अभिजीत राणे लिहितात
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे धक्कातंत्र अप्रतिम आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांनी रेखा गुप्ता या एका अत्यंत अनपेक्षित नावाच्या गळ्यात टाकली आहे. रेखा गुप्ता यांची ओळख म्हणजे त्यांनी भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर अत्यंत खालच्या पदापासून काम करायला सुरुवात केली आहे. निष्कलंक चारित्र्य आणि आक्रमक हिंदुत्व जपणाऱ्या नेत्या अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या बद्दलची फारशी माहिती नसणारी गोष्ट म्हणजे त्या स्वर्गवासी अरुण जेटली यांच्या शिष्या आणि एक उत्तम वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गेली दहा वर्षे सातत्याने लढणारा, दिल्ली भाजपातील एक चेहरा म्हणजे रेखा गुप्ता. त्यांना मुख्यमंत्रीपद देत भाजपाने अरविंद केजरीवाल यांना मोठा दणका दिला आहे. कारण रेखा गुप्ता यांच्या कारकिर्दीत अरविंद केजरीवाल यांच्या सगळ्या पापांचा हिशोब होऊन आम आदमी पार्टीचं पार वस्त्रहरण होणार आहे. अरविंद केजरीवाल यांचे तुरुंगात जाणे आता पक्के झाले आहे. एकंदर घुंगरू शेठ उर्फ अरविंद केजरीवाल यांचे अच्छे दिन खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहेत.
अभिजीत राणे लिहितात
मुंबई आणि गुजरात दंगली नंतर अनेक सामान्य मुस्लिमांनी पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी भागात आपले बस्तान बसवले. या लोकांचा मुख्य व्यवसाय भंगारचा होता. सर्व प्रकारच्या भंगारचे व्यावसायिक या भागात जमा होत गेले. त्या जोडीला इतरही व्यवसाय त्यांनी सुरू केले. काही ठिकाणी कायदेशीर पद्धतीने जमिनी विकत घेतल्या, काही ठिकाणी भाडेकरार केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी जमीन गिळंकृत केली. अर्थात स्थानिक राजकारणी मंडळींचा आशीर्वाद होताच. कुदळवाडीतील हे व्यवसाय जसे वाढत आणि फोफावत गेले, तसे या भागात राष्ट्रविरोधी शक्तींचा वावर वाढत गेला. बांगलादेशी रोहिंग्या ही सगळी मंडळी बेकायदेशीरपणे इथे येऊन बस्तान मांडू लागली. अगदी यासीन भटकळ सारखा अतिरेकी सुद्धा या भागात येऊन काही काळ राहून गेला आहे. या भागात दहशतवादी शक्ती, दंगल घडवणाऱ्या शक्ती, एकत्र येत आहेत, शस्त्रसाठा जमा करत आहेत हे शासनाच्या लक्षात आल्यावर बेकायदेशीर मालमत्तांवर सरकारी हातोडा पडला आणि सर्व शासकीय जमिनी शासनाने आपल्या ताब्यात परत घेतल्या. उशिरा का होईना परंतु कठोर कारवाई केली म्हणून राज्य शासनाचे आणि आमदार महेश लांडगे यांचं अभिनंदन. जोडीला बांगलादेशी हुडकून हाकलुन दिले असते तर अधिक उत्तम झाले असते. सरकार सकारत्मक काम करत आहे आणि मीडिया नेहमीप्रमाणे नकारात्मक बातम्या देत वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे.
