🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 6
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हिंदू' उत्तर भारतीय, गरीब, कष्टकरी, श्रमिक, फेरीवाल्यांविरुद्ध मुंबईत प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली 'राजकीय हिंसा' घडवून आणली जात आहे. यामुळे ही लोकं आपले काम, दुकाने, रस्त्यांवरची आपली जागा, टपरी, हातगाडी, 'डिलिव्हरी बॉय'ची कामे, 'ओला/उबर' ड्रायव्हर कामे, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, सुतार कामे इत्यादी सोडून जातात आणि त्या जागेत मुस्लिम गट व्यवस्थितपणे येऊन ती 'स्पेस' अलगदपणे ताब्यात घेतात. किंबहुना, ती स्पेस मुसलमानांच्या घश्यात घालण्याचे कारस्थानच सुरू आहे. त्यामुळे कमीतकमी वेळेत लोकसंख्यात्मक बदल आणि त्याहून महत्वाचे म्हणजे सुरक्षेशी संबंधित परिणाम आपल्या शहरात घडत आहेत. हा प्रॉब्लेम आता मुंबई व शेजारील परिसर भागात ठळकपणे दिसू लागला आहे. अनेक सुरक्षा क्षेत्रातील चर्चा, नागरी अभ्यास आणि स्थलांतर संशोधनांमध्ये आता ही सगळी निरीक्षणे नोंदवलेली जाऊ लागली आहेत आणि असंच सुरू राहिलं तर नजीकच्या भविष्यातच, 'लंडन' प्रमाणे मुंबई पण इस्लामिक शक्तींच्या घश्यात कशी गेली याची 'केस-स्टडी' बनेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला फक्त आणि फक्त 'ब्रँड ठाकरे' जबाबदार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
" आ रहे है अखिलेश भैय्या "अशा उन्मादी घोषणा मागच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश समर्थकांनी दिल्या होत्या. त्या ऐकून मुस्लिम आणि यादव सोडून बाकीच्या सगळ्या जाती बिनबोभाट , बिनभांडवली भाजपच्या मागे आल्या.कारण त्यांनी यांचा जाच अन्सारी, अतिक,आझम आदी रूपाने अनुभवला होता. महाराष्ट्रात हिंदी भाषा जी आर मागे घेतला आहे. तरी विषय संपत नाही. केडिया सारखी माणसे मुद्दाम रॉकेल ओतत आहेत. त्यात मनसे कार्यकर्ते भावनिक होऊन रागाला जात आहेत. हेच घडावे ही तर चाणक्य नीतीची इच्छा आहे. जसे ध्रुवीकरण अखिलेश विरुद्ध झाले. तसे ध्रुवीकरण जहाल मराठीवादी पक्षाच्या खळ खटॅक प्रतिघाताने होत आहे. अमराठी निःसंशय घाबरून अखिल भारतीय अशा भाजप कडे येणार. यात राज साहेब यांचा धुरंधरपणा सुद्धा दिसून येतो. मुंबईत जेव्हढा मराठी टक्का आहे त्यातला सिंहाचा वाटा राज साहेब बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत काढून घेणार... याचा फटका उद्धव गटाला जोरदार बसणार आहे. उद्धव गट घर का ना घाट का झाला आहे. मुस्लिम अनुनय केल्याने जहाल मराठी आणि हिंदुत्ववादी मते राज साहेब आणि भाजप यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मराठी × हिंदी भाषा, मराठी × परप्रांतीय हा वाद राज साहेब आणि भाजप यांची नुरा कुस्ती आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मे/जून २०२४ मध्ये राहुल गांधीने कर्नाटकातील एका सभेत मोठ्या तोंडाने आश्वासन दिले होते की येत्या १जुलै (२०२४) ला करोडों गरिबांच्या खात्यात ८५०० रुपये जमा होणार आहेत, खटाखट,खटाखट... अशी मोठमोठी आश्वासने देऊन,ती खरी न करता काँग्रेसी नेत्यांप्रमाणे पळून जाऊन काँग्रेसची परंपरा गौरवास्पद रीतीने सांभाळल्या बद्दलच काल विपक्ष नेता म्हणून एक वर्ष पूर्ण केलेल्या राहुल गांधीला काँग्रेसी लाचारांनी शॅडो पी.