top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 15
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देवेंद्र फडणवीस शांतीत क्रांती करत असतात. एका हसमुख चेहर्‍याआड एक कर्तव्यकठोर आणि कायद्याचे पालन करणारा प्रशासक दडला आहे पण याची लोकांना कल्पना येत नाही. 'भोंगेमुक्त मुंबई अभियानात किती मस्जिद आणि किती मंदिरांवरील भोंगे उतरवले हे सरकार का सांगत नाही', 'मंदिरांवरील भोंगेच उतरवले असतील', 'सरकार माहिती का देत नाहीये, काय लपवत आहेत'... असे अनेक तर्क-वितर्क मांडले जात होते. राज ठाकरे यांनी या विषयावर आरडाओरडा केला, आंदोलन केले परंतु अश्या गोष्टींच्या माध्यमातून हवा करता येते. काम हे जमिनीवर आणि कायद्याच्या कसोटींची पूर्तता करणारेच करावे लागते. अधिकृत माहिती : सरकारने विधानसभेत आज या विषयी माहिती दिली आहे. मुंबईतील 1148 मस्जिद व 48 मंदिरांवरील भोंगे पोलिसांनी हटवले आहेत. राज ठाकरेंच्या सारखे 'सिझनल हिंदुत्ववादी' नेते नुसता कोलाहल करतात आणि विसरून जातात. त्यांचा तो सीझन संपून आता अजाणस्पर्धा आणि बुरखावाटप करणाऱ्यांशी प्रेमालाप करण्याचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे ते या कारवाईवरून सरकारचे अभिनंदन करणार की निषेध, हे पाहावे लागेल. असो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"देवाभाऊंकडे सर्व काही आहे,तरीही पक्ष फोडत असतात." - उद्धव ठाकरे. अहो उद्धव ठाकरे तुम्ही पण फोडा की दुसऱ्यांचे पक्ष.तुम्हाला आज पर्यंत कधी कोणी सांगितले आहे का की तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडू नका,म्हणून? नाही ना? मग ते न करता,नुसते रडत का राहता? तुमच्या पक्षातील लोकांना त्या देवा भाऊच्या पक्षात जाण्यापासून का रोखू शकत नाही तुम्ही?तुम्हाला ते करता येत नाही त्याला पण ते देवा भाऊ च जबाबदार का? याच देवाभाऊंना तुम्ही काही महिन्यांपूर्वी जाहीर आव्हान दिले होते ना,एक तर तू राहशील किंवा मी! देवाभाऊंचा पक्ष अधिकाधिक बळकट होताना दिसतो आहे आणि तुमचा पक्ष संपत चाललेला दिसतो आहे. याचा अर्थ तुमच्या जाहीर आव्हानाला उत्तर न देता त्यांनी तुमचे आव्हान स्वीकारले आहे.मग आता लढा की त्यांच्याशी.बुळ्यासारखे रडत रडत तक्रार काय करता की देवा भाऊंकडे सर्व काही असून ही ते पक्ष फोडत असतात? मर्दपणा वागण्यात कधी नव्हताच,आता बोलण्यात सुद्धा राहिला नाही.काय ही तुमची स्थिती?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जो प्रकार बिहारच्या काँग्रेसी चमच्यांनी केलाय यावेळी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तोच प्रकार पाच वर्षापुर्वी उबाठाच्या सेनेने केला होता महाराष्ट्रात 2020 साली. सॅनीटरी पॅडवर नेत्यांचे फोटो लावले होते. ऐकण्यात आणि पाहण्यात असे आले की सॅनीटरी पॅडच्या आतल्या बाजूला देखील राहुल गांधीचे फोटो छापण्यात आले. त्यानंतर काही महीलांनी आक्षेप घेतला की या पॅडच्या वापरकर्त्यांना तो फोटो अस्वस्थ करणारा वाटतो म्हणून त्यांनी पॅड परत दिलेत. अशा थिल्लर कल्पना याच लोकांना कशा सुचतात? दोघेही नेपो, दोघेही बॅचलर, दोघेही नशेडी. बऱ्याच कार्यकर्त्यांना आतील बऱ्याच गोष्टी माहीत असतात. त्यावरून ते असे काही कार्यक्रम खालच्या फळीला देत असतात. राहुल गांधीच्या सॅनीटरी पॅडवरील फोटोवरून उठलेल्या वादळात आदीत्य ठाकरेच्या सॅनीटरी पॅडवरील फोटोची माध्यमात कोणालाच आठवण झाली नाही हे विशेष....

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोंग्रेस पक्षातील मुस्लिम पहिल्यांदा मुसलमान आणि नंतर कोंग्रेसी असतात. काल एका कार्यक्रमात एका कोंग्रेसी मुस्लिम नेत्याने स्वधर्मियांसमोर एक धक्कादायक वक्तव्य केले. तो म्हणाला,” वर्षा ताई गायकवाड यांनी खासदार म्हणून ५ वर्षे कोणतेही केले नाही तरी काहीही हरकत नाही. कारण त्यांनी एका अशा वकीलाला पराभूत केले आहे, ज्याने १९९३ च्या मुंबई ब्लास्ट केसमध्ये आणि 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाबला शिक्षा देण्यात महत्वाची भुमिका बजावली आणि ती व्यक्ती सरकारी वकील असलेली व्यक्ती आहे." २०२४ च्या निवडणुकीत वोट जिहाद केला गेला होता आणि याची ही निर्लज्ज कबुली आहे. मुसलमानांची ही मानसिकता राष्ट्र द्रोह आहे . मुंबई बॉम्बस्फोट किंवा 26/11 चा हल्ला हे देशाविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. यात साथ देणारा प्रत्येक व्यक्ती राष्ट्रद्रोहीच होता. तो धर्माने मुसलमान होता हे गौण आहे असे सामान्य हिंदू समजतो. परंतु सामान्य मुसलमान याच्या उलट विचार करतो. मुसलमान असलेल्या राष्ट्रद्रोही लोकांच्या विरोधात केस लढून त्यांना तुरुंगात पाठवणारा वकील त्यांना आपला शत्रू वाटतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

केरळमधल्या कम्युनिस्टांच्या रक्तरंजित राजकारणाचा आणि नृशंस हिंसेचे जिवंत उदाहरण म्हणजे सदानंदन मास्टर ! केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतो आहे हा गुन्हा केल्याची शिक्षा त्यांना दिली गेली. 1994 साली वयाच्या तीशीत ऐन लग्नाच्या उंबरठ्यावर पाऊल टाकतांना सदानंदजींचे पाय करवतीने कापण्यात आले. कम्युनिस्ट आणि मुल्ले यांच्या हैवानीयतमध्ये काहीही फरक नाही. संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची शिक्षा म्हणून त्यांचे पाय गुढग्यापासून कापण्यात आले. तसे तर केरळ मध्ये शेकडो संघ स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत. मात्र ते काम करण्यास कोणी धजावू नये, जरब राहावी, लोकांसमोर त्यांची क्रूरता वारंवार येत रहावी या इराद्याने सदानंद मास्टरजींचे पाय कापून त्या कापलेल्या पायाला शेण लावून रक्तस्त्राव थांबवण्यात आला. जेणेकरून मास्टरजी जीवंत राहून त्या लोकांच्या दहशतीचे एक उदाहरण होतील. सदानंदजींनी आपल्या जिद्दीने, कामाप्रती आणि राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेने आपली संघसेवा सुरूच ठेवली. एकतीस वर्षांच्या तपस्येला आज फळ प्राप्त झाले आहे. सदानंद मास्टरजींना आज राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवडण्यात आले आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page