top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Apr 20
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा. राज्यपालांनी आपला प्रासाद सोडून जावे तिथे शिवस्मारक बनवले जावे. सगळ्यांनी त्याग करावा . सगळ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मी घराच्या बाहेर पडणार नाही. मातोश्री एक उभी केली. मातोश्री दोन सगळे एफ एस आय नियम पायदळी तुडवून बनवली आणि नियमित करून घेतली. महापौरांचा बंगला हडप करून तिथे वडिलांचे स्मारक सरकारी खर्चाने बनते आहे. मी मुख्यमंत्री पद स्वतःकडेच ठेवणार, पक्षाध्यक्ष पद स्वतःकडेच ठेवणार आणि माझ्या माजघरात बसून जगाला अक्कल शिकवणार आणि त्याग करण्याचे धडे देणार. आज आचार्य अत्रे जिवंत असते तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून निश्चितच म्हणाले असते,” गेल्या 10,000 वर्षात असा कुपुत्र जन्माला आला नाही.” आपल्या बापाचे नाव, कर्तुत्व सगळे काही मातीमोल करणारे लोक विरळ असतात, उद्धव ठाकरे विरळ मधील विरळ व्यक्तिमत्व आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रात आता पहिलीपासून मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर आता हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक धोरणावरून राज ठाकरे भडकलेत. हिंदू आहोत हिंदी नाही संघर्ष अटळ असल्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली. मी स्वच्छ शब्दांमध्ये सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही’ थोडक्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा वाल्यांनी मराठी अस्मितावाल्या माकडांच्या हातात कोलीत दिले आहे आता संपूर्ण महापालिका निवडणूक कोण खरा मराठीचा तारणहार या मुद्द्यावर लढवली जाणार आणि उत्तर भारतीय मतांच्या जोरावर भाजपा किल्ला काबिज करणार. मराठी अस्मितेच्या शिळ्या कधीला अजून किती वेळा ऊत आणला जाणार आहे हाच खरा प्रश्न आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्राच्या राजकरणात एकतरी कणखर स्त्री आहे याचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेधा कुलकर्णी या कोथरूड मतदारसंघातील एक लोकप्रिय उमेदवार आणि आमदार. चंद्रकांत दादांसाठी त्यांना घरी बसवले गेले होते आणि नंतर त्या पाच वर्षे विजनवासात होत्या. परंतु त्यांना भाजपाने राज्यसभेत खासदारकी दिली आणि परत एकदा त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसद गाजवली. वक्फ सुधारणा विधेयकावर त्यांचे भाषण अप्रतिम झाले. दीनानाथ मंगेशकर प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्या वडिलांचा दवाखाना भाजपा महिला नेत्यांनी फोडला त्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्या पुण्येश्वर मंदिरात आरतीला गेल्या होत्या आणि बाजूच्या मशिदीत मोठ्या आवाजात अजान सूरु होती त्यामुळे त्यांनी मशिदीत जाऊन तिथल्या संबंधितांना रागावले. लगेच मुस्लिम तुष्टीकरण वाल्यांनी गदारोळ सुरू केला असून त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. परंतु मेधाताई अचल आहेत. महाराष्ट्र भाजपाला अश्याच आक्रमक आणि हिंदुत्ववादी नेत्यांची गरज आहे. मेधाताईंचे हार्दिक अभिनंदन.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अजित दादांच्या जोडीला भाजपाने जो कचरा आयात केला आहे त्यामुळे भाजपा समर्थक संतापले आहेत. संभाजी भिडे गुरुजींच्या बद्दल प्रत्येक हिंदुत्ववाद्याला प्रचंड आदर आहे. भिडे गुरुजींना एक कुत्रा चावला त्या मुद्द्यावर अमोल मिटकरी नावच्या कचरा आमदाराने स्वतःची नसलेली अक्कल पाजळल्याने हिंदुत्ववादी संतापले आहेत. त्यांना चावलेला कुत्रा हा वाघ्या तर नव्हता ना? असा खोचक सवाल मिटकरींनी केलाय. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, असं देखील मिटकरी यांनी म्हंटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. भिडे गुरुजींच्या बद्दल बोलण्याची मिटकरी यांची लायकी नाही, तरीही त्यांनी गरज नसताना हे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. भाजपावाल्यांनी या कुत्र्याची नसबंदी केली नाही तर हिंदुत्ववादी मंडळी भाजपावरच चिडणार हे सत्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून रोज एक धक्कादायक निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या निर्णयांनी संपूर्ण जग अक्षरशः हादरून जात आहे. काल त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीची जागतिक पातळीवरील नोटबंदी घोषित केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. अमेरिकन डॉलर हे चलन गेली 70-75 वर्षे सातत्याने वर्धिष्णूच राहिले आहे. त्यामुळे जगभरातील लब्ध श्रीमंत, भ्रष्ट नेते , माफिया ही सगळी मंडळी डॉलर्स या चलनी नोटांचा आपल्याकडे साठा करतात. त्याचे मूल्य कायमच वाढत असते आणि त्यामुळे ज्यावेळी ते हे डॉलर्स खर्च करतील किंवा अन्य चलनाशी त्याची देवाण घेवाण होईल त्यावेळी डॉलर्स साठवणार्‍या व्यक्तीला होणारा फायदा हा प्रचंड असतो. हे सोने खरेदी करणे , साठवणे आणि नंतर विकणे या प्रमाणेच केले जाते. जगभर अब्जावधी अमेरिकन डॉलर्स तिजोर्‍यांमध्ये पडले आहेत आता अमेरिकन सरकारने नवीन फतवा काढला आहे तुमच्याकडील डॉलर्स खर्च करून टाका. त्यांचा स्त्रोत द्या अन्यथा आम्ही जुन्या डॉलर्सना काही काळाने अवैध घोषित करू आणि ही समस्त रक्कम कागदाचे कपटे होऊन जाईल. या नोटबंदी 2 मुळे संपूर्ण जागतिक बाजार हादरला आहे यात जगभरातील उद्योगपती, माफिया , जगभरातील भ्रष्ट राजकीय नेते समाविष्ट आहेत. ट्रंप यांच्या या घोषणेमुळे सोने अधिकच महागणार , डॉलरचे सुद्धा मूल्य प्रचंड वाढेल.

🔽







 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page