अभिजीत राणे लिहितात
भारताचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे पराकोटीचे ढोंगी , हिंदू द्वेष्टे आणि खोडसाळ व्यक्ती आहेत आणि हे वारंवार सिद्ध होते. वरवर मूर्खपणा वाटणारी कृती करताना वास्तवात ते मेथड इन मॅडनेस या सिद्धांताचा अवलंब करत असतात. हिंदूंना वंदनीय आदरणीय असलेल्या प्रत्येक प्रतिकाला, व्यक्तीला अवमानित करून हिंदूंना खिजवण्यात त्यांना विकृत आनंद मिळतो आणि त्यांच्या या विकृतीला आता कायदेशीर चाप लावण्याची वेळ आलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणे , हिंदू देवी देवतांवर टीका करणे , हिंदूच हिंसा करतात अश्या पद्धतीची वक्तव्ये त्यांनी केली आहेत. काल त्यांनी अजून एक पराक्रम करून दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी हिंदूंना शुभेच्छा देणारे ट्विट करताना त्यांनी जाणीवपूर्वक श्रद्धांजली या शब्दाचा वापर केला श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथी साठी वापरला जातो. तरीही त्यांनी तो जयंती साठी मुद्दामून वापरला आणि त्यामुळे जनमानस संतप्त झाले. राहुल गांधी यांची विकृती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी सावरकरांच्या विरुद्ध जे वक्तव्य केले होते ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमची केंद्र सरकारला विनंती आहे ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे सोपवून त्यात राहुल गांधी हे सिरीयल ऑफेंडर आहेत हे न्यायालयात सिद्ध करून त्यांना तुरुंगात डांबावे. त्याशिवाय त्यांच्या या विकृत वागण्याला वेसण बसणार नाही.
अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यातील समस्त माजी आमदार आणि खासदारांची सुरक्षा कमी करण्याचे त्यांनी ठरवले आहे. माजी आमदार आणि खासदार यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांना नेमावे लागत आहे त्यामुळे राज्य शासनाचा खर्च तर वाढतोच परंतु पोलिसांची संख्या कमी असताना अश्या प्रकारे पोलिसांना गुंतवून ठेवण्याने गुन्हे तपासणीसाठी पोलीस दल कमी पडत आहे असा गृहखात्याचा अहवाल होता. अश्या पद्धतीच्या सुरक्षा व्यवस्थेला माजी आमदार आणि खासदार मंडळींनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवल्याने आजवर राज्य सरकार कारवाई करण्यास धजावत नव्हते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु ज्या माजी आमदार आणि खासदारांच्या जीविताला धोका असल्याचा गुप्तचर खात्याचा अहवाल आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था मात्र कमी केली जाणार नाही. विरोधी पक्ष अर्थातच या निर्णयावर टीका करणार आहेत , स्वपक्षीय सुद्धा निश्चितच नाराज होतील परंतु हा अपरिहार्य असा सकारत्मक निर्णय असल्याने सामान्य नागरिक मात्र आनंदी झाले आहेत.
अभिजीत राणे लिहितात
“सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को.” या म्हणीत थोडासा बदल करून “सौ गालियाँ दे कर छगन बना हिन्दुत्ववादी” अशी म्हणायला हरकत नाही. माळी समाजाचे नेते, ज्योतिबा फुलेंचे कट्टर अनुयायी आणि त्यामुळे अर्थातच पराकोटीचे हिंदू द्वेष्टे , हिंदू देवांचे द्वेष्टे अशी प्रतिमा असलेले छगन भुजबळ आता चक्क हिंदुत्ववादी मुखवटा धारण करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांनी रामाच्या मंदिरात आरती म्हटली आणि भय्याजींनी प्रसन्न होऊन त्यांना राम भक्त ही उपाधी सुद्धा प्रदान केली आहे. भाजप आता सहकारी पक्ष सुद्धा चालवू लागला आहे याचे हे उदाहरण आहे. राज्यात मंत्रीपद न मिळाल्याने नाराज भुजबळांनी अजित दादांशी संपर्क साधण्याचा प्रयास केला, न साधल्याने ते पक्ष सोडून जाणार या चर्चा रंगल्या. पण आमच्या माहितीनुसार छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपचा मानस असल्याने त्यांनीच राज्यात मंत्रीपद देऊ नका अशी अजित दादांना सूचना केली होती. राज्यातील मंत्रीपदाच्या ऐवजी केंद्रातील खासदारपद अशी पदोन्नती भुजबळ यांना मान्य नव्हती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांची मनधरणी करण्यात अपयशी ठरत होता म्हणून भय्याजी जोशी मैदानात आले आणि त्यांनी छगनरावांची समजूत काढली असल्याचे वृत्त आहे. आता लवकरच राज्यसभेत भगवी वस्त्रधारी फुलेंचा अनुयायी दिसणार आहे.
#DelhiCM #RekhaGupta #NarendraModi #AmitShah #ArvindKejriwal #RahulGandhi #chaganbhujbal #hindu #mumbai #gujrat #BJP #DevendraFadnavis #security #dicision #abhijeetrane #AR #BJPGovernment #politics #MaharashtraPolitics
Comments