अॅप्स वापरत आहे..!!तिथल्या प्रत्येक डिजिटल क्रियाकलापावर बंदी आहे. भारतात संपूर्ण सोशल मिडिया मुक्त आहे, जनता सरकारला प्रश्न विचारते आणि मीडियावरही न घाबरता टीका करू शकते तरी मोदी तानाशाह असल्याच्या थापा चीनप्रेमी कोंग्रेसी नेत्यांकडून मारल्या जातात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारताला कृषि कायद्यांची का गरज होती हे सिद्ध करणार्‍या घटना वारंवार आणि सर्वत्र दिसत आहेत. काही दिवसांपासून तेलंगणा - आंध्रामध्ये आंबे रस्त्यावर फेकले जात आहेत कारण त्यांचा वाहतुक खर्च देखील शेतकऱ्यांना मिळु शकत नाहीय. याच कारणाने कधी कांदे, कधी टोमॅटो, कधी दुध याचप्रकारे महाराष्ट्रात रस्त्यावर फेकले जाते. कृषी क्षेत्रात उद्योगांना आणून प्रोसेसींग युनिट्स सुरू करण्यासाठी, अतिरिक्त उत्पादनाला प्रोसेस करून कालांतराने वापरात आणण्यातामी कृषी कायद्यांचे अनन्यसाधारण महत्व होते. जेव्हा उत्तरेतील आंदोलनजीवी, शेतकरी म्हणवणाऱ्या काही लोकांनी कृषी कायद्याला विरोध करत बारा महिने दिल्लीत धुडगूस घातला त्या झुंडशाहीला दक्षिणेतील राज्यातील शेतकऱ्यांनी मुक संमती होती. शेतकरी वेष धारण केलेल्या गुंडांनी अशा प्रकारे शेतकर्‍यांचे वर्तमान आणि भविष्य बरबाद केलेय. आंदोलनजीवी शेतकरी नेत्यांना आता शेतकर्‍यांनीच पळवून पळवून बडवले पाहिजे आणि पुन्हा एकदा कृषी सुधारणा विधेयक लागू करा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राहुल गांधी परत एकदा बरळले आहेत."आपल्या सुशिक्षित मुलांना रिक्षा ओढताना,पकोडे तळताना पाहण्याचे आज माता पित्यांच्या नशिबात आले आहे.या तरुणांचे भविष्य हिसकावून घेऊन मोदींनी त्यांना आत्मनिर्भर केले आहे “ खोटे बोलण्यात राहुल गांधींचा हात धरणारे फारच थोडे लोक असतील. पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या परंतु त्यासाठी पूर्णतः नालायक असलेल्या राहुल गांधीला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की “बाबा तू जे काही ज्ञान लोकांना वाटत फिरतोस ते तू स्वतः का वापरून दाखवत नाहीस?तू जे बोलतोस ते करून दाखव.त्यासाठी एकच काम कर.कर्नाटक , हिमाचल प्रदेश या राज्यात जिथे तुझा काँग्रेस पक्ष पूर्ण सत्तेत आहे तिथे सर्व सुशिक्षितांना उत्तम नोकऱ्या ताबडतोब देऊन दाखव. जमेल का तुला?अरे काय जमणार तुला?जे तुझ्या वडिलांना,आजीला आणि पणजोबांना जमले नाही ते तुझ्यासारख्या बिनकामाच्या बोल बच्चन ला काय जमणार? एकीकडे शशी थरूर सारखे कोंग्रेसी नेते आपल्या बुद्धिमत्तेमुळे आणि राष्ट्रभक्तीमुळे लोकप्रियता मिळवत असताना असल्या निर्बुद्ध माणसाला अजूनही डोक्यावर घेऊन नाचणार्‍या कोंग्रेसी नेत्यांची आता कीव येते आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मी एक कट्टर मराठी माणूस आहे.परंतु मी मराठी आहे हे कुणाला सिद्ध करण्याची मला गरज वाटत नाही,त्याचप्रमाणे मी मराठी असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिवसेना उबाठा किंवा मनसेच्या उमेदवाराला येत्या मनपा निवडणुकीत माझे मत दिले पाहिजे वगैरे बडबड म्हणजे माझ्या मराठी असण्याच्या अभिमानाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करण्याचा प्रयत्न आहे हे मला नीटपणे समजते. मराठी जनतेच्या उद्धारासाठी शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र येत असून त्यांच्याकडे मुंबई मनपाची सूत्रे सोपवणे म्हणजेच मराठी माणसाच्या हिताचे रक्षण करणे ही भंपक बडबड आहे हे गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षांच्या अनुभवाने मला नीट कळले आहे.आपल्यापैकी अनेकांना सुद्धा ते असेच नीट कळले असेलच.मराठी माणसांची मते हवी असतील तर शिवसेना उबाठा आणि मनसे यांनी मराठी माणूस मुंबईत स्वाभिमानाने टिकावा,मोठा व्हावा,मराठी माणसाचा टक्का मुंबईत वाढावा यासाठी काय केले त्याची विश्वसनीय आकडेवारी मतदारांपुढे आणावी.नुसती भावनिक आवाहने या वेळी पुरेशी ठरणार नाहीत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“जर हिन्दी कोणत्याही भाषेची शत्रू नाही तर तामीळ सुद्धा अन्य कोणत्याही भाषेची शत्रू नाही. उत्तर भारतातील लोकांनी किमान एक दक्षिण भारतीय भाषा शिकावी. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे. आम्ही कोणाचेही शत्रू नाही आम्ही पण सर्वांचे मित्रच आहोत. त्यामुळे आमचीही भाषा शिका.” तामिळ नेत्या कनीमोळीच्या या मताशी आम्ही सहमत आहोत. हिंदी शिकून राष्ट्रिय एकात्मता टिकवण्याची जशी जबाबदारी बिगर हिंदी राज्यांची आहे तीच जबाबदारी उत्तरेतील हिंदी राज्यांनी दक्षिणेतील तसेच पश्चिमेतील भाषा शिकण्याची आहे.पण उत्तरेतील आणि हिंदी भाषिक राज्यांनी संस्कृत हिच भाषा तिसरी भाषा ठेवली आहे.संस्कृत योग्यच आहे.पण एखाद्या राज्याने मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, कोंकणी भाषा तिसरी भाषा आपल्या शाळांमध्ये प्रोत्साहित केली असती तर कदाचित आज जी विरोधाची लाट उठली आहे ती अस्तित्वात नसती. हा महत्वाचा मुद्दा केंद्र सरकारने सुद्धा ध्यानात घेण्याची गरज आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page