एम्.असे कौतुकाने म्हटले आहे. निवडणूक निकालाच्या नंतर बँकांच्या बाहेर लागलेल्या मुस्लिम महिलांच्या रांगा सुद्धा आपल्याला आठवत असतील. कोंग्रेस बेमालूम थापा मारते, मतदारांना फसवते आणि मतदार फसतात सुद्धा. परंतु एकेकाळी श्रीमंत असणारे कर्नाटक राज्य गेल्या 3-4 वर्षात ज्या पद्धतीने भिकेला लावले गेले आहे त्यामुळे तरी आता कर्नाटकातील सामान्य नागरिकांचे डोळे उघडतील ही अपेक्षा आहे. त्याने उघडले नाही तरी मुस्लिमांचे तुष्टीकरण बघून तरी कर्नाटकातील हिंदू जागे होतील आणि जातीपातीच्या राजकारणात न अडकता हिंदू म्हणून मतदान करतील ही आशा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सोमनाथचा परभणी दंगलीत सहभाग होता या आरोपावरून काही पोलिसांनी मिळून खून केला.त्यानंतर त्याच्या आईवर माघार घेण्यासाठी भरपूर दबाव होता.सुरेश धसने परभणी ते मंत्रालय सोमनाथला न्याय मिळावा म्हणून मुंबईला निघालेला मोर्चा "जाऊंद्या चूक होत असते, पोलिसांना माफ करा!" म्हणत माघारी फिरवला.मुख्यमंत्र्यांकडून मदत म्हणून पैश्यांचे अमिष सोमनाथच्या आईला दाखवण्यात आले.दोनवेळा त्या माऊलीने सरकारचे पैसे वापस पाठवले.शेवटपर्यंत सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे या मागणीवर सोमनाथची आई ठाम राहिली.तिच्या या संघर्षात प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीपासून ते कोर्टात सुनावणीत वकील म्हणून ऊभा टाकत सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी साथ दिली.त्यानंतर आज सोमनाथच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.दलीत व्यक्तीचा पोलीस कोठडीत खून होतो आणि साधा गुन्हाही दाखल होत नाही अशी आपली व्यवस्था आहे.ज्या पोलिसांनी सोमनाथचा कोठडीत मारून मारून खून केला त्यांनी आपल्या डिपार्टमेंटचे नाव धुळीस मिळवले आहे.सगळेच पोलिस वाईट नसतात पण काही अपप्रवृत्तीच्या पोलिसांमुळे पोलिस खात्याची नाचक्की होते. सोमनाथच्या आईच्या लढ्याला सलाम!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नेता नुसता लोकप्रिय जन नायक असून चालत नाही.तो तितकाच दरबारी राजकारण करणारा लागतो. तोंडात मध आणी डोक्यात शत्रुला लोळवायचे कसे यांचे प्लानिंग. कोणाला कीती महत्व द्यायचे यांचे प्लानिंग उपद्रव मूल्य असे सर्व गुण असावे लागतात.यांचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मोदी. देवेंद्र फडवनिस याच्या जवळ पास जात आहेत असे सध्या तरी वाटत आहे. मनसेचा वापर गेल्या दोन्ही मोठ्या निवडणुकीत करुन घेतला.सेनेची ताकत सेना उभी फोडून कमी केली.सेनेचा मोठा भाग जोडून घेतला.तीच परिस्तिथि राष्ट्रवादीची. या सगळ्या साठमारीत कांग्रेस संपून गेली.आता मनसेला अस्तित्व राखायला उबाठा कड़े जाणे क्रमप्राप्त आहे.एकदा बी एम सी भाजपाच्या ताब्यात आली की यांची रसद संपेल.शत्रुला संपवायचे असेल तर रसद तोड़ा हा अनादी काळाचा युद्ध नियम आहे.तसेही शरद पवार गट यांची ताकत मुंबई,ठाणे या ठिकाणी कधीच न्हवती.कांग्रेसची ताकत होती पण आता त्यांच्याकड़े नेतेच नाहीत.छगन भुजबळ याना का घेतले त्याचे कोड़े आता उलघडले.ते जर मनसे कड़े गेले असते तर आठ दहा नगरसेवकचा फटका भाजपाला पड़ला असता. आता तो पडणार नाही. थोडक्यात बी एम सी निवडणुकीची व्यूहरचना पूर्ण झाली आहे
🔽
Comments