🖋️ अभिजीत राणे लिहितात:
बंडखोरीची काळजी करू नका. मला मिळालेली बित्तंबातमी अशी आहे की "देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांनी एकमेकांना मदत करण्यासाठी विशिष्ट जागी संगनमताने पण बाह्यतः बंडखोरी विरुद्ध भूमिका घेत बंडखोर महाआघाडीचे मतविभाजन घडवून आणण्यासाठी उभे केले आहेत" दबाव तंत्राचा वापर म्हणूनही काही बंडखोर एकनाथजी शिंदे - अजितदादांनी उभे केले आहेत ते माघार घेतील हेही तितकेच नक्की!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
महायुतीचे अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या मदतीने सरकार येईल हे नक्की.. हा मेसेज सेव्ह करून ठेवा. महाआघाडी आणि महायुती १२०/१२५ स्वबळावर पोचतील पण सुमारे २५ अपक्ष छोटे पक्षांचे आमदार जो साम दाम दंड भेद वापरून सोबत आणू शकतो त्यांचेच सरकार येईल आणि ही साधने आणि वशीकरण मंत्र एकनाथजी शिंदे यांच्याकडे असल्याने मंत्रीमंडळ महायुतीचे येणार अर्थात ही "जुळवाजुळव" करण्याच्या बदल्यात भाजपाला मुकाट्याने मुख्यमंत्रीपद एकनाथजींना द्यावे लागेल हे काय वेगळे सांगायला हवे?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
दोन वाक्ये: फक्त दोन वाक्ये.. पण महाराष्ट्रात प्रथमच हा गौप्यस्फोट केला जातो आहे.. तो मी आत्मविश्वासाने आणि अगदी ज्याला इंग्रजीत "हॉर्सेस माऊथ" म्हणतात तशा सोर्स कडून कन्फर्म करुन करतो आहे.
पहिले वाक्य: पुढील मुख्यमंत्री भाजपाचा च असणार!
दुसरे वाक्य: भाजपाचे हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हेच असणार.
या दोन वाक्यात अपरिमित शक्यता मी सूचित केल्या आहेत त्यांचे तपशील वेळोवेळी देत जाईन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
नितेश राणे अटीतटीच्या लढतीत गुंतले असल्यामुळे भाजपाचे "राजकीय हिंदुत्व" तात्पुरते "निर्नायकी" झाले आहे. नितेश राणे यांच्या व्यतिरिक्त अन्य भाजपा नेते "गरम बटाटा " (हॉट पोट्याटो) समजून सार्वजनिक व्यासपीठावर हिंदुत्व हे कढीपत्ता फोडणीत घालून पण जेवताना काढून टाकावा तसे बोलत होते. आता संघ स्वयंसेवक भाजपाला मदत करणार आहेत पण मुद्दा हिंदुत्वाचा किती असेल आणि जागरूकपणे भाजपाला एकगठ्ठा मतदान करा यावर भर असेल का? ही शंका आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात:
टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात सर्वाधिक जाहिराती दागिन्यांच्या शोरुमच्या आहेत. काल धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर म्हणे मुंबईत आठशे कोटी आणि देशात एक लाख कोटींचे सोने खरेदी केले गेले. शेकडोंच्या रांगा मी स्वतः ज्वेलर्सच्या शोरूम बाहेर पाहिल्या. मॉल्स मध्ये खरेदीसाठी गर्दी इतकी होती की आत शिरता येत नव्हते. सा-या मुंबईत लाखो कार्सनी ट्रॅफिक जाम झाला होता.
तरी पण म्हणे भारतापुढील सर्वात मोठी समस्या "दारिद्रय, गरीबी" आहे. कसा विश्वास ठेवायचा?
🔽



Commentaires