top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 15
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव चाणक्य मीच आहे हे काल देवेन्द्रजींनी पुन्हा एकदा सिद्ध केले. गेले काही दिवस पवारांनी पोसलेला मीडिया उद्धव आणि राज यांच्या संभाव्य मनोमिलनावर भरपूर पतंग उडवत होते. या मनोमिलनासाठीची मुख्य अट भाजपाशी संबंधच ठेवायचे नाही अशी होती. आणि काल राज ठाकरे यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि उद्धव सेनेच्या जोडीला समस्त पत्रकार मंडळींचा प्रेमभंग झाला. वास्तवात गेली कित्येक वर्ष उद्धवने राज यांना त्रास दिला आहे, फसवले आहे , त्यांचे नगरसेवक पळवले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते एकत्र येणे अशक्य होते. परंतु उद्धव सेनेला यावेळी बृहन्मुंबई राखायची असेल तर राज यांना बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नाईलाजातून या प्रेमळ हाका मारणे सुरू होते. परंतु देवेंद्रजी आणि राज यांनी विचारपूर्वक नियोजन करून सापळा रचला. मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज यांनी एकत्र येण्याचे सुतोवाच केले आणि उद्धवसेना त्यांच्यासह या सापळ्यात अडकली. गेली दोन महीने राज यांच्याशी युती होणार अशी हवा मीडियाने निर्माण केली आणि वातावरण पुरेसे तापले आहे हे लक्षात आल्यावर देवेंद्रजी आणि राज यांनी त्यावर पाणी ओतले. या प्रकारात आता उद्धव सेना पार उघडी पडली आहे. आत्मविश्वास खच्ची झाला आहे आणि जनतेला सुद्धा यांची लायकी कळली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जेष्ठ वकील शिवाजी कोकणे यांनी “भारतीय संविधांनातील पापे” या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात त्यांनी संविधांनातील त्रुटी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांचा हा एक मुद्दा वाचला तर त्यांचे चिंतन किती सखोल आहे हे समजेल. “ भारताची जेव्हा फाळणी झाली . तेव्हा पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात मिळून सुमारे २० टक्के पेक्षा जास्त हिंदू होते जे भारताचे नागरिक म्हणून जीवन जगू इच्छित होते . परंतु फाळणीनंतर भारताचे संविधान लिहून पूर्ण झाले. संवैधानिक तरतुदीनुसार दिनांक 19 जुलै 1948 पूर्वी जे लोक भारतात आले फक्त त्यांनाच भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर भारतात आलेल्या नागरिकांना बेकायदेशीर किंवा घुसखोर ठरवणारी तरतुद भारतीय संविधानात करण्यात आली. त्यामुळे जे हिंदू मूळचे भारतीय नागरिक होते त्यांचे नागरिकत्व भारतीय संविधानाने बेकायदेशीर ठरवले. भारतीय संविधानाने आपल्या देशातील नागरिकांना अशा पद्धतीने घुसखोर ठरवले. भारतीय संविधानाने केलेले हे सर्वात मोठे पाप आहे. जे क्षमा करण्याच्या पात्रतेचे नाही.” संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना त्याचे पुनर्मुल्यांकन करणे खरच आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जगभरातील मिडिया आणि पत्रकार यांना साम्यवादी विचारसरणीने किती ग्रासले आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लॉसअंजेल्स आणि कॅलिफोर्निया मध्ये पेटलेली दंगल आणि त्याचे जवळ जवळ प्रत्येक मिडिया हाऊस आणि वृत्तपत्राने केलेलं वर्णन“ 'ट्रंप यांच्या, स्थलांतरितांवर अन्याय करणाऱ्या धोरणांविरुद्ध उठलेली ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे' या आशयाच्या बातम्या दिल्या आहेत. तसेच या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी नॅशनल गार्ड्सना पाठवून ट्रंप यांनी कॅलिफोर्निया राज्याच्या हक्कांवर गदा आणणारी त्यांची हुकूमशाही वृत्ती दाखवली आहे, असेही प्रतिपादन केले आहे. हे विश्लेषण