top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 30
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दोन्ही शत्रूपक्षाने इस्ञाईल व इराण यांनी भारताचे आभार का मानले ? इस्ञाईल चे जेव्हा सर्व डिफेंस सिस्टम जेव्हा फेल होत होते त्या वेळेस इस्ञाईल ने बराक -8 हे सिस्टीम वापरले जे की भारत -इस्ञाईल यांच्या संयुक्त विज्ञमाने तयार केलेले होते. युध्दाच्या शेवटच्या तीन दिवसात बराक -8 ने यशस्वी पणे इस्ञाईल ला वाचवले त्यामुळे इस्ञाईल कडून "धन्यवाद भारत "इराण कडून अमेरीकेवर हल्ला करण्याची हिंमत नव्हती ,रशियाकडून (किंबहुना भारतामार्फत ) कत्तार च्या अमेरीकेच्या तळा शेजारी अर्धा किमी परिसरात एक बँलेस्टीक मिसाईल आदळले ,वास्तवीक हा प्रकार मुद्दाम केला होता ,मोदीसोबत इराणचे राष्टृअध्यक्षाने सुमारे ४८ मिनीटे चर्चा केली होती. अमेरीकेला चेतावणी देणे आवश्यक होते ,यापुर्वी भारताने दोन वर्षापुर्वी झीरो वाँरहेड असलेले ब्रम्होस पाकिस्तानात टेस्ट केले होते , (लिंक जुळते का ते बघा ) कत्तर मधील अमेरीकन तळ हा मिडल ईस्ट मधील सर्वात मोठा अमेरीकन तळ आहे इथे नुकसान होणे अमेरीकेला परवडणारे नाही हे लक्षात घेतले पाहिजे .या साठी इराण कडून "धन्यवाद भारत " .बाकी ईकडचे लिबरल लोक मोदीच्या विदेशनितीला नाव ठेवत बसले तरी मोदीनी योग्य समन्वय साधून कत्तर मार्फत मध्यस्ती करून सीजफायर करून घेतले .

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारताला लागलेला दुसरा जॅकपॉट !इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी आणि संरक्षण सामुग्री बनवण्यासाठी अनेकदा मॅग्नेटची (लोहचुंबक) आवश्यकता असते. हे लोहचुंबक 'रेअर अर्थ' नामक दुर्मीळ धातूमधून मिळतं. तर अशा या रेअर अर्थचं जगातील ९०% उत्पादन (म्हणजे ४२ मेट्रिक टन) चीनमध्ये होतं. आपण पूर्णपणे चीनवर अवलंबून आहोत. भारतात या लोहकांत दगडाचे साठे अनेक समुद्रकिनारी सापडले असून आपल्याला त्याचे उत्खनन करतात येत नव्हते म्हणून आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने खाजगी क्षेत्राला २५०० ते ३००० कोटींचा इनसेंटिव देऊ केला आहे. त्या बदल्यात त्यांनी हा धातूसाठा बाहेर काढण्याची आणि मॅग्नेट तयार करण्याची प्रक्रिया करायची आहे. त्याशिवाय मोदी सरकारच्या काही वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन राजस्थानच्या रेताड प्रदेशात रेअर अर्थचा प्रचंड मोठा साठा सापडल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आपल्या रेअर अर्थचा साठा ३०% पेक्षा जास्त होऊन आपण दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंदमानजवळ सापडलेल्या २० ट्रिलियन डॉलर किंमतीच्या तेलसाठ्यानंतर भारताला लागलेला हा दुसरा जॅकपॉट आहे !

