top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 26
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आता निखिल वागळेंनी सुद्धा म्हटले आहे की सध्याच्या राजकारणात शरद पवार यांना काही स्थान राहिलेले नाही. कधी नाही ते वागळे जरा सेन्सिबल बोलले म्हणायचे. मला आता राजकारणात फारसे स्थान न उरलेल्या शरद पवारांबद्दल अजिबात काही वाटत नाही. त्यांचे जे काही व्हायचे असेल ते होवो. त्यांचे ते बघून घेतील. आता महाराष्ट्रात पवारांनी मोठ्या केलेल्या त्या ' शाफुआं' विचारधारे चे काय होणार? आता पोरकी होणार की काय ती? तसे अजित पवार सुद्धा अधून मधून त्यांचा पक्ष ' शाफुआं ' विचारधारेवर चालतो असे म्हणत असतात,पण मला व्यक्तिशः त्यात काही फारसा दम वाटत नाही. अहो,ज्या शरद पवारांनी स्वतः कधी शाफुआं विचारधारा म्हणजे नक्की काय ते सांगितले नाही, ती तथाकथित विचारधारा शरद पवारांकडून उसनी घेतलेले अजित पवार काय सांगू शकतील तिच्याबद्दल? एकंदरीत काय तर शरद पवारांच्या राजकीय शेवटाबरोबरच शाफुआं विचारधारेचाही महाराष्ट्रात शेवट होण्याची शक्यता आता वाटते आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणाले की झाले ते बरेच झाले,शिवसेनेतून घाण निघून गेली. त्यानंतर शिवसेना कोणीही सोडली की शिवसेनेतून घाण निघून गेली असे म्हणून पक्ष सोडलेल्याचा जाहीर अपमान करण्याचा प्रघात च पडून गेला. त्या नंतर शिवसेनेतून निघून गेलेल्या घाणीची यादी बघा. नारायण राणे , राज ठाकरे , संजय निरूपम आणि सगळ्यात शेवटी एकनाथ शिंदे चाळीस आमदार आणि डझनभर खासदार घेऊन गेले. आता एकापाठोपाठ एक नेते आणि अनुयायी इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्यांदा मूळ शिवसेना सोडून गेले आहेत की आता म्हणावेसे वाटते की मूळ पक्षातच आता फक्त घाण शिल्लक राहिली आहे. कारण ज्यांचा घाण म्हणून उल्लेख केला जातो आहे ते सगळे आपल्या कर्तुत्वाने मोठे होत आहेत आणि ठाकर्‍यांच्या बाजूने असणारे आपली लायकी दाखवणारे वर्तन करत आहेत. पक्षाच्या रोज वाजणाऱ्या भोंग्याची आणि सध्याच्या पक्ष प्रमुखांची भाषा व त्या दोघांचे ही विचार लक्षात घेता हा पक्षच विशुद्ध घाण झाली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जग नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार करते आणि हा सिद्धान्त बारामतीला सुद्धा लागू होतो. बारामती तालुक्यात उगवता सूर्य अजित पवार असून शरद पवार हा सूर्य मावळला आहे यावर मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हायव्होल्टेज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 21 पैकी 20 जागा अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलला मिळाल्या, तावरे गटाला केवळ एक जागा जिंकता आलीये. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. अतिशय प्रतिष्ठेच्या अशा माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे रंजन तावरे आणि अजित पवार असा सामना झाला. शरद पवारांचं बळीराजा पॅनल आणि अपक्षांचं एक पॅनल असे इतरही दोन पॅनल रिंगणात होते. परंतु मतदारांनी शरद पवारांच्या पॅनल आणि अर्थातच राजकारणाला पूर्ण नाकारले आणि अजित दादांवर विश्वास कायम ठेवला आहे. अजून किती ठिकाणी तोंडघशी पडल्यानंतर शरद पवार सक्रिय राजकारणातून कायमचे निवृत्त होणार इतकीच आता उत्सुकता उरली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राहुल गांधी यांच्या वेडगळ आणि विद्वेषपूर्ण बडबडीला न्यायालयाने एकदाच आणि चोख उत्तर दिले आहे आता तरी त्यांना अक्कल येईल अशी आशा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गडबडीचे आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळुन लावली आहे. चेतन अहिरे नावाच्या याचिकाकर्त्याने पुढील आरोप केले होते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 नंतर अचानक 76 लाखांहून अधिक मतं पडली. निवडणूक आयोगाच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा. मतमोजणी पारदर्शक पद्धतीने झाली नाही. निवडणुकीत अनेक चुका आणि घोळ झाल्यामुळे निवडणूक निकाल रद्द करावी ही मागणी केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळताना याचिका कर्त्याला सणसणीत उत्तरे दिली आहेत. फक्त मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आरोप ग्राह्य धरले जात नाहीत. लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत निवडणूक याचिका करणे गरजेचे असते. मतमोजणी मध्ये घोळ गडबड झाली याचा पुरावा याचिकाकर्त्याने दिला नाही. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही छेडछाड वा अपारदर्शकता आढळली नाही.कोणत्याही अधिकृत दस्तावेजांमध्ये फरक आढळला नाही. तसेच, निवडणूक निकाल रद्द करण्यास ‘कायदेशीर आधार’ नाही. अस देखील स्पष्ट केलं. याचिकेतून कोणताही कायदेशीर ‘लॉस’ सिध्द झालं नाही, म्हणून याचिका बोगस आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा बोलका राघू उर्फ सकाळी नऊ वाजता बोंबलणारा भोंगा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृततेचा गळा घोटला आणि खाण तशी माती या न्यायाने त्यांच्या पक्षाच्या सगळ्याच मंडळींच्या जिभा जरा जास्तच सैल सुटल्या आहेत. पुण्याच्या भाजपाच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचे नाव दिले जावे अशी मागणी केली. यामुळे संतप्त झालेल्या जात्यंध शिउबाठा कार्यकर्त्यांनी काल पुण्यात पोस्टरबाजी केली आणि त्यात त्यांनी “ कोथरूडच्या ताई तुम्हाला नामंतरची इतकीच हौस आली असेल तर बुधवारपेठचे नाव मस्तानी पेठ करा” अश्या पद्धतीचे अश्लाघ्य , अश्लील , स्त्रियांचा अपमान करणारे संदेश प्रसारित केले. या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे, महिला आयोग सुद्धा यात उतरला आहे त्यामुळे संबंधितांना शिक्षा होईलच. पण सार्वजनिक जीवनात वावरतांना सभ्यतेचे जे निकष पाळायचे असतात त्याचे पालन नेत्यांनी केले नाही तर कार्यकर्ते सुद्धा बिघडतातच याचे हे उदाहरण आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page