🖋️ अभिजीत राणे लिहितात
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या न्यायव्यवस्थेला आणि संसदेला घरचा आहेर दिला आहे. रोहिणी खडसे यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले असून त्यात भारतातील महिलांना एक खून माफ केला जावा आणि अश्या पद्धतीचा संवैधानिक अधिकार प्रदान केला जावा अशी धक्कादायक मागणी केली आहे. ‘आपला देश बुद्ध आणि गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु आपल्या देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. नुकताच वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे.या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार व गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे सुरक्षित जगण्याचा आमचा अधिकार कायम राखण्यासाठी आम्हाला एक खून माफ करा.’ त्यांच्या या खळबळजनक मागणी नंतर तरी आपल्या देशातील गचाळ न्यायव्यवस्था कार्यक्षम होईल का ? राजकीय नेते संवेदनशील होतील का ? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शिरूर सारख्या विकसित होणाऱ्या शहरात द स्टीम रूम नावाचा कॅफे आहे. तिथे शाळकरी आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलामुलींना अवैध पद्धतीने पार्टिशन बनवून अश्लील कृत्य करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी या कॅफेमध्ये प्रचंड गर्दी होत होती. पोलिसांना खबर लागल्यावर त्यांनी तिथे छापा टाकून कॅफे चालकाला अटक केली आहे. या छाप्यात कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले मुली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या सगळ्याच मुलामुलींकडे मोबाईल असतात. पोर्न साईट सहज उपलब्ध आहेत आणि त्यामुळे लहानमुलांवर अत्यंत वाईट संस्कार होत आहेत. याचा लाभ घेऊन विकृत मंडळी अश्या सुविधा निर्माण करतात. छोट्या शहरांमध्ये अश्या पद्धतीच्या गोष्टी घडणे अत्यंत धक्कादायक आहे. या सापळ्यात लहान मुले अडकणे हे त्यांच्या भविष्याला उध्वस्त करणारे सिद्ध होऊ शकते. या प्रवृत्तींवर कठोर कारवाई आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
वानूआतु नावाचा देश जगाच्या पाठीवर आहे याची आजवर भारतीयांना कल्पना सुद्धा नसेल. मात्र ३.५० लाख लोकसंख्या असणारा बेटांनी बनलेला हा देश लोकसंख्येनुसार जगातील १८२ क्रमांकाचा देश आहे. हा ऑस्ट्रेलियापासून १९०० किलोमीटर दूर आहे. हा देश भारतीयांना माहिती होण्याचे कारण या देशाचे नागरिकत्व भारतातून पळ काढलेले उद्योजक ललित मोदी यांनी स्वीकारले आहे. या देशाचा आणि भारताचा गुन्हेगारी प्रत्यार्पण करार नाही याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी लंडनमधून थेट वानूआतु गाठले आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या ललित मोदींना अटक करून भारतात आणणे, ब्रिटन आणि भारत यांच्यातील करारामुळे शक्य होत नव्हते. परंतु भारताने दडपण वाढवल्यावर मोदींनी वानूआतुकडे पळ काढला आहे. या देशाची व्हिसा प्रक्रिया किचकट असल्याने इथे भारतीय पर्यटक जात नाहीत पण जगभरातील निसर्गप्रेमी डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि उच्च दर्जाच्या रिसॉर्ट्ससाठी या देशात आवर्जून जातात. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न पर्यटनातून येते. इथे वर्षाला ७०००० पर्यटक भेट देतात. या देशाचे नागरिकत्व केवळ दीड कोटी रुपयात मिळू शकते. भविष्यात हा देश फरार भारतीय गुन्हेगारांचे नंदनवन होऊ शकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
एक समाज म्हणून आपला दर्जा किती खालावला आहे हे वारंवार उघडकीस येते आहे आणि यावर कठोर कारवाई करणे हा एकमेव पर्याय नसून शाळा कॉलेजेस आणि नोकरी व व्यवसायांच्या ठिकाणी सुद्धा नैतिक वर्तन करणे हे समाज मान्य असून अनैतिक वर्तन करणाऱ्यांना कठोर दंडित करणारी नियमावली करणे आवश्यक आहे. काल गौरव आहुजा नावाचा एक मुलगा आणि त्याचा मित्र मद्यधुंद अवस्थेत येरवडा इथे आपल्या विदेशी लक्जरी कार मधून जात होता. त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली आणि रस्त्यावर मुत्रविसर्जन केले. त्याला हटकणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव दाखवून तो पळून गेला. आता त्याला अटक झाली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईलच परंतु त्याच्यावर सामाजिक पातळीवर कारवाई आवश्यक आहे. जसे की अश्या व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात यावी. पुढील सहा महिने त्याला कोणत्याही हॉटेल , रेस्टॉरंट इथे प्रवेशास बंदी केली जावी. त्याला विमान आणि रेल्वे प्रवास नाकारला जावा. अश्या पद्धतीच्या सामाजिक शिक्षा दिल्याशिवाय या विकृतांना अक्कल येणार नाही. इतकेच नाही तर त्याला जी शिक्षा दिली जाईल त्याच्या निम्मी शिक्षा त्याच्या पालकांना आवश्यक आहे कारण ते संस्कार करण्यात कमी पडले आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताची फाळणी मुस्लीम लीग ने घडवली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सत्ताभ्रष्ट झालेला कॉंग्रेस पक्ष आता जिथे कुठे सत्ता आहे तिथे मुस्लीम लीग ज्या पद्धतीने राज्य चालवेल त्या पद्धतीने राज्य चालवत फाळणी घडवण्याचा प्रयास करत आहे. कर्नाटकातील हिंदूंनी कॉंग्रेस वर विश्वास ठेवून त्यांना मतदान केले आता त्यांना अक्षरशः नरकात रहात असल्याची अनुभूती कॉंग्रेस देते आहे. कॉंग्रेस पक्षाने जे बजेट सादर केले आहे ते वाचून कोणीही कॉंग्रेस ला मुस्लीम लीगच म्हणेल. मुस्लिमांना सरकारी कंत्राटात आरक्षण,प्रत्येक मुस्लीम मुलींच्या लग्नासाठी ५०००० अनुदान, वक्फ बोर्ड आणि कब्रस्तानला १५० कोटीचा निधी, मुस्लिमांना सांस्कृतिक कार्यक्रम करायला ५० लाख निधी, खास मुस्लिमांसाठी आय टी आय कॉलेज, मुस्लीम मुलामुलींना ५० टक्के फी सवलत, मुस्लीम मुलींसाठी निवासी कॉलेज, मुस्लीम विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाढवली, हज भवन विस्तार प्रकल्प. इतक्या सगळ्या योजनांवर खर्च करून उरलेला पैसा विकासात्मक योजनांसाठी वापरणार आहेत. कर्नाटकचा अर्थसंकल्प ३.९२ लाख तुटीचा अर्थसंकल्प आहे. राज्य भिकेला लागले आहे आणि भाजपच्या काळात यांचा अर्थसंकल्प शिलकीचा असे. मुस्लीम तुष्टीकरण योजनात इतका पैसा खर्च होतो आहे आमदारांना विकासनिधी सुद्धा दिला जात नाही. महाराष्ट्रात महायुती सरकार आले नसते तर हीच अवस्था असती.
🔽
#SharadPawar #RohiniKhadse #shirurcafe #Police #Vanuatu #india #Britain #GauravAhuja #Pune #MuslimLeague #Congress #bjp #DevendraFadanvis #abhijeetrane





Comments