top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Feb 23
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरत आहे. आमदार रोहित पवार यांनी दावा केला होता की, विलीनीकरण झाल्यास खासदार अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार होते. कोल्हेंनी स्वतः कबूल केले की, १४ गुप्त बैठकींपैकी ११ बैठकींना ते उपस्थित होते. यावरून चर्चा गंभीर होती हे स्पष्ट होते. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाची शक्यता ठामपणे नाकारली आणि प्रक्रियेला ब्रेक लागला. दुसरीकडे, सुनील तटकरे यांनी लेखी प्रस्ताव आल्यास चर्चा होऊ शकते असे संकेत दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील १२ आमदार शरद पवार गटाशी संपर्कात आहेत आणि एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. नेत्यांच्या विरोधामुळे मात्र पेच निर्माण झाला आहे. पुढे खरोखर विलीनीकरण होणार की ही चर्चा फक्त अफवा ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

काँग्रेसचे दिग्गज वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी पुन्हा एकदा चर्चेत आले. पश्चिम बंगालमधील SIR प्रक्रियेवर रोक आणण्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जीच्या वतीने कोर्टात जोरदार दावे केले. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असा सिब्बलचा इशारा होता. पण सर्वोच्च न्यायालयाने हा इशारा दुर्लक्षित करून निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय दिला. आयोगाने सांगितले की ९५ टक्के काम पूर्ण झाले असून २८ फेब्रुवारीला यादी प्रकाशित होईल. न्यायालयाने पोलिसांच्या निष्क्रियतेवरही कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि डीजीपीला वैयक्तिक हलफनामा दाखल करण्याचे आदेश दिले. सिंघवीसह इतर वकिलांनी न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विरोध केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. या प्रकरणाने दाखवून दिले की “माहौल खराब होईल” अशा जुन्या दलीलांना आता न्यायालय फारसे महत्त्व देत नाही.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात

उत्तर प्रदेशातील गरीब कुटुंबातून आलेला रघु फारसा शिकलेला नाही, पण मेहनतीवर त्याचा विश्वास आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत सफाई कामगार म्हणून तो प्रामाणिक कमाईने कुटुंबाचा सांभाळ करतो. AI Impact Summit मध्ये काम करताना त्याने पहिल्यांदा जगभरातून आलेल्या विद्वान, यशस्वी लोकांना जवळून पाहिले. कार्यक्रमातील प्रत्येक गोष्ट त्याला समजली नाही, तरी स्वतःच्या योगदानाचा अभिमान त्याला होता. ज्याप्रमाणे रामसेतु बांधताना छोट्या खारीने सुद्धा आपला वाटा उचलला तसेच आपण खारीचे काम प्रामाणिक पणे करावे हीच त्याची भूमिका होती. कोंग्रेसी मंडळी अर्धनग्न होऊन कार्यक्रमात धिंगाणा घालत आहेत हे अफून त्याने या कार्यकर्त्यांना बादडून काढले. देशविरोधी व मुफ्तखोरांना हेच उत्तर आवश्यक असते. त्याने केवळ आपली ड्यूटीच नाही केली, तर देशभक्तीचे धडेही दिले. संदेश स्पष्ट आहे—रघु व्हा, राहुल नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

प्यू रिसर्च सेंटरच्या Religious Landscape Study मधून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. अमेरिकेत हिंदू समुदाय हा सर्वाधिक शिक्षित धार्मिक गट ठरला आहे. या अभ्यासानुसार दहा पैकी सात हिंदू—म्हणजेच तब्बल ७० टक्के—यांच्याकडे बॅचलर पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण आहे. दुसऱ्या क्रमांकावर यहूदी समुदाय असून त्यातील ६५ टक्के लोक उच्च शिक्षित आहेत. तुलनेत अमेरिकेतील एकूण लोकसंख्येत फक्त ३५ टक्के लोकांकडेच बॅचलर पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण आहे. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, हिंदू समुदायाने परदेशातही आपली शैक्षणिक क्षमता आणि बौद्धिक सामर्थ्य सिद्ध केले आहे. भारतातील प्रचंड लोकसंख्या आणि प्रतिभा जागतिक स्तरावर उंचावली तर पुढील दशकात ज्ञान आणि डेटा हेच सर्वात मोठे साधन ठरणार आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपला जनतेने प्रचंड बहुमत दिले आहे. हा विश्वास विकासाबरोबरच सुरक्षेवरही आहे. मात्र मुंबईत अवैध बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या वाढल्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. मासे विक्री, फेरीवाले, डिलिव्हरी, बांधकाम मजूर अशा क्षेत्रांत त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवते. यामुळे शहराच्या सुरक्षिततेला आणि सांस्कृतिक ओळखीला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा बनावट कागदपत्रे तयार करून हे लोक स्थायिक होतात. पोलिसांनी यापूर्वी काहींना पकडले आहे, तरीही संख्या वाढतच आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने अशा घुसखोरीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल. भाजप नेतृत्वाने आता कठोर कारवाई करून विशेष मोहीम राबवावी, छापे टाकावेत आणि पकडलेल्या घुसखोरांना देशाबाहेर हाकलावे. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देऊन जनजागृती मोहिमा चालवाव्यात. अन्यथा हा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करेल.

🔽



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page