top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 27
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संयुक्त राष्ट्रातील संमेलनात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी दर्पोक्ति केली होती की भारताने सिंधु करार पुनःस्थापित केला नाही तर भारतावर पाकिस्तान हल्ला चढवेल. निसर्गाच्या कृपेने भारताने पाकिस्तानला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. जम्मु कश्मिरच्या रियासी जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे चिनाब नदी दुथडी भरून वाहत असून चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत.त्यामुळे आता काही तासांतच पाकिस्तान मध्ये जिथून चिनाब नदी वाहते त्या प्रदेशात पूर स्थिती निर्माण होणार आहे.परंतु आता सिंधु जल कराराचे पालन भारताने स्थगित केले असल्याने पाकिस्तानला सलाल धरणातील पाणी सोडल्याची पूर्व सूचना देणे भारतावर बंधनकारक नाही.आता जे काही त्यांच्या नशिबाने त्यांचे होईल ते होईल. यावर पाकिस्तान काय प्रतिक्रिया देतो हे बघणे औत्सुक्याचे असेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोडग्या आणि गेंड्याच्या कातडीच्या राहुल गांधीला कोणी कधी अगदी शांतपणे, पुराव्यांनिशी तर कोणी कधी रागावून,वैतागून सांगितले की बाबारे तू मूर्ख आणि निर्लज्ज असा दोन्ही आहेस,तरी त्याला काहीच फरक पडत नाही.तो पुन्हा तसेच वागतो की ज्यामुळे पुन्हा लोक त्याला मूर्ख,कोडगा,गेंड्याच्या कातडीचा वगैरे म्हणतील.काँग्रेस ने दिल्ली हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती की २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या काही निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणाऱ्या घटना झाल्या होत्या,त्यांना निवडणूक आयोग जबाबदार आहे,त्या याचिकेची सुनावणी सुरू झाल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचा अर्ज फार्सिकल म्हणजे हास्यास्पद असा शेरा मारून रद्द केला.रद्द केला याचा अर्थ काँग्रेसचा तो अर्ज पुढे सुनावणी घेण्याच्या लायकीचा नाही असे म्हणून सुनावणी संपवली.हाय कोर्टाच्या आजच्या निर्णयात काही विशेष वाटण्याजोगे नाही आहे.कमी बुद्धीच्या माणसाचा मूर्खपणा सहन करावा लागल्यामुळे येणारा त्रासिकपणा न्यायपालिका,निवडणूक आयोग किंवा अन्य घटनाजन्य संस्थांच्या प्रतिसादात कधी ना कधी उमटणारच ना! अखेर त्यांच्या संयमाला सुद्धा अंत असणारच,आणि तो अशा रीतीने बाहेर पडणारच.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील प्रसारमाध्यमे समाजकंटक आहेत का ? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. काल भारतातील सर्व न्यूज च्यानेल्स नी एक बातमी चालवली. देशभरातली महामार्गांवर आता दुचाकी वहानांना सुद्धा टोल लावला जाणार आहे. अर्थातच याबद्दल संपूर्ण देशभर सामान्य नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच लोकांच्या या संतापलेल्या प्रतिक्रियांना माध्यमे हिरीरीने दाखवू लागली. सोशल साईटवर सरकारवर रोष प्रकट करणार्‍या पोस्ट खरडल्या जाऊ लागल्या. विरोधी पक्षांच्या उथळ प्रवक्त्यांच्या हाती कोलीत सापडले त्यांनी सुद्धा मोदी सरकारवर मनसोक्त गरळ ओकली. सरतेशेवटी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्र्‍यांनी या प्रकारची दखल घेऊन असा कुठला विचार सुद्धा सरकारने केला नसून ही बातमी संपूर्णपणे खोडसाळ आहे असे स्पष्टीकरण दिले त्यावेळी या दुष्प्रचारावर पडदा पडला. परंतु या निमित्ताने काही गंभीर प्रश्नांना जन्म दिला आहे. अजून किती काळ माध्यमांच्या खोटारडेपणाकडे अपरिपक्वता म्हणून सरकार दुर्लक्ष करणार आहे ? माध्यमांना वेळीच वेसण घातली नाही तर उद्या ते अश्याच धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या बातम्या प्रसारित करून देशभर दंगली सुद्धा भडकवू शकतात ? या खोडसाळपणाला आवर घालणारे कायदे अस्तीत्वात आहेत परंतु अंमलबजावणी करण्याचे धाडस मोदी सरकार का दाखवत नाही ?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ओसाडगावाच्या जहागिरीत सुद्धा आपल्याला वाटा मिळावा म्हणून भांडणे सुरू झाली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची विधानसभा 2024 नंतर दयनीय अवस्था झाली आहे. त्यांच्या हातातून सत्ता निसटली आता विरोधीपक्ष नेते पद सुद्धा मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने मिळू शकणार आहे. आता या संभाव्य विरोधीपक्षनेतेपदावरून शिवसेनेत लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. संजय राऊत आपले बंधु सुनील राऊत यांच्यासाठी बॅटिंग करत आहेत आणि इच्छुक असणारे भास्कर जाधव "दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते. तो विझल्यानंतर त्यात तेल टाकणे व्यर्थ आहे. याचप्रमाणे वेळीच माणसांची किंमत करा. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही," असे स्टेटस ठेवून आपली व्यथा व्यक्त करत आहेत. परंतु अंतिमतः निर्णय उद्धव ठाकरेच घेणार असून शेवटी आदित्य ठाकरे यांची वर्णी लावून घराणेशाही पक्षांच्या कुप्रथेचे पालन होणार यात संशय नाही. परंतु देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेता पद देण्यास राजी झाले आहेत का नाही ? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शक्तीपीठ महामार्गाला आंदोलनजीवी मंडळींनी विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यांना आंदोलने करून त्यातून पोट भरायचे असते परंतु अश्या मंडळींना देवेन्द्रजींनी कठोर शब्दात ठणकावले आहे. "काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. त्यांनी समृद्धी महामार्गालासुद्धा असाच विरोध केला होता. पण आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले आहे. विशेषत: मराठवाडा आणि दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असल्यास शक्तीपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या संपूर्ण भागात प्रत्येक १०० किलोमीटमध्ये ५०० ते १००० शेततळी आम्ही तयार करणार आहोत. या महामार्गावरून जेवढे नाले क्रॉस होतात तिथे बंधारे बांधून पाणी अडवणार आहोत. त्यामुळे दुष्काळी भागात जलसंवर्धनसाठी आणि जलपुर्नभरणासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. यासोबतच आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी तयार करणार आहोत. मराठवाड्याचे आणि दुष्काळी भागाचे चित्र पूर्णपणे बदलणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे," देवेन्द्रजींचे हे वक्तव्य समजून घेऊन आता तरी आंदोलनजीवी मंडळींचे डोळे उघडतील अशी आशा आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page