🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शेतकर्यांना कर्जमाफी द्या म्हणून बच्चू कडू उपोषण करतात. सरकार त्यांच्याच नेतृत्वाखाली समिती नेमून तिचा अहवाल आला की कर्जमाफी देऊ म्हणून घोषणा करतात. परंतु हा मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर वाला खेळ आहे. सरकारचे शेतकर्यांवरील प्रेम म्हणजे पूतना मावशीचे प्रेम आहे. सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकर्यांना गरज आहे खतांची आणि बी बियाणांची. जमीनीवरील वास्तव काय आहे ?? 1350 ची खताची गोणी 1400,1450 रुपयांना विकली जाते आहे. डीएपी 1350 ला पडलं पाहिजे पण ते 1600 ला विकले जात आहे. युरिया 265 ला पडायला पाहिजे पण ते 320 किंवा 300 रुपयांना मिळत आहे. जी खते मिळाली पाहिजेत ती मिळत नाहीत. बी बियाणांच्या बाजारात नकली आणि निकृष्ट बियाणांचा सुळसुळाट झाला आहे. कृषि खाते एक दोन ठिकाणी कारवाई केल्याचे ढोंग करून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. देशात कोणतेही सरकार येवो शेतकर्यांना कोणीही वाली नाही हेच सत्य आहे आणि म्हणूनच हजारो वर्षे होऊन गेली; आजही शेतकरी इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो म्हणून बळीराजाची राजवट यावी हेच स्वप्न बघतात.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान चारी मुंड्या चित झाला आहे. त्याची हवाई सुरक्षा प्रणाली भारताने पूर्ण उध्वस्त केली. त्यांची अनेक क्षेपणास्त्रे , ड्रोन आणि विमाने सुद्धा भारताने पाडली. यामुळे पाकिस्तानने आपल्या बजेट मध्ये संरक्षण खात्याची तरतूद 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी संरक्षण बजेट 428 अब्ज (पाकिस्तानी) रुपयांनी वाढून 2550 अब्ज रुपये होईल. संरक्षण खात्यासाठी देण्यात आलेला हा निधी पाकिस्तानच्या जीडीपीच्या 1.97 टक्के असून एकूण बजेटच्या 14.5 टक्के आहे. एकीकडे विकासात्मक कामांवर पैसे खर्च करा असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पाकिस्तानवर सातत्याने दडपण आहे आशयावेळी संरक्षणावर वाढवलेला खर्च जागतिक वित्तीय संस्थांना आवडणार नाही हे सत्य आहे. परंतु पाकिस्तानने संरक्षणखर्चावरील ही वाढवलेली तरतूद केवळ ट्रंप यांच्याकडून पैसे उकळण्याची कृल्प्ती आहे. पाकिस्तान संरक्षणावर जितका खर्च करतो आहे असे दाखवतो हा सगळा पैसा सैनिकांचे पगार आणि अधिकार्यांची दौलतजादा यात खर्च होतो. शस्त्र खरेदी नावाचे प्रकरण पाकिस्तानात अस्तीत्वात नाही. आपल्या शस्त्रांची चाचणी घेण्यासाठी चीन आणि अमेरिका आपली नवीन शस्त्रे त्यांना फुकटात देतात.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
खरेतर जी ७ परिषदेच्या वेळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये भेट होण्याचे ठरले होते,परंतु अचानक काही महत्त्वाच्या कामांमुळे ट्रम्प या नियोजित भेटी आधीच अमेरिकेला परत गेल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात आज टेलिफोन वरून सुमारे ३५ मिनिटे संभाषण झाले अशी माहिती भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव श्री विक्रम मिसरी यांनी दिली. या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की भारत - पाकिस्तान द्विपक्षीय संबंधात भारताला न पूर्वी कोणाच्या मध्यस्थीची आवश्यकता वाटली, न तशी गरज सध्या भासत आहे न की भविष्यात अशी काही गरज भासेल.जगातील सर्वात बलिष्ठ देशाच्या ट्रम्प सारख्या आक्रमक राष्ट्राध्यक्षाला थेट अशा शब्दात सांगणे या साठी नक्कीच धाडस हवे आणि ते भरपूर प्रमाणात आपल्याकडे असल्याचे या संभाषणातून पंतप्रधान श्री मोदी यांनी सर्वप्रथम खुद्द ट्रम्प यांनाच आणि त्यांच्या बरोबरच जगाला ही दाखवून दिले आहे.अशा रीतीने व्यक्तिगत मैत्री ही माझ्या राष्ट्राच्या हितापुढे मला दुय्यम वाटते असा स्पष्ट संदेश पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोणतीही भीडभाड न बाळगता दिला आहे
