🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रेताच्या टाळूचे लोणी खाणारी प्रवृत्ती म्हणून आपण मांजरावर टीका करतो परंतु त्याला सुद्धा लाजवेल असे प्रकरण उघडकीला आले आहे. राजा रघुवंशी नामक तरुणाची हनिमूनला गेल्यावर पत्नीनेच हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर ती चर्चा सुरू आहेच. पण माझ्या निदर्शनास आलेला प्रकार म्हणजे राजा रघुवंशीच्या बेपत्ता होण्याचा विषय सोशल मीडियावर रंगला तसे अनेकांनी इंस्टा,फेसबुकवर या कुटूंबाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात या राजाची धाकटी बहीण श्रास्ती रघुवंशी हिच्या इंस्टा अकाऊंटला भेट देणाऱ्यांचा देखील ओघ वाढला. या अकाउंटवरून सुरवातीला तिने भाऊ बेपत्ता झाल्याच्या रिल्स टाकल्या व लोक प्रतीसाद देत आहेत हे बघताच श्रास्ती रघुवंशीने एका वाहनाची व मसाज पार्लरची जाहिरात झळकवून पैसे कमावल्याचे दिसून येत आहे. मोठया भावाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून राज्य कारभार करणाऱ्या रघुच्या वंशात ही कीड कुठून जन्माला आली ? यावर काय व्यक्त करावे तेच कळेनासे झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“आओ जाओ घर तुम्हारा!” हे धोरण लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ता मिळवून देऊ शकते परंतु त्यातून सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. यंत्रणांवर अत्यंत ताण येतो , कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. लॉस एंजलिस पेटले आहे. लॉस एंजलिस गव्हर्नरची पॉलिसी आहे की कुणीही स्थलांतरित येऊ द्या, त्यांना शरण मिळणार. कुणी कसलाही विरोध करणार नाही. त्यामुळे मेक्सिकन, क्यूबन, अरब,इराणी,पॅलेस्टिनी घुसखोर येथे सुखेनैव जगतात. आता ते आणि स्थानिक पोलिस अमेरिकेच्या फेडरल स्ट्रक्चर वर हल्ला करत आहेत. कॅलिफोर्निया मध्ये आवाज उठत आहे की त्यांना अमेरिकेपासून वेगळे व्हायचे आहे. काउन्सिल फॉर ह्युमन इण्डेजीनियस राइट्स ही तिथली एक संस्था आहे.ही दंगलीला रसद पुरवत आहे. त्यांना गव्हर्नर,स्थानिक पोलिस मदत करत आहेत. येथील वाहतूक व्यवस्था,ड्रायव्हर आदी इराणी लोकांनी भरून गेली आहेत. हाच खेळ बांगलादेशी घुसवत ममता बॅनर्जी खेळते, हाच खेळ केजरीवाल दिल्लीत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसवून करतो. याचा परिणाम पण समान असतो. बाहेरील कोणी पैसे ओतले की हे घुसखोर मंडळी आपल्याला पोसणार्या शहराला आणि राज्याला जाळायला निघतात. दिल्ली दंगल , मुर्शिदाबाद दंगल आणि लॉस एंजलिस या तिन्ही घटनांना जोडणारा हा समान धागा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इस्लाम मधील सर्वात घातक अशी कुप्रथा म्हणजे नात्याअंतर्गत होणारे विवाह. इस्लामचा उदय अरबस्तानात झाला तिथे संघर्षपूर्ण परिस्थिती होती त्यामुळे त्यावेळी जवळच्या नात्यात विवाह करणे हे वंश टिकवण्यासाठी आवश्यक होते. परंतु आता इस्लाम जगभर पसरला आहे अश्या परिस्थितीत नात्यात विवाह करणे ही घातक परंपरा आहे. वंशशास्त्रज्ञ या समस्येकडे गांभीर्याने बघतात. अश्या विवाहातून विकृत संतती , मनोरुग्ण संतती किंवा अपंग