top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 20
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इस्रायलचे संरक्षण संचालक जनरल आमिर बराम यांनी भारताचे संरक्षण सचिव राजेशकुमार सिंग एक तातडीचा दूरध्वनी करून मदत मागितली आहे. इराणच्या बॅलेस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपुढे इस्रायलची बचाव यंत्रणा टिकाव धरू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. फतेह सकट इराणने ३०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे इस्त्रायली शहरांवर डागली. त्यापैकी किमान ४० तरी तेल अविव आणि अन्य शहरांवर पडून मोठा विध्वंस झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपली आकाश बचाव यंत्रणा इस्रायलला तातडीने पुरवावी अशी विनंती केली आहे. भारताच्या बचाव यंत्रणेने चिनी, तुर्की आणि अमेरिकन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना आकाशात वरच्या वरच नष्ट करूनपाकिस्तानबरोबरच्या युद्धात कसं बावनकशी यश मिळवलं हे नुकतंच सगळ्या जगाने पाहिलं आहे. शिवाय संरक्षण सचिवाला केवळ शस्त्र खरेदी किंवा मदतीसाठीच फोन केला जात असतो. अन्य बाबी त्याच्या अखत्यारीत नसतात.हे लक्षात घेता विद्युत् वेगाने केल्या जाणाऱ्या लढाईत चढाई आणि बचाव या दोन्ही बाबतीत महान समजल्या जाणाऱ्या इस्रायलला बचाव यंत्रणेसाठी (अमेरिका सोडून) भारताकडे मदतीची याचना करावी लागत असेल तर त्यापेक्षा अधिक अभिमानाची गोष्ट ती कुठली !

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

माणसाला कोणतीही गोष्टी फुकट दिली तर त्याला त्याची किंमत रहात नाही. त्याच प्रमाणे लायकी नसलेल्या लोकांवर उपकार केल्याने काहीही फायदा होत नाही. आपल्या संस्कृतीत म्हणूनच दान सुद्धा सत्पात्री करा असे सांगितले गेले आहे. “जहा झुग्गी वहा मकान” या योजनेअंतर्गत दिल्लीत नरेंद्र मोदींनी 1600 गरीब झोपडपट्टीत रहाणार्‍या कुटुंबांना अत्यंत सुंदर सदनिका प्रदान केल्या. त्यात त्यांना वीज , पाणी, गॅस , लिफ्ट , मुलांना खेळायला बाग अश्या सगळ्या सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. आणि फक्त पाच महिन्यात त्या 1600 कुटुंबांनी त्या सुंदर वसाहतींचे परत एकदा झोपडपट्टी मध्ये रूपांतर करून दाखवले आहे. सर्वत्र कचरा , घाण पसरली आहे. शहरांमध्ये फुकट घरकुल योजना राबवणार्‍या सगळ्याच सरकारांनी या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे. अश्या वसाहतीत रहाणार्‍या लोकांना सरकार त्यांच्यावर उपकार करत आहे याची स्पष्ट जाणीव करून देणे आणि दिलेल्या घरांमध्ये स्वच्छता पालन करणे बंधनकारक केले पाहिजे. वसाहती साफ ठेवल्या नाही तर त्यांना दंड लावला पाहिजे आणि तरीही सुधारणा होत नसेल तर सरळ त्यांना हाकलून देऊन अन्य गरीबांना ही घरे हस्तांतरित केली पाहिजेत. असे केले नाही तर “मोफत का चन्दन घिस मेरे नंदन” छाप घाणेरड्या प्रवृत्तीचा अंत अशक्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आपली आई दवाखान्यात दाखल झाली आहे तिची प्रकृती अस्वस्थ आहे अश्यावेळी कोणता मुलगा भारताबाहेर आपल्या मित्राच्या लग्नाला जाईल ??? परंतु भारताचे विरोधीपक्ष नेते, पन्नाशी पार तरुण राहुल गांधी मात्र जॉर्ज सोरोस च्या पुत्राच्या लग्नाला जातीने हजर होते. जॉर्ज सोरोस हा अमेरिकेतली अब्जाधीश असून तो अमेरिकेन डीप स्टेटचा भाग आहे. जगभरात अमेरिकेचे प्यादे असणार्‍या राजवटी असाव्यात यासाठी तो षडयंत्र करतो त्या