




🖋️ अभिजीत राणे लिहितात
खामगाव मतदारसंघातील तरुण आमदार ,महाराष्ट्राचे कामगार मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश पांडुरंग फुंडकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भाजप तळागाळात रुजवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले अश्या पांडूरंग फुंडकर दादांची पुढची पिढी सुद्धा राजकारणात आली आहे आणि आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहे. सक्रीय आमदार , तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कायमच संपर्कात रहाणारा आमदार आणि कार्यशील कामगारमंत्री म्हणून आकाशजीची ओळख आहे. महायुती सरकार सत्तारूढ होऊन दोन महिनेच लोटले आहेत परंतु या कालावधीत त्यांनी प्रदीर्घ प्रलंबित बृहन्मुंबई महापालिकेतील ८००० कंत्राटी सफाई कामगार आणि १००८ ठोक मानधन रोजंदारी तत्वावरील कामगारांच्या वेतन समस्येला त्यांनी सोडवले आहे. नागपूर मेट्रो कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे माथाडी कामगारांचे प्रश्नसुद्धा त्यांनी अग्रकमाने सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र भाजपची दुसरी पिढी अर्थात यंग ब्रिगेड ही आकाश फुंडकर यांच्या सारख्या सक्षम नेत्यांच्या रूपाने कार्यरत झाली आहे. सक्रीय , कार्यक्षम आणि जबाबदार स्वरूपातील घराणेशाही ही लोकशाहीसाठी वरदानच सिद्ध होते आणि याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आकाश पांडुरंग फुंडकर.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे येणारे ,मराठवाड्यातील एक उदयोन्मुख खंबीर नेतृत्व म्हणजे अतुल सावे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कायम प्रसन्न मुद्रा, भेदक नजर आणि विशाल कर्तुत्व. श्री.मोरेश्वर सावे यांच्या प्रामाणिक आणि आदर्शवत अशा चारित्र्य संपन्न जीवनाचा वसा पुढे चालवणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री अतुल जी सावे. अतुलजींना मंत्रीपदाची पहिली संधी २०१८ साली उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. नंतर २०२२ साली त्यांना सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्रीपद प्राप्त झाले. या दोन्ही वेळा त्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप सोडल्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना अल्पकाळात दाखविलेल्या कर्तुत्वामुळे गृहनिर्माण सारख्या महत्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. भाजपची पक्ष म्हणून असणारी जी विचारधारा आहे त्यानुसार राष्ट्र प्रथम , नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी तुम्ही स्वतः, याच विचारधारेला आत्मसात करून अतुलजी सावे एक यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहीताच्या तळमळीतून राजकारणात आले आणि त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याच्या माध्यमातून जनसेवेचा वसा अखंड आणि अविरत प्रवाही ठेवला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पाच मिलियन डॉलर द्या आणि गोल्ड कार्ड रुपी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवा अशी अफलातून योजना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी सत्ता मिळाल्या दिवसापासून आपल्या पोतडीतून काढलेल्या प्रत्येक योजनेमुळे जगभरात खळबळ निर्माण होते. आणि पहिल्या योजनेच्या धक्क्यातून लोक सावरण्यापूर्वीच ट्रम्प यांनी पोतडीतून नवीन योजना काढलेली असते. थोडक्यात ट्रम्प क्वेक थांबायलाच तयार नाही. ट्रम्प यांनी मांडलेली गोल्ड कार्ड योजना अभिनव आहे. जगभरातील मोठमोठे उद्योजक आपल्या देशात स्थाईक व्हावेत आणि त्या माध्यमातून आपल्या देशात परकीय चलनाचा ओघ वाढत रहातो आणि हे जगातील प्रत्येक