🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचे नेतृत्व मोडीत काढले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून आपली पोळी भाजण्यात या दोघा इतका तरबेज कोणी नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात या दोघात कमालीचे एकमत आहे. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात या दोघांनी अनेक वर्षे झुंज लावली आणि आपला कार्यभाग साधून घेतला. दोघे वेगवेगळ्या आघाडीत राहून एकमेकांना पूरक कारस्थान रचत असतात. ऊस आंदोलनात हिंसाचार घडवून आपापला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा आराखडा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत दोघांनीही आखला होता. त्यांच्या या उचापतींना कंटाळून शेतकरी ,कारखानदार आणि शासन कर्ते या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन यांना संपवले आणि शेवटचा खिळा देवा भाऊंनी ठोकला आहे. या दोन्ही कारस्थानी व्यक्तींचे राजकीय खच्चीकरण झाल्याने या विभागातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
केंद्रीय पुरातत्व खात्याची सापत्न वागणूक अत्यंत संतापजनक आहे. सध्या दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी पुरातत्व खात्यावर अत्यंत नाराज आहेत. केंद्रीय पुरातत्व खाते म्हणजे ओसाड गावची जहागीर आहे. हे लोक स्वतः काहीही काम करत नाहीत. पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची पद्धत असते या पद्धतीचा वापर एकाही किल्ल्यावर होताना आजवर पाहिले नाही. या उलट राजस्थानात जिथे किल्ले अजूनही राजांच्या ताब्यात आहेत त्यांनी सुंदर राखले आहेत, त्यांना हॉटेल्स मध्ये रूपांतरित केले आहे आणि किल्ल्याचे संरक्षण , संवर्धन आणि पर्यटनाच्या माध्यमातून निधी प्राप्ती सगळेच साधले जात आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील बुजलेली पाण्याची टाकी सुद्धा शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी श्रमदान करून साफ करतात. पुरातत्व खाते डोळ्यावर कातडी ओढून बसलेले असते. यांना किल्ल्यांवर होणारे दर्गा कबर चे अतिक्रमण दिसत नाही. शेकड्यांनी मुसलमान किल्ले गिळंकृत करत आहेत ते कधी दिसत नाही. पण रायगडावर सात पिढ्या रहाणारी धनगर कुटुंबे यांच्या डोळ्यात बरोब्बर सलतात. आता या धनगर कुटुंबांना नोटिसा बजावल्या जात आहेत. पुरातत्व खाते मलंगगड किंवा विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करत नाही पण गरीब धनगरांना मात्र छळते . पुरातत्व खात्याचा तीव्र निषेध.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
उद्धव ठाकरे यांचे अहंकारी राजकारण हे आत्मघातकी सुद्धा सिद्ध होत आहे तरीही त्यांना याचा बोधच होत नाही. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघाची निवडणूक भलतीच गाजली होती. महाविकास आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती. अशातच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर करून टाकला होता. ज्या उमेदवारासाठी ठाकरे सेनेने एवढा आडमुठेपणा केलेला तोच उमेदवार आता ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत चालला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांनी याची घोषणा केली आहे की ते आता शिंदे सेनेचे सैनिक आहेत. याला स्वतःच्या हाताने स्वतःची बेअब्रू करून घेणे असे म्हणतात. कोंग्रेसला त्यावेळी संजय राऊत यांनी ज्या भाषेत लाथाडले होते ते कोंग्रेसी विसरलेले नाहीत आता या सगळ्या ऊचापतींचे उट्टे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निघणार यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जिथं पिकतं तिथं विकत नाही हेच खरं !!! आज भारताला मोदींसारखा पंतप्रधान लाभला पण विरोधकांना आणि गुलामांना त्याचे कौतुक नाही. जागतिक क्रमवारीत मोदी ७६ गुणांसह सर्वात लोकप्रिय नेतृत्व ठरलं आहे. तर ५२ टक्के गुण मिळवून ट्रम्प तात्या कसाबसा मध्यात त्रिशंकू अवस्थेत लोंबकाळतो आहे.चायना, रशिया, जपान, या देशांचे पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष पहिल्या १० मध्येसुद्धा नाहीत. विरोधकांनी मोदींचे पाय ओढले नाहीत तर देश फार वेगाने प्रगती करेल. परंतु देशातील विरोधकांना देशाची प्रगती आणि जनतेचे कल्याण यात अजिबात रस नाही. गांधी, पवार, ठाकरे, मुलायमसिंग, लालू अशी देशातली असंख्य मंडळी केवळ त्यांच्या कुटुंबासाठी आणि व्यक्तिगत कल्याणासाठी राजकारणात आहेत. मोदी सत्तेत आले आणि जागतिक आश्चर्य ठरावे असा जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वे ब्रीज देशाला लाभला. बारामुल्ला ते जम्मू या साधारण ३२७ किलोमीटरच्या अंतरात ५५ बोगदे आणि डोंगरकड्यांना जोडणारे ५ ब्रीज आहेत. मोदी पंतप्रधान झाले आणि देशात विकासाचे वारे वाहू लागले. भाजप सत्तेत आली नसती आणि देशाला मोदींसारखा विकासाची दृष्टी असलेला पंतप्रधान लाभला नसता तर आज दिसणारा विकास आणखी शंभर वर्ष देखील दिसला नसता.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
'मोदीनॉमिक्स' नावाची अभिनव आर्थिक नीती देशातील गरीबी कायमची संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे जागतिक बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. चहावाला पंतप्रधान असताना भारतातील 'अत्यंत गरिब' लोकांची संख्या आता 5.3% आहे, जी अर्थतज्ञ पंतप्रधान असताना 27.1% होती. या एक दशकात जवळपास 269 दशलक्ष (26.9 कोटी) भारतीयांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आले आहे. ग्रामीण भारतात हे परिवर्तन विशेषतः ठळकपणे दिसत आहे. जनधन योजना, उज्ज्वला, प्रधानमंत्री आवास योजना, गरीब कल्याण योजना, डिजिटल इंडिया, बँकिंग नेटवर्क चा भाग बनविणे यांसारख्या गोष्टींमुळे नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडल्याचा हा ठोस पुरावा आहे. जेव्हा जग कोविड, महागाई आणि आंतरराष्ट्रीय तणावांमध्ये अडकलं होतं, तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक सुधारणांवर फोकस करत 'गरिबी' विरुद्ध पंतप्रधान मोदींनी निर्णायक फ्रंट उघडला होता. बंदुकांनी नव्हे तर दृष्टीकोन, इच्छाशक्ती, नियोजनबद्ध कारभार आणि 80 कोटी लोकांची बेसिक अन्न-धान्याची काळजी मिटवायची संवेदनशीलता दाखवत त्यांनी हे युद्ध जिंकून दाखवले आहे.आणि हो, 'मोदीनॉमिक्स' गरिबीवर निर्णायक विजय मिळविण्याचा जवळ आहे हे कोणी मोदी-भक्त नव्हे, तर आज वर्ल्ड बँकेसारखी संस्थाच त्याची साक्ष देत आहे!
🔽
#FarmPolitics #HeritageNeglect #PoliticalDrama #ModiLeadership #ModinomicsSuccess #DevendraFadnavis #UddhavThackeray #AbhijeetRane





Comments