top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jun 5
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बंगळुरूत कन्नड बोलता येत नाही म्हणून एका बँक मॅनेजरला मारहाण झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने आयपीएल जिंकली त्या संघाकडे बघा. मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर भाषा इंग्रजी, कर्णधार रजत पाटीदार मध्यप्रदेश, मुख्य खेळाडू विराट कोहली दिल्ली , मुख्य फलंदाज जितेश शर्मा महाराष्ट्र, सातत्य राखणारा गोलंदाज यश दयाल उत्तर प्रदेश या सगळ्यांची भाषा हिंदी, मुख्य अष्टपैलू कुणाल पंड्या गुजरात, भाषा गुजराती, संघातील इतर खेळाडू फिल सॉल्ट , मयांक अगरवाल , लिअम लिविंगस्टन , रोमॅरिओ शेफर्ड , भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड यातल्या किती खेळाडूंना कन्नड किंवा तुल्लू येते ? एकालाही नाही .अर्थात आपण रोजच्या व्यवहारात जिथे सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रांतीय भाषेकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि तिथे देत नाही आणि क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळताना आपल्यातली सांघिक भावना प्राधान्याने जपतो तिथे भाषा आडवी येत नाही. जर आपण भाषेचा माज बाजूला ठेवून मिळणाऱ्या सुविधा किंवा सेवांकडे लक्ष दिले तर भारत नक्कीच एक महासत्ता बनणार यात कोणतीही शंका नाही. ऑक्टोबर मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत याच भाषिक मुद्द्यांवरून वातावरण पेटणार आहे आणि त्यात बळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक सौहार्दाचा जाणार आहे म्हणून हा सावधानतेचा इशारा.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

चहावाल्या पंतप्रधानाचे अर्थशास्त्र हे अर्थतज्ञ मनमोहनसिंग पेक्षा अधिक मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१७ साली सुरू झालेल्या जीएसटी प्रणालीचा परिणाम म्हणून २०२० साली जमा होत असलेले मासिक ३०-४० हजार कोटी रुपयांचे आकडे आकर्षक वाटायचे, हे ह्या मेमरीत दिसते आहे. पण मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल, ह्या इनिशिएटिव्ह्जचा परिणाम इतका प्रचंड होता, की केवळ ५ वर्षांत भारताने एप्रिल २०२० महिन्याच्या ४३ हजार कोटी रुपयांवरून, एप्रिल २०२५ महिन्याच्या २ लाख ३७ हजार कोटी रुपयांवर, म्हणजेच ५००+% उडी मारली आहे! इन्फ्रास्ट्रक्चर ते संरक्षण सिद्धता, शेती ते शिक्षण, कुठल्याच प्रोजेक्टसाठी पैसे कमी पडत नसण्याचे हे एक मोठे कारण आहे! राष्ट्र सर्वप्रथम हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ११ वर्षे अथक काम करणारा पंतप्रधान असल्यावर काय जादू घडू शकते, ह्याचे भारतीय अर्थव्यवस्था हे एक आदर्श उदाहरण ठरेल!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्‍या उद्धव ठाकरेंचा निष्क्रिय कारभार महाराष्ट्राला किती मोठ्या संकटात घेऊन गेला , एक धक्कादायक सत्य ! जिहादी प्रवृत्तींचे पडघा प्रमाणेच बोरिवलीला वेगळा देश घोषित करायचे धाडस उद्धव ठाकरे या निष्क्रिय मुख्यमंत्र्‍यामुळे झाले आहे. अंतर्गत सुरक्षेकडे उद्धव यांचे अक्षम्य दुर्लक्ष. भिवंडी परिसरातील बोरिवली गावात 2019 मध्ये काही संशयित व्यक्ती स्थायिक झाल्या. त्यांनी बनावट कागदपत्रे, ओळखी लपवण्याचे मार्ग आणि स्थानिकांमध्ये मिसळून स्लीपर सेल उभा करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. कोयना परिसरात स्फोटाची चाचणी सुद्धा घेण्यात आली. हे सर्व एन आय ए ला कळलं, त्यांनी पुण्यात कोंढवा परिसरात धाड टाकून डझनभर आतंकवाद्याना जेरबंद केलं. हेच काम करण्यास महाराष्ट्र ए टी एस ला सक्त मनाई करण्यात आली होती. मुस्लिम बहुल परिसरात कॉम्बिन्ग ऑपरेशन करण्यास मनाई करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणजे बोरिवली परिसरात आयसीस व इतर आतंकवादी ऍक्टिव्हिटी वाढली. त्यांनी स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्यावर काल छापा टाकून संबंधित मंडळी अटक झाली. पण या किडीला आपल्या निष्क्रिय वर्तनातून संरक्षण देणारे उद्धव हेच खरे दोषी आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इतकी वर्षे आपण पाकिस्तानला आपला शत्रू मानून चालत होतो, अगदी जास्तच पुढे गेलो तर चीनला शत्रू मानत होतो.. पण कधी अमेरिका पण आपला शत्रू आहे हे ऑपरेशन सिंदूर ने सिद्ध केले. ट्रम्प गेल्या 10-12 दिवसापासून फ्रस्ट्रेट झालेल्या माणसा- सारखा मी सिजफायर करायला लावले हे बरळून राहिला आहे, यावर सरकार तर्फे एकच समर्पक उत्तर दिले आहे, ऑपरेशन सिंदूर स्थगित केले आहे, संपलेले नाही, आणि यापुढे एक जरी आतंकी हल्ला झाला तर ते युद्ध आहे असे मानले जाईल.हा खतरनाक इशारा अतिरेकी किंवा पाकिस्तानला नसून हा इशारा चीन आणि अमेरिकेला आहे.. भारताने यापूर्वीच पाकिस्तानची आय एस आय अतिरेकी कारवाया करण्यात समाविष्ट आहे हे जगापुढे दाखवून दिले आहे. आता यापुढे हल्ला झाला तर कुणाचीच गय केली जाणार नाही ही सरळ सरळ धमकी आहे.चोरून लपून पाकिस्तानची मदत करणार्‍या अमेरिकेला हा गर्भित इशारा आहे म्हणूनच ट्रम्प बावचळल्यासारखा रोज उठून सुटून नॉटी संज्याप्रमाणे मी सिजफायर केले म्हणून सांगत आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षा यंत्रणेमुळे बळी गेले का ? 18 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चलेंजर्स बंगलोर संघाने आयपीएल चषक जिंकला पण या विजयाला चेंगाराचेंगरी आणि 11 नागरिकांच्या मृत्युचे गालबोट लागले आहे. गर्दीचे व्यवस्थापन करणे हे खूप कौशल्याचे काम असते आणि अश्या ठिकाणी राजकीय नेते जाऊन परिस्थिती अधिक बिघडवतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. काल बंगलोर मध्ये पण हेच घडले. 18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते. पोलिसांना एक लाख लोक येतील असा अंदाज होता, पण ही संख्या दोन ते तीन लाख इतकी वाढली. मुख्यमंत्री येणार म्हणून सुरक्षेस्तव स्टेडीयम मध्ये प्रवेश करणारे काही गेट बंद केले गेले आणि मोठ्या संख्येने लोक एका लहान गेटला ढकलून तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेला मुख्यमंत्री सिद्धरामया जबाबदार आहेत परंतु आपली चूक मान्य करण्याऐवजी ते यातही राजकारण करताना दिसत आहेत हे लज्जास्पद आहे. पैसे देऊन मेलेल्यांना परत आणता येत नसते. मुख्यमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागणे आवश्यक आहे.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page