🖋 अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Apr 2
- 3 min read
🖋 अभिजीत राणे लिहितात
संदीप देशपांडे यांचे भाजपाने आभार मानले पाहिजेत. त्यांना राज ठाकरे यांनी मोठे पद दिले आहे आणि त्यांनी तत्काळ त्याचे पांग फेडले. विधानसभा 2024 मध्ये बांद्र्यात आशीष शेलार यांना मनसेने पडद्यामागून पाठिंबा देणे आणि त्या बदल्यात अमित ठाकरे यांना भाजपाने पडद्याआडून पाठिंबा देणे असा करार होता. परंतु अमित ठाकरे पराभूत झाले आणि याचे शल्य संदीप देशपांडे यांनी कवितेद्वारे प्रकट केले. ही कविता पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांच्या समोर वाचून संदीप देशपांडे यांनी भाजपा आणि मनसे यांच्या पडद्यामागील आणि पडद्यासमोरील संभाव्य युतीची शक्यता संपवून टाकली आहे. आता भाजपावाले गांभीर्याने लढतील ही चांगली गोष्ट आहे. आशीष शेलार यांचा उल्लेख आशीष झोलार करून मनसेने भाजपशी असणारे नाते अधिकृत रित्या संपुष्टात आणले असून यापुढील प्रत्येक निवडणुकीत मनसे एकला चालो रे या भूमिकेत असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मनसे आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी ही निश्चित चांगली बातमी आहे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋 अभिजीत राणे लिहितात
महायुतीमधील सुप्त संघर्ष आणि धुसफूस आता पूर्णपणे थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागचे सरकार सत्तारूढ असताना सर्व फायली या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जात असत. देवेंद्रजी फडणवीस यांनी आता एक आदेश काढून तीच कार्यप्रणाली अंगिकारण्यास संगितले आहे. अर्थात आता प्रत्येक खात्याची फाइल ही आधी अजित दादा पवार , त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन शेवटी सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाईल. यामुळे अजित दादा पवारांना वेसण बसणार असून शिंदे यांचे सरकारमधील वजन वाढले आहे. आता शिंदे यांची नाराजी कायमची संपुष्टात येऊन राज्याच्या राजकारणातील पतंगबाजी पुढील पाच वर्षांसाठी तरी थांबेल अशी आशा आहे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋 अभिजीत राणे लिहितात
एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या शहरातील रस्त्यांवर लवकरच ई बाइक टॅक्सी धावणार आहे. गोव्यात ज्या प्रमाणे दुचाकी टॅक्सी सेवा असते त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ही सेवा सुरू होणार असून यात विजेवर चालणारी , पिवळ्या रंगाची दुचाकी असेल. चालक प्रशिक्षित असून त्याची सेवा अप्प द्वारे प्राप्त करता येईल. महिलांच्या सुरक्षेचा विचार करून चालक आणि प्रवासी यांच्या मध्ये पार्टिशन असणार आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून सार्वजनिक वाहातूक व्यवस्थेवरील दडपण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा जेष्ठ नागरिक , महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. अर्थात या संदर्भातील सुरक्षा नियम कठोर असावे आणि चारित्र्य व नागरिकत्व पडताळणीशिवाय एकही चालक नेमला जाऊ नये याची हमी संबंधित कंपनीने घेणे आवश्यक आहे.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋 अभिजीत राणे लिहितात
“स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहायचे वाकून” ही म्हण संजय राऊत यांना चपखलपणाने लागू पडते. भाजपचा केंद्रीय अध्यक्षा अजून निवडला गेला नाही. संघ आणि मोदी यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. महाराष्ट्राचा नेताच भविष्यात पंतप्रधान होणार आहे. या आणि अश्या अनेक वावड्या उठवून त्यावर बडबड करत बसणे हा संजय राऊत यांचा आवडता छंद आहे. मीडियावले सुद्धा त्यांना डोक्यावर घेऊन बातम्या छापतात त्यामुळे ते अधिकच चेकाळतात. परंतु भाजपातील राजकारण बघण्यात आपला वेळ वाया न घालवता संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या आत डोकावून पाहीले तर बरे होईल. विधानसभेला एक लाख मते घेणारा त्यांच्या छत्रपती संभाजीनगर मधील त्यांचा उमेदवार राजू पाटील पक्षाला जय महाराष्ट्र करून जातो आहे , जाताना तो चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप करून गेला आहे. त्यामुळे राऊत यांनी इतर पक्षांची उणिदुणी काढण्यात वेळ वाया न घालवता आपल्या पक्षाचा कोसळणारा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न करणे अधिक इष्ट असेल.
www.abhijeetrane.in
www.mumbaimitra.com
🔽
🖋 अभिजीत राणे लिहितात
वक्फ कायदा सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे त्यावर चर्चा आणि नंतर मतदान घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या स्वभावाच्या विपरीत जाऊन देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे. टोमणा मारण्याचे घाऊक कंत्राट असलेल्या उधोजींना टोमणा मारत देवेन्द्रजींनी हैराण केले आहे. वक्फ बोर्ड कायद्यावर मतदान होत असताना ठाकरे सेना बाळासाहेबांच्या विचारांची परंपरा ध्यानात घेऊन या कायद्यातील सुधारणांना समर्थन करणार का सध्याच्या नवीन राजकीय नात्याशी एकनिष्ठ राहून या कायद्याला विरोध करणार ? असा सवाल देवेन्द्रजींनी विचारलं आहे. ठाकरे आणि हिंदुत्व या चर्चेला कायमचा पूर्णविराम देणारी घटना या कायद्याच्या निमित्ताने घडणे शक्य आहे आणि ते म्हणजे कोंग्रेसच्या मागे फरफटत जात ठाकरे सेना वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करेल.
www.abhijeetrane.in





Comments