top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 1 day ago
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“द इन्फ्रा मॅन” अशी एक सुंदर उपाधी देवेन्द्रजींना इंग्रजी मीडियाने प्रदान केली आहे. आपल्या मराठीत महाराष्ट्राचे विकास पुरुष!!! पण विकासाच्या वाटेवर चालताना सामाजिक असमतोल दूर करणे हे सुद्धा राज्यकर्त्याचे करतावी असते आणि देवेन्द्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपला सामाजिक समतेचा अनुशेष भरून काढण्याचे काम करत आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक समता क्षेत्रातील पुरस्कार सोहळा अत्यंत देखणा आयोजित केल्याबद्दल त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांचे अभिनंदन केले. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले आहे. या संविधानाच्या माध्यमातूनच देशाची प्रगती होणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 'घरोघरी संविधान' कार्यक्रम राबविण्यात आला असून संविधानाची उद्देशिका आपल्या जीवनामध्ये अंगीकारली, तर देशातील 90% अडचणी दूर करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले. कोंग्रेसी राजवटीत दलितांना आणि वंचितांना विकासाची आणि सामाजिक समतेची स्वप्ने दाखवली गेली परंतु अंत्योदय सिद्धांतावर आधारित विकासगंगा शेवटच्या मनासपर्यंत पोचवण्याचे काम महायुती सरकार करत आहे हे देवेन्द्रजींनी छोट्या छोट्या उदाहरणातून सिद्ध करून दाखवले.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महापालिका म्हणजे भ्रष्टाचारी आणि निष्क्रिय प्रशासन हा समज पिंपरी चिंचवड महापालिकेने खोडून काढला आहे. त्यांनी विकासकामासाठी चक्क स्टॉक एक्स्चेंज मध्ये लिस्टिंग करून हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून पैसे उभे केले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यु करण्यात आले होते. इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात ₹100 कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ₹513 कोटींच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला 5.13 पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून 'एए +' पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, फोर्ट, मुंबई येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हरित कर्ज रोख्यांचे (ग्रीन म्युनिसिपल बाँड) लिस्टिंग संपन्न झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेची देवेन्द्रजींनी मुक्तकंठाने स्तुती केली. कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि सेबीच्या नियमांच्या कसोटीवर उतरणारा असतो. पिंपरी चिंचवड महापालिका या कसोटीला पात्र झाली.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आयएनएस गुलनारचे होणार पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर !!कोंकणला पर्यटकांचा कॅलिफोर्निया बनवण्याच्या योजनांमधील सर्वात कल्पक आणि देशातले पहिलेच पाण्याखालील पर्यटनस्थल महाराष्ट्र शासन विकसित करत आहे. नौदलाचे निवृत्त लढाऊ जहाज आयएनएस गुलदारला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटनस्थळात रूपांतरित केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. नौदलातून सेवानिवृत्त झालेले आयएनएस गुलदार हे जहाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय वाढीला लागेल. गोव्यात जाणारी मुंबई-पुणेकरांची पावले आता कोकणातच थबकणार यात संशय नाही. कोंकण हा गोव्यापेक्षा स्वस्त, स्वच्छ समुद्र किनार्‍यांनी नटलेला, गर्दीपासून मुक्त आणि समुद्राच्या जोडीला अनेक ऐतिहासिक स्मृटी जपणार्‍या स्थळांनी नटला आहे. अश्या पद्धतीच्या कल्पक प्रकल्पांमुळे कोंकणात पर्यटन व्यवसाय चांगलाच विस्तारणार यात संशय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जगाला लोकशाहीबद्दल प्रवचन देणार्‍या अमेरिकेवर काळाने सूड उगवला आहे. गेले चार दिवस लॉस अंजेल्स जळते आहे आणि त्याला कारण आहे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचे घुसखोरांना अपमानास्पद पद्धतीने हाकलण्याचे धोरण. शुक्रवारी ट्रम्प यांच्या हद्दपारी धोरणांतर्गत अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध छापा टाकण्यात आला.या छाप्याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. ही निदर्शने 8 जून 2025 रोजी हिंसक संघर्षात रूपांतरित झाली. दंगेखोरांनी गाड्या पेटवल्या. उच्छाद मांडला. पोलिसांवर हल्ले केले आणि शेवटी अमेरिकन सरकारला लष्कराला पाचारण करण्याची वेळ आली. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन नुसम यांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दहाव्या घटनादुरुस्तीअंतर्गत राज्य सरकारच्या अधिकारावर "अतिक्रमण" केल्याचा आरोप केला आहे. या दंगलीमुळे अमेरिकेत फेडरल संघर्ष पेटला आहे. अर्थात स्वायत्त राज्ये आणि अमेरिकन सरकार यांच्यात उघड संघर्ष सुरू झाला आहे. डोनाल्ड ट्रंप यांची धोरणे योग्य आणि अमेरिकन हिताची असली तरीही त्या धोरणांना मूर्त स्वरूप देताना ते धारण करत असलेली आक्रमक भूमिका अनेक लोकांना दुखावत आहे आणि त्यामुळे इलोन मस्क सारखे त्यांचे सहकारी सुद्धा त्यांना सोडून जात आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“मोदीपर्व हा भारताचा सुवर्णकाळ.” मोदींच्या 11 वर्षांच्या राजवटीवर इतक्या मोजक्या परंतु चपखल शब्दात योगीजींनी भाष्य केले आहे. यापूर्वी इतिहासात आपण गुप्त राजवट हा भारताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखत होतो परंतु नरेंद्र मोदींची राजवट हा आधुनिक काळातील भारताचा सुवर्णकाळ आहे असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे. देशात २०१४ पर्यंत काँग्रेससह अस्थिर सरकारांवर जनतेचा विश्वास उडाला होता. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन झाली होती. भ्रष्टाचार, लांगुलचालन आणि घराणेशाहीपासून मुक्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला विकसित आणि स्वावलंबी बनवून पुढील २५ वर्षांसाठी कृती आराखडा सादर केला आहे. या ११ वर्षांनी देशाला सामाजिक आणि सांस्कृतिक बाजूने तसेच आर्थिक आघाडीवर, सेवा, सुशासन यासह एक नवीन ओळख दिली आहे. गेल्या ११ वर्षात आपण राष्ट्रीय एकता आणि अखंडतेप्रती आपली वचनबद्धता आणि दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता पाहिली आहे. हा ११ वर्षांचा कालावधी अशा वेळी पूर्ण होत आहे जेव्हा संपूर्ण जगाने भारताची सामरिक शक्ती पाहिली आहे. भारताची लष्करी शक्ती आता जगात सर्वोत्तम ठरली आहे. जर कोणी भारतावर युद्ध लादले तर त्याचे उत्तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरने दिले जाईल. आता भारत हा जगात केवळ शांततेचा पुरस्कार करणारा देश नव्हे तर युद्ध लादल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर देणारा देश आहे. सामान्य नागरिकांना विचारलं तर भारताला स्वातंत्र्य 2014 साली मिळाले हेच लोकांचे मत आहे.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page