top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 16
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सादिक खान नावाचा पाकिस्तानी मूळ असलेला मुसलमान गेले तीन कार्यकाळ लंडनचा मेयर अर्थात महापौर आहे. या कालावधीत त्याने लंडनचे कराची करून टाकले आहे. सर्वत्र पाकिस्तानी मुस्लिमांचा भरणा झाला आहे. शहरातील काही भागात गोरे पोलिस पाय सुद्धा ठेवू शकत नाहीत अशी आजच परिस्थिती आहे. या इस्लामीकरणाला वेसण घालण्याऐवजी किंग चार्ल्स यांनी या सादिक खानला सर हा सर्वोच्च नागरी किताब प्रदान केला आहे. जगभरातील तज्ञ ब्रिटिश सरकारला सावध करत आहेत. त्यांच्यामते पाकिस्तानी मुस्लिमांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असून अजून 25 वर्षात ब्रिटन इस्लामी राष्ट्र होईल इतकी मुसलमानांची संख्या तिथे वाटते आहे. ब्रिटनला आपल्या या आत्मघातकी वर्तनाचे पुनर्मुल्यांकन करणे आवश्यक आहे अन्यथा लवकरच ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता ते ग्रेट ब्रिटन जगातील 58व्या क्रमांकाचे इस्लामी राष्ट्र बनेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील हवाई अपघातांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो आहे. अहमदाबाद लंडन विमानाला झालेला अपघात त्यात 250 पेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले. एका प्रवाशाने हा आरोप केला आहे की हे विमान पॅरिसहून अहमदाबादला आले त्याच वेळी त्याच्यात अनेक समस्या होत्या. एयर कंडिशनर नीट काम करत नव्हता , टच स्क्रीन काम करत नव्हती. अश्यावेळी विमानाची पूर्ण तपासणी करून आणि तक्रारींचे निराकरण करूनच विमान पाठवण्याचा निर्णय झाला असता तर आज ते 250 लोक जीवंत असते. रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत वणी, यवतमाळ येथील जैस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे. इथे सुद्धा धुके होते, हवामान खराब होते तरीही हेलिकॉप्टर उडवण्यात आले. आता यात आयर्न एव्हिएशन कंपनीच्या स्टाफची चूक आहे. समजा एखादी फेरी कमी झाली असती तर आर्थिक नुकसान झाले असते. आता हेलिकॉप्टर गेले जोडीला सात पर्यटक सुद्धा दगावले. हवाई वहातूकीच्या संदर्भात सुस्पष्ट नियमावली बनवणे आणि त्याचे काटेकोर पालन करणे कायद्याने बंधनकारक करणे अत्यंत आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इराण आणि इस्रायल युद्धाचा कालच्या रात्रीतील घटनाक्रम बघूया. शनिवार ते रविवारच्या मध्यरात्री, इराणने तेल अवीव, हेफाचा भाग, तसेच जेरुसलेमवर सुमारे 150–200 बॅलिस्टिक मिसाइल्स चा मारा केला. तेल अवीव येथे झालेल्या हल्ल्यांमुळे 10 लोकांचा मृत्यू झाला , 370 पेक्षा जास्त जखमी झाले. इजरायलने प्रत्युत्तरादाखल इराणातील नातांझ अणु स्थल, तेहरान येथील तेल टँकर, आणि इतर न्यूक्लियर आणि संरक्षण स्थानांवर हवाई हल्ले केले ज्यात अजून 6 वरिष्ठ जनरल, 6–14 न्यूक्लियर वैज्ञानिक आणि 224 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला व 1277 जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. दोन्ही देशांनी आपापले हवाईक्षेत्र बंद केले असून इस्रायल मधील नागरिक भूमीखालील शेल्टर मध्ये गेले आहेत. इराणनेही शाळा बंद केल्या, मेट्रो-स्टेशन्सना आश्रय दिला. दरम्यानच्या काळात जगभरातील तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या असून हा संघर्ष थांबवण्याच्या दृष्टीने अजूनही काहीही हालचाल होताना दिसत नाही. या संघर्षात भारताची मोठीच कोंडी झाली आहे. आपण इराण किंवा इस्रायल दोघांपैकी एकाचीही बाजू घेऊ शकत नाही कारण दोन्ही राष्ट्रांशी आपले वेगवेगळ्या पातळीवर हितसंबंध गुंतलेले आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देशाच्या राजकारणात 55 वर्षे घालवलेल्या शरद पवारांना सत्तेशिवाय करमत नाही आणि मग सत्ता मिळवण्यासाठी ते करामत करून कुणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून सत्तेच्या वळचणीला जाऊन बसतात हे सातत्याने दिसणारे चित्र आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी झाली आणि त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच एक गट सत्ताधारी तर दुसरा विरोधी बाकांवर बसला. पण आता पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही आमदारांना सत्ता खुणावत असल्याची सूत्रांची माहिती आहे. विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील काम होत नसल्याने आमदार अस्वस्थ झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सत्तेत जाण्यासाठी या आमदारांनी शरद पवारांकडे सुर आवळलाय, अशी देखील माहिती मिळतेय. मात्र भाजपसोबत युती करणार नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. अर्थात शरद पवार जे करणार नाही असे म्हणतात ती गोष्ट ते आवर्जून करतात त्यामुळे आता ते भाजपा बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यावर जाणार का आधीच जाणार इतकेच औत्सुक्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नेमेची येतो पावसाळा आणि नेमेची मुंबईची होते तुंबई. गेली दोन दशके पाऊस नेहमी पडतो तितकाच पडतो आहे परंतु दरवर्षी मुंबई पाण्याखाली जाण्याचे प्रमाण प्मातरा अधिकाढीक वाढते आहे. कालपासून परत एकदा मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जलमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. या समस्या का वाढत आहेत ? याचे मुख्य कारण म्हणजे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची अपुरी सोय. मुंबईसारख्या शहरात पावसाचे पानी ड्रेनेज द्वारे समुद्रात टाकण्याचा उफराटा प्रयोग सातत्याने अपयशी होतो आहे परंतु सरकार शेकडो कोटी रुपये खर्च करून ब्रिमस्टोव्याड सारखे प्रकल्प राबवत ते पानी उचलून समुद्रातच टाकत आहे. दुसरीकडे कोंक्रिटीकरणाचा अतिरेक केल्याने संपूर्ण शहरातील रस्ते म्हणजे मोठा स्विमिंग पूल झाला आहे. एकंदर देशाच्या आर्थिक राजधानीची ही अवस्था शोचनीय आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page