अत्यंत वरवरचे आणि उथळ आहे. सत्य काय आहे ? तर अमेरिकेत घुसलेल्या बेकायदेशीर निर्वासितांनी अमेरिकेच्या संस्कृतीला नख लावण्यास सुरुवात केली. आलेली बहुमतांशी मंडळी ही गुन्हेगार , ड्रग्स चा व्यवसाय करणारी आणि बाकीची मंडळी अत्यंत गरीब आहेत जी पोट भरण्यासाठी आलेली आहे. हे लोक अमेरिकेत आल्यावर पडेल त्या हजेरीवर काम करायला तयार होतात. त्यामुळे स्थानिक अमेरिकन नागरिक बेरोजगार रहातो. त्याला आणि निर्वासिताला पोसण्यासाठी अमेरिकन सरकारचा पैसा खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मानवतावाद हा दृष्टीकोन ठेवता देशांच्या सीमा आणि त्यात रहाणार्‍या नागरिकांचे मानवाधिकार हा दृष्टीकोन सुद्धा आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“देव तारी त्याला कोण मारी ?” या म्हणीची अनुभूती अहमदाबाद लंडन फ्लाइटने जाणार्‍या दोन प्रवाशांना आली. भूमि चौहान अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटसाठी निघाल्या होत्या. त्या सुमारे २५० किलोमीटर अंतरावरून कारने येत होत्या. मात्र वाटेत ट्रॅफिकमध्ये अडकल्या आणि त्यामुळे त्या 20 मिनिटं उशिरा विमानतळावर पोहोचल्या.त्यांना विमानतळात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी तिथं खूप वाद घातला, अक्षरशः भांडण केले, पण सी आय एस एफ च्या जवानांनी नियमांचं पालन करत त्यांना आत जाऊ दिलं नाही आणि बाहेरचून परत पाठवलं.आज त्या म्हणतात : "मी फार भाग्यवान आहे की ट्रॅफिकमुळे उशीर झाला आणि त्याहूनही जास्त की मी एवढं झगडूनही सी आय एस एफ वाल्यांनी मला आत जाऊ दिलं नाही. मी विमानतळ व्यवस्थापकाकडेही गेले, पण तरीही मला परवानगी दिली गेली नाही."पण यामुळे त्यांचा जीव वाचला. 242 प्रवाशांपैकी 11 अ सीटवर बसलेले 40 वर्षीय विश्वास कुमार रमेश हे या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले एकमेव प्रवासी आहेत. तुमच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर देव तुम्हाला वाचवतोच वाचवतो, असेच म्हणावे लागेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अहमदाबाद लंडन विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रंगून मध्ये जन्मलेले विजयजी नंतर भारतात आले. कॉलेज काळात त्यांनी विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले. त्यानंतर जनसंघाचे काम करत असताना आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही सहन करावा लागला.पुढं कायद्याचं शिक्षण घेत वकिलीची पदवी मिळवली. पण कोर्टात प्रॅक्टिस करण्याऐवजी त्यांनी प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर शेअर मार्केटचा मार्ग स्वीकारला आणि राजकोट स्टॉक एक्सचेंजचे संचालकही राहिले. संघानेच त्यांना भाजपात पाठवले. त्यांनी राजकोटमहापालिकेत महापौर म्हणूनही कार्य केले आहे. त्या काळात आणि महानगरपालिकेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना राज्यस्तरीय भाजप संघटनेत स्थान मिळालं. नंतर 1998 मध्ये ते गुजरात भाजपचे सरचिटणीस झाले.याशिवाय 2006 ते 2012 या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केलं. आनंदीबेन पटेल यांच्या नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांची कारकीर्द जोरदार परंतु तितकीच वादग्रस्त सुद्धा होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सक्रिय राजकारणात नव्हते. विद्यार्थी परिषद , संघ आणि भाजपा यांच्यासाठी जीवन वेचलेल्या कार्यकर्त्याचा असा अपमृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. विजय रूपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

🔽


 
 
 

コメント


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page