त्या देशातील गद्दारांना निधी प्रदान करून सत्तांतर घडवतो. अरब स्प्रिंग , बांग्लादेश मधील सत्तांतर या सगळ्या त्याच्याच ऊचापती आहेत. त्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओतला होता हे उघड सत्य आहे त्याने फंडिंग केलेल्या इंडि आघाडीला यश मिळाले नाही परंतु इंडि आघाडीचे नेते या आर्थिक स्नेहबंधामुळे या लग्नाला हजर होते का हा प्रश्न निर्माण होतो आहे ??? भाजपाने या संदर्भात संसदेत आवाज उठवणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राजकीय अनुभवाचा व देशावरील प्रेम आणि तारतम्याचा काहीही परस्पर संबंध नसतो हे काल सुप्रिया ताई सुळे या शरद पवारांची कन्या , संसदरत्न खासदार यांनी सिद्ध केले आहे. एक रेल्वे 700 जवानांना घेऊन भारताच्या उत्तर सीमेकडे निघाली होती. या रेल्वेतील एक ए सी कोच मधील एयर कंडिशनर युनिट बंद होते आणि त्यामुळे जवानांना त्रास होत होता. कोणीतरी सुप्रिया ताईंना सांगितले असेल. त्यांनी या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मेंशन करून एक ट्विट केले त्यात त्यांनी रेल्वेचे नाव , कोठून कुठे निघाली आहे , आत्ता कोणते स्टेशन पार केले आहे आणि कोणत्या स्टेशनच्या दिशेने निघाली आहे ही सगळी माहिती टाकून सांगितले की यात लक्ष घाला. परंतु त्या खासदार आहेत , त्या स्वतः रेल्वे मंत्र्‍यांना थेट फोन करून सांगू शकतात. जे त्यांनी केले नाही. अश्या पद्धतीने आपल्या जवानांच्या हालचालींची माहिती सार्वजनिक करणे हा गुन्हा आहे. जवानांच्या हालचालींची माहिती देणार्‍या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ टाकू नका अश्या संरक्षण मंत्रालयाच्या सुस्पष्ट सूचना आहेत. सामान्य नागरिक याचे पालन करतात पण सुप्रिया सुळे इतकी प्रसिद्धीच्या हव्यासापायी अश्या पोस्ट करतात हे लज्जास्पद असून त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आज पुणे–नाशिक प्रवासादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. संगमनेर तालुक्यात (कॉन्ग्रेसच्या/थोरात बालेकिल्ल्यात) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. विखे पाटील यांचे भव्य बॅनर्स ठळकपणे झळकत होते. विशेषतः आजच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने निदर्शनात येत होते. अवघ्या तीन वर्षांपूर्वी, महाराष्ट्राच्या जनमानसाच्या जाणिवेबाहेरील चेहरा असलेल्या एका बहुजन नेत्याला त्यांनी महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी नेतृत्वाच्या केंद्रस्थानी स्थिर केलं.आज ती व्यक्ती केवळ उपमुख्यमंत्री नाही, तर एक निर्विवाद हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर दृढपणे उभी आहे. अनेकांना हा बदल ठाकरे कुटुंबावर अल्पकालीन अन्याय वाटू शकतो, परंतु दूरगामी विचार केल्यास यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक निर्णायक वळण घेण्याची क्षमता आहे.ज्यांना वाटत होतं की शिंदे यांचं राजकारण क्षणभंगुर ठरेल, त्यांना वास्तव आज वेगळं सांगतं. विरोधक, भक्तगण, गुलाम मानसिकतेचे पॉकेट पत्रकार यांचे अंदाज अपुरे ठरले आहेत. आजच्या घडीला, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील प्रभावी आणि निर्णायक हिंदुत्ववादी नेते म्हणून स्वीकारले गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. या दूरदृष्टीसाठी आणि राजकीय खेळीसाठी अमितभाई शाह यांना मन:पूर्वक धन्यवाद आणि सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page