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नेहमीप्रमाणे शरद पवार म्हणत आहेत की हिंदी ची सक्ती नको. कालच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शाळेत शिकण्याच्या भाषांबद्दल सांगितले आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे प्रत्येक यत्तेत तीन भाषा शिकवणे अनिवार्य आहे.म्हणून महाराष्ट्र शासनाने मराठी,इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शाळेत शिकवल्या जाव्यात असा निर्देश दिला आहे.परन्तु या तीन पैकी हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही.जर एखाद्या शाळेत हिंदी व्यतिरिक्त दुसरी कोणतीही भारतीय भाषा शिकवण्याची मागणी करण्यात आली तर त्या भाषेसाठी साठी शिक्षक नेमण्यास अनुमती मिळेल मात्र हिंदी ऐवजी निवडलेल्या त्या भाषेचे कमीत कमी २० विद्यार्थी वर्गात हवेत.हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषेचे २०पेक्षा कमी विद्यार्थी असले तर ते ही चालेल.मात्र मग त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने ती भाषा शिकवली जाईल.शरद पवारांना यात सुद्धा सक्ती दिसते.म्हणून ते पत्रकारांना बोलावून त्यांना बाईट देतात की हिंदीची सक्ती नको.आणि लाचार पत्रकार त्यांना आदल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर शासकीय धोरण काय आहे ते सांगितले असून ही ते पवारांच्या नजरेस न आणता मुकाटपणे तो बाईट घेतात आणि टीव्ही चॅनेल वर दाखवतात.म्हणूनच त्यांना मराठी प्रेक्षक लाचार पत्रकार म्हणतात.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उद्धव ठाकरे आता हास्यास्पद होऊ लागले आहेत. राजकीय नेत्याने पक्षाला , समाजाला दिशा दाखवण्याचे काम करायचे असते. स्टँड अप कोमेडियन हा एक वेगळा व्यवसाय आहे, आणि अश्या विनोदवीराला कोणीही गांभीर्याने घेत नाही. उद्धव ठाकरे यांना लोकांनी राजनेता म्हणून गांभीर्याने घ्यायचे असेल तर त्यांना आपले वर्तन सुधारणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी गर्जना करून देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले होते,” एक तर तू रहाशील किंवा मी . “ देवेन्द्रजींनी मंद स्मित करून 132 जागा जिंकल्या आणि उद्धव रावांनी 20 जागा जिंकल्या. आता काल पण त्यांनी देवेन्द्रजींना उघड आव्हान दिले,” कम ऑन किल मी.” आता पण देवेंद्रजी मंद हसत आहेत. कारण 2017 साली उद्धव ठाकरे यांच्याकडे 92 जागा होत्या त्यातले 75 नगरसेवक आधीच शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे ठाकर्यांचे बृहन्मुंबई महापालिकेत पानिपत अटळ आहे. पण आधीच अश्या गमजा करून ते स्वतःचे अवमूल्यन का करून घेत आहेत हे अनाकलनीय आहे.
🔽
#Farmers #Scam #Fertilizer #Seeds #BacchuKadu #Crisis #SindoorOp #Pakistan #Defense #Budget #IMF #Modi #Trump #Call #Bold #IndiaFirst #Language #Hindi #Policy #Pawar #Media #UddhavThackeray #Comedy #Politics #BMC #Fadnavis





Comments