करसवलत देणाऱ्या देशांचे धोरण आहे. ब्रिटीश सरकारने लंडन मध्ये असा एक सप्ततारांकित भाग निर्माण केला आहे जिथे जगातील श्रीमंत आणि सेलिब्रिटी मंडळी रहातात. त्यांना विशेष नागरिकत्व प्रदान केले गेले आहे. याच पद्धतीचे विशेष नागरिकत्व सौदी अरेबिया सुद्धा प्रदान करते त्यामुळे अशी योजना ट्रम्प यांनी आणली यात काहीच नवल नाही. पण डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत उत्तम व्यावसायिक असल्याने त्यांनी आणलेली गोल्ड कार्ड योजना या सर्व योजनांच्या पेक्षाही अधिक चांगली असणार आहे यात संशयच नाही. श्रीमंत मंडळींनी प्रती व्यक्ती ५ मिलियन डॉलर्स देऊन नागरिकत्व घेतल्यास अमेरिकेच्या तिजोरीत मोठीच भर पडेल यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दोन मर्सिडीज भेट दिल्या की ठाकरे यांच्या शिवसेनेत पद दिले जाते. अश्या पद्धतीचे खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. संजय राऊत , उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर कठोर आणि थोडीशी मर्यादाहीन टीका सुद्धा केली. शिवसेनाप्रमुख एकनाथजी शिंदे आता नीलम गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. नीलम गोऱ्हेंनी काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या. परंतु राज ठाकरे ,नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे यांनी देखील ठाकरे यांच्या कंटेनर दर्जाच्या भ्रष्टाचारावर टीका केली आहे. मात्र नीलम गोऱ्हे बोलल्यावर त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे शोभत नाही. एकनाथ शिंदेंनी पाठराखण केल्याने नीलम ताईंना हायसे वाटले असेल. महापालिका निवडणूक लवकरच होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच आपापले तोफखाने बाहेर काढले आहेत. आरोप आणि प्रत्यारोपांचा गदारोळ आता वर्षभर सुरूच रहाणार आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना कायदेशीर कारवाई करणारी नोटीस पाठवली असून हा संघर्ष कमी होण्याची तूर्तास तरी चिन्हे नाहीत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला स्पष्टपणे बजावले आहे की भविष्यात नाटो राष्ट्रांनी आपल्या सुरक्षेची व्यवस्था स्वतःच करावी , आजवर अमेरिकेने ही जबाबदारी स्वीकारली होती परंतु यापुढे हे शक्य होणार नाही. यामुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे. सगळ्याच राष्ट्रांना आपला संरक्षणावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढवावा लागणार आहे. या जोडीला त्यांच्यासमोर भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजे शस्त्रे कोठून विकत घ्यायची ? कारण सगळ्यांनी एकदाच मागणी नोंदवल्यास अमेरिकेतील शस्त्रास्त्र उत्पादक त्यांना पुरवठा करू शकणार नाहीत. रशियाच मुख्य शत्रू असल्याने त्याच्याकडून शस्त्रे घेणे शक्य नाही. चीन हा देश भविष्यातील सर्वात मोठा शत्रू असल्याचा अहवाल युरोपातील प्रत्येकच देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी दिला असल्याने चीन कडून शस्त्रे विकत घेणे शक्य नाही. या परिस्थतीत भारत हा एकमेव विश्वसनीय , किफायतशीर आणि उत्तम शस्त्रास्त्रे देणारा पुरवठादार सिद्ध होऊ शकतो. नरेंद्र मोदींनी दूरदृष्टीने मेक इन इंडिया मिशन २०१४ साली सुरु केले होते आणि गेल्या दहा वर्षात भारतात शस्त्रास्त्र उत्पादनांचा वेग , दर्जा वाढला आहे आणि आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर होतो आहोतच पण आता आपल्याकडील शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणात युरोपला निर्यात करून आपल्या देशाची परकीय गंगाजळी वाढू शकते. थोडक्यात संपूर्ण जगासाठी ट्रम्प हा सैतान असला तरी भारतासाठी मात्र तो देवदूत सिद्ध होतो आहे.
🔽
Comments