🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जशी जशी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जवळ येत आहे, राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा दुरंगी सामना आणि तिसरी आघाडी व मनसे हे लिंबू टिंबू म्हणून लढणार का ? अश्या चर्चा रंगल्या असताना उबाठा गट आणि शिंदे गटाने एकमेकांचे जाहीर वस्त्रहरण सुरू केले आहे. हे कमी होते म्हणून राष्ट्रवादी कोंग्रेस आणि शिंदे सेना यांच्यात पण हार प्रहार सुरू झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच व्हायरल केला. प्रत्युत्तरादाखल शिंदेसेनेच्या महिंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे अघोरी पूजेचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून या दोन नेत्यांमध्ये पेटलेला हा वाद आता विकोपाला गेला आहे. यात महायुती सरकारची बदनामी होते आहे. महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिठवणे अत्यंत आवश्यक आहे. संजय राऊत यांनी तर या विषयावर सामना मध्ये चक्क एक संपादकीय खरडुन झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भाषा अत्यंत आक्षेपार्ह झाली आहे आणि आपल्या हातातून सगळे निसटून जाते आहे या वैफल्याने ग्रस्त होऊन ही मंडळी आता सहानुभूती मिळवण्यासाठी प्रचंड घाणेरडे बोलत आहेत जेणेकरून शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापून हल्ला करतील आणि यांना सहानुभूती मिळवून मते घशात घालता येतील असा प्रयास सुरू झाला आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी असे काही नाट्यमय घटनाक्रम घडावेत आणि त्याचा लाभ घेऊन आपल्याला सत्ता राखता येईल हाच त्यांचा होरा आहे. काल उबाठा सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांना नपुंसक राजकारणी असे संबोधले आहे. हा सापळा आहे. शिंदेसेनेकडे आता सत्ता आहे त्यामुळे त्यांच्या शिवसैनिकांनी कायदा हातात घेतला की यांना व्हीक्टिम कार्ड खेळता येईल. उद्धव ठाकरे यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते जाणीवपूर्वक असे वर्तन करत आहेत. एकनाथ शिंदेंना हे प्रकरण अत्यंत काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे यात शंकाच नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
परस्पर समन्वयाचा अभाव असल्याने किती गैरसमज निर्माण होतात याचे एक उदाहरण नुकतेच बघण्यात आले आहे. अक्कलकोटचे भाजपा आमदार संग्राम जगताप हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्या मतदारसंघात काही कसाई मंडळी गायी घेऊन जात होती. गोरक्षकांनी तो टेम्पो थांबवला. कसायांनी आमदारांना फोन करून आम्ही शेतकरी आहोत आणि गोरक्षक त्रास देत आहेत असा बनाव केला. आमदारांनी गोरक्षकांना शिवीगाळ केली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. गोरक्षकांना त्रास झाल्याने सोशल साईटवरील हिंदू सुद्धा भडकले आणि आमदार महोदयांना ट्रोल केले गेले. संग्राम जगतापांना सत्य समजल्यावर त्यांनी गोरक्षक मंडळींची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला. परंतु या सगळ्या भानगडीत भाजपाची आय टी सेल निष्क्रिय वागणुकीमुळे अत्यंत बदनाम झाली. प्रकरणाला आरंभ झाला त्याच वेळी आय टी सेल ने सक्रिय होऊन सगळी माहिती मिळवली असती आणि सोशल साईट वर टाकली असती तर गोरक्षक विरुद्ध आमदार असा संघर्ष पेटलाच नसता. गोरक्षक आणि आमदार साहेब यांच्या वादात आय टी सेल ने सकारात्मक भूमिका घेऊन घटनाक्रमाच्या पातळीवर हालचाल केली असती तर प्रकरण ना विकोपाला गेले नसते ना पक्षाची बदनामी झाली असती.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कोंग्रेस आणि राष्ट्रवादी कोंग्रेसची महाराष्ट्रात प्रदीर्घ राजवट असल्याने आपल्याकडील सर्वच प्रशासकीय यंत्रणा या सेक्युलर झाल्या असून त्यांच्या मते मुस्लिमांनाच फक्त भाव आणि भावना असतात हिंदूंच्या भावनांचा विचार करण्याची गरजच नाही. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील आळंदी शहराजवळ विकास आराखड्यात कत्तलखान्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे विकास आराखडा बनवणारे जे कोणी अधिकारी होते त्यांना आळंदी कशासाठी प्रसिद्ध आहे याची कल्पना नव्हती का ?? मुळातून विकास आराखडा बनवताना आपण आळंदी मध्ये कत्तलखान्यासाठी आरक्षण ठेवणे चुकीचे आहे हे अधिकार्यांना समजत नव्हते का ? वारकरी चिडले त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन ते आरक्षण उठवले आहे हे योग्यच झाले. पण हा विषय इथे संपू नाही. ज्या अधिकार्याने हे आरक्षण टाकले होते त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर एक सुंदर दृश्य बघायला मिळाले. आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या काठावर एक आजी शांतपणे बसलेल्या होत्या. त्या क्षणांच्या चित्र त्यांच्या आठवणीत साठवून ठेवायचं होतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि जवळच उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांना विनंती केली —“एक फोटो काढाल का?”ते अधिकारी काही साधे पोलीस नव्हते, तर थेट तीन स्टार असलेले सहा. पोलीस निरीक्षक होते. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कोणताही अभिमान न बाळगता, मनापासून त्या आजींचा मोबाईल घेतला आणि फोटो काढला.फोटो घेतल्यावर त्यांनी प्रेमाने सांगितलं,“आज्जी, उभ्या राहा, फोटो अजून छान येईल!”ते ऐकताच आज्जीही आनंदाने उठल्या आणि हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी उभ्या राहिल्या. महाराष्ट्र पोलीस हे केवळ २४ तास कर्तव्य बजावत नाहीत, तर सामान्य माणसाच्या भावना समजून घेणारा आणि त्यांना मान देणारा संवेदनशील माणूसही असतो.
🔽





Comments