🖋️ अभिजीत राणे लिहितात
आकाच्या पाठोपाठ खोक्या सुद्धा जेरबंद झाल्याने देवेंद्र फडणवीस बीड मधील सगळ्यांचीच गुंडगिरी आणि गुन्हेगारी ठेचून काढणार असल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे त्यांच्या जवळचा आका अर्थात वाल्मिक कराड याला अटक करून खुनाचा गुन्हा नोंदवला गेला. मुंडे यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला. बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा कार्यकर्ता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य अढळून आले होते. गेले कित्येक दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. आता तो प्रयागराज इथे पकडला गेला असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खोक्या पकडला जाणे हा सुरेश धस यांच्यासाठी धक्का आहे. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस कुणालाही वेडेवाकडे वागू देत नाहीत असा स्पष्ट संदेश गेला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आजपासून १६ वर्षांपूर्वी नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते आणि तिथे राजेशाही होती. तिथला राज परिवार हा सीतामातेचा वंशज आहे. परंतु चीनच्या समर्थनाने तिथे माओवादी कम्युनिस्ट मंडळींनी सत्ता उलथवून टाकत तिथे आधी लोकशाही राजवट स्थापन केली आणि राजेशाही संपवली आणि नंतर त्यांनी नेपाळची हिंदूराष्ट्र ही ओळख सुद्धा पुसून टाकली. शासकीय पातळीवर हिंदुत्व ठेचले तरी ते लोकांच्या मनात प्रज्वलित होतेच. महाकुंभमेळ्याला तब्बल पन्नास लाखांहून अधिक नेपाळी मंडळींनी भेट दिली. अयोध्येत राम स्थापित झाल्याने आता आपल्या देशाला पुनश्च हिंदू राष्ट्र केले पाहिजे आणि आपल्याकडे राजेशाही पुन्हा सुरु झाली पाहिजे अशी नेपाळी नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली आणि या मागण्या घेऊन त्यांनी नेपाळ मधील रस्ते व्यापले आहेत. नेपाळच्या सैन्यदलाच्या प्रमुखांनी आपण जनतेच्या बरोबर असल्याचे वक्तव्य केले असून याचा अर्थ या संघर्षात सैन्य निश्चल रहाणार आहे. आंदोलक राजवाडा रिकामा करा आमचे राजेसाहेब परत येत आहेत अश्या घोषणा देत रस्त्यांना व्यापून बसले आहेत. नेपाळचे राजे ज्ञानेंद्र पुनश्च कार्यभार स्वीकारणार का अशी चर्चा रंगली आहे. तर पंतप्रधान ओली यांनी ज्ञानेंद्र यांना राजकारणात येण्याचे आव्हान दिले आहे. लोकशाहीकडून राजेशाहीकडे उलट प्रवास करण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण असेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तान या देशातील राजदूत के के अहसान वागन हे सध्या चर्चेत आहेत. ते खाजगी कामासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांच्या कडे वैध व्हिसा होता तरीही त्यांना विमानतळावर अडवले गेले. नग्न करून तपासणी केली. त्याच अवस्थेत चार तास बसवले त्यावेळी त्यांच्या समोर काही अमेरिकन महिला अधिकारी सुद्धा होत्या. इतका अपमान करून झाल्यावर त्यांचा व्हिसा रद्द करून त्यांना परत पाठवले. यामागील सत्य असे आहे की भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ज्यावेळी लंडनला गेले होते , त्यावेळी खलिस्तानी मंडळींनी निदर्शन करून भारताचा झेंडा जाळला होता. त्या घटनेचे पडद्यामागील सूत्रधार हे अहसान वागन महोदय होते. त्यांच्या या उचापतीमुळे जयशंकर यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी मार्गदर्शन करायला हे महाशय सुद्धा ब्रिटन मध्ये होते. लवकरच जयशंकर यांचा अमेरिकेत दौरा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे महोदय अमेरिकेत येत होते. भारतीय दूतावासातील अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी चर्चा करून या महाशयांना त्यांची लायकी दाखवून देत हाकलून दिले.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
तुम्ही जे पेरता तेच उगवते ही म्हण सध्या पाकिस्तान रोज अनुभवतो आहे. इतकी वर्ष भारतातील दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन, अर्थसहाय्य आणि समर्थन देणारा पाकिस्तान आता रोज रक्तबंबाळ होतो आहे पण हतबल आहे काहीही करू शकत नाही. काल बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्स्प्रेस नावाची रेल्वे गाडीच बलुची लिबरेशन आर्मीने अपहरण करून पळवून नेली. त्यातील २०० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक आणि साधारण तितकेच नागरिक त्यांनी पकडले. या ऑपरेशन मध्ये त्यांनी तीस पाकिस्तानी सानिकांना कंठस्नान घातले. रमजानच्या पवित्र महिन्यात जगभरातील मुस्लीम मंडळी आपापसातील संघर्ष थांबवतात परंतु बलुचिस्तान मधील स्वातंत्र्ययोद्धे पाकिस्तानी सैन्याला तितकी विश्रांती द्यायला सुद्धा तयार नाहीत. अक्खी रेल्वेच पळवून नेल्याने पाकिस्तानची छी थू होते आहे. आता पाकिस्तानी सैन्याने इथे हवाई कारवाई करण्याची घोषणा केली आहे परंतु याचा परिणाम सुद्धा अधिकाधिक रक्तपात हाच होणार असून यामुळे बलुची लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र आणि अधिक रक्तरंजित होणार आहे. आपल्या देशातील निरपराध नागरिक आणि सैनिक मारले जाऊ लागल्याने आता तरी पाकिस्तानला अक्कल येईल अशी एक भाबडी आशा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आज १२ मार्च आहे. बरोब्बर ३७ वर्षांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते आणि त्यात २५७ माणसे मारली गेली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे संपूर्ण देशाशी धादांत खोटे बोलला होते. दाऊद इब्राहीम आणि त्याच्या देशद्रोही साथीदारांनी हे घृणास्पद कृत्य केले पण त्यांना वाचवण्यासाठी पवारांनी १३ बॉम्बस्फोट झाल्याचे सांगून तेरावा बॉम्बस्फोट मस्जिद बंदर इथे झाला असे धादांत खोटे वक्तव्य केले. शरद पवार इथेच थांबले नाहीत तर त्यांनी या पद्धतीचे हल्ले घडवण्याचे सामर्थ्य आणि तंत्रज्ञान हे तामिळ अतिरेक्यांकडे आहे अशी पुस्ती जोडत या घटनेला एल टी टी ई ही तामिळ संघटना जबाबदार असल्याची थाप मारली. शरद पवार यांचे मुंबईतील गुन्हेगारी जगताशी जे सलोख्याचे आणि व्यावहारिक संबंध आहेत त्यावर वोरा कमिटीच्या अहवालात अत्यंत बोचरे आणि विस्तृत भाष्य आहे. परंतु १९९३ पासून २०२५ पर्यंत एकाही केंद्रातील सरकारचे हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्याचे धाडस झालेले नाही. ३७ वर्षांनी का होईना या अभागी मृतांना श्रद्धांजली म्हणून हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्याचे धाडस मोदी सरकारमध्ये तरी आहे का ? हा बोचरा सवाल ते अतृप्त अभागी मृतात्मे विचारत आहेत.
🔽





Comments