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी शरद पवार गटाचा कार्यकर्ता विजय पवार हा संदीप क्षीरसागर या नेत्यांच्या अत्यंत जवळचा म्हणून ओळखला जात असे. हे महाशय बीड शहरात उमाकिरण या नावाने कोचिंग क्लासेस चालवत होते. त्यांचे सहकारी प्रशांत खाटोकर हे होते. या दोघांनी कोचिंग क्लास च्या नावाखाली लहान मुलींचे लैंगिक शोषण करण्यास आरंभ केल्या. कित्येक मुली भीती आणि दहशतीमुळे बोलत नव्हत्या. एका अकरावीतील मुलीने मात्र धाडस केले आणि हे किळसवाणे प्रकरण उघडकीला आले. लहान मुलींच्या देहाला हाताळणे त्यांचे नग्न फोटो काढणे असे उद्योग कोचिंग क्लास च्या नावाखाली सुरू होते. गुन्हा नोंद झाल्याचं कळताच आरोपींनी पळ काढला आणि पोलिसांनी पळ काढू दिला. शिवरायांच्या महाराष्ट्रात पीडित मुलीची जात काय असेल अन् आरोपी कुठल्या जातीचे असतील त्यावरूनच न्याय ठरतो. या दोघांना वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा यांच्यासोबत आहे. पीडितांच्या बाजूने लिहिण्यासाठीही पीडिता आपल्या जातीची हवी अशी वृत्ती असणारे लोकं बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या खरोखर सडला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जगन्नाथाच्या सेवेत कॉर्पोरेट इंडिया. पुरीच्या रस्त्यांवर सर्वत्र भगव्या पताका फडकत असतात, शंखनादाच्या गजरात जगन्नाथाचा रथ दिमाखात निघतो, लाखो भक्तांच्या जयघोषात आकाश दुमदुमतं… आणि त्याच गर्दीतून वाट काढत गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंबीय पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत भगवान जगन्नाथासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतात. दुसरीकडे, पुरीतील श्री जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या रिलायन्स फाउंडेशनने भाविकांसाठी अन्नछत्रसेवा स्टॉल्स उभारली आहेत ज्याचा हजारो, लाखो भाविक लाभ घेत आहेत.लाखो सामान्य गरीब भविकांप्रमाणेच कॉर्पोरेट इंडिया जगन्नाथासमोर नतमस्तक होतो त्याच्या चरणी सेवा म्हणून आपल्या धर्मात सर्वश्रेष्ठ असणारे अन्नदान भरभरून करतो हीच खरी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माची शक्ती आहे. भांडवलदार हा दुष्ट , शोषक असतो आणि धर्म ही अंधश्रद्धा आहे असे जगभर कोकलून सांगणारे साम्यवादी आपल्या देशात आडवे होतात याचे हेच कारण आहे. भारत या देशाची मूस वेगळीच आहे आणि हे पुरोगामी, सेक्युलर आणि कम्युनिस्ट जमातींच्या डोक्यात घुसत नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देशात कांग्रेसी व महाराष्ट्रात पवारी आशिर्वादाने नावारुपास आलेल्या या तथाकथित डाव्या विचारवंत ; भालचंद्र मुणगेकर, सुखदेव थोरातांपासून हरी नरके पर्यन्त अनेकांची "भंपकी दुकानदारी" २०१४ पर्यंत चांगली सुरु होती. २०१४ नंतर यांची "भंपकगीरी" उजेडात येऊ लागल्यावर हे अस्वस्थ झाले. २०१९ मधे "उठाशप सरकार"सत्तेत (पुढील २५ वर्ष सत्तेला घोर नाही या आशेवर) आल्यानंतर "आपल्याला जिवदान मिळाले" या आनंदात ते होते. त्यांनीच इंग्रजी हिन्दी सक्तीचा हा रीपोर्ट उठाशप सरकारला दिला तो अंमलात आणण्यासाठीच. पण यांच्या दुर्देवाने ते सरकार पडले (वा पाडल्या गेले) व २०२४ मध्ये देवेन्द्रजी फडणवीस यांचे नेतृत्वात नवे महायुती सरकार सत्तेत आले. यामुळे या सा-यांनाच अपेक्षाभंगाच्या दुःखा:ने ग्रासले आहे. आपल्या थोड्याशाही खुलाशाने "उठाशप जोडी" बदनाम होत असेल व देवेन्द्रजीच्या ख-या वक्तव्याला बळ मिळत असेल तर या प्रकरणी ते बिळात जाऊन लपतील या बद्दल शंका बाळगण्याचे कारणच नाही. त्यावेळी हिन्दी सक्ती करताना मुस्लिम तुष्टीकरण हा हेतु होता आणि आज हिन्दी विरोध करण्यासाठी मराठी अस्मितेचे तुणतुणे घेतले आहे.

🔽


 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page