संतती जन्माला येऊ शकते. त्यामुळे इस्लाममध्ये आता नात्याअंतर्गत विवाह करू नका अशी मागणी होते आहे. साना युसुफ ही पाकिस्तानातील टिक टॉक स्टार मुलगी. तिचे 10 लाख पेक्षा अधिक फोलोवर्स आहेत. ती प्रसिद्ध गाण्यांना लिप सिंग करून आपले व्हिडिओ टाकत असते. तिच्या नात्यातील एका तरुणाने तिला विवाह प्रस्ताव दिला. तिने नात्याअंतर्गत विवाहाचे दुष्परिणाम सांगून त्याला नकार दिला आणि त्याने तिला गोळ्या घालून तिचा जीव घेतला आहे. या निमित्ताने इस्लाम मधील या कालबाह्य परंपरेवर पाकिस्तानात मंथन सुरू झाले आहे. भारतातील मुस्लिमांनी सुद्धा या मुद्दयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखात राहुल गांधीला नंगा करून आंघोळ घातली आहे. राहुल गांधी यांचा आरोप होता की महाराष्ट्रात निवडणूक निकाल ‘मॅच फिक्सिंग’सारखा होता, सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक यंत्रणा यांनी संगनमताने निर्णय लादला. देवेंद्र फडणवीस यांनी राहुलची लक्तरे काढली, “हा आरोप म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर थेट झटका आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितलं सगळी प्रक्रिया संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत, सर्व पक्षांच्या उपस्थितीत आणि प्रेक्षकांच्या देखरेखीखाली पार पडली. सर्व मतमोजणी केंद्रांवर काँग्रेसचेच प्रतिनिधी होते. मग नेमकं काय ‘फिक्स’ झालं, याचं उत्तर तुम्हीच द्या ! आयोगानुसार, शेवटच्या दोन तासांत सरासरी 1 कोटी 16 लाखांहून अधिक मतदान अपेक्षित होतं, आणि त्यात 65 लाख मतदान झालं म्हणजे उलट सामान्यपेक्षा कमी मतदान झालं. तुमच्या टीमने आकडे तपासले असते, तर हा हास्यास्पद आरोप झाला नसता. मतदानाचे आकडे, टप्प्याटप्प्याने, वेळोवेळी अधिकृत वेबसाईटवर आणि मीडिया बुलेटिनद्वारे प्रसिद्ध केले गेले. कोणत्याही एका पक्षासाठी आकडे बदलणे शक्यच नाही, कारण मतमोजणी केंद्रांवर सर्व पक्षांचे प्रतिनिधी बसलेले असतात. हा आरोप म्हणजे निव्वळ ‘मायक्रोफोनवरून माजवलेली गोंधळाची खेळी’ होती.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महायुतीने त्यातही भाजपाने आपली असेल नसेल तितकी पुण्याई खर्च करून राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन घडवणे आवश्यक आहे. त्यांचे मनोमिलन भाजपाला स्वप्नवत यश प्राप्त करून देऊ शकते. आजवर महाविकास आघाडी , महायुती आणि मनसे हे तिघे वेगवेगळे लढत असत आणि अश्या प्रत्येक निवडणुकीत मनसे वोट कटूआ पार्टी म्हणून काम करायची. विधानसभा 2024ला महायुतीच्या कमीत कमी 10 उमेदवारांचा खेळ मनसेने खराब केला होता. त्यामुळे हे दोघे एकत्र आले तर इतके दिवस ठाकरे मते विभाजित होत होती ती एकत्र येतील. ते महाविकास आघाडीचा भाग म्हणून लढले तर सरळ लढत होईल आणि महायुतीला लाभ होईल. समजा हे दोघे एक वेगळी आघाडी करून लढले तर ठाकरे मते एकीकडे , दुसरीकडे सेक्युलर मते. यात महायुतीला सरळ लाभ होऊन त्यांना प्रचंड यश मिळेल. त्यामुळे हे एकत्र आले तर सर्वात जास्त फायदा महायुतीचा आहे. याचा महायुतीने खास करून भाजपाने गांभीर्याने विचार करावा.